ओव्हन आणि अंड्याशिवाय – रव्याचा केक

ओव्हन आणि अंड्याशिवाय रव्याचा केक रेसिपी – एगलेस रवा केक

रव्याचा केक, एगलेस, ओव्हनशिवाय, सूजी केक, बिना अंडा, बिना ओव्हन, केक रेसिपीज, eggless semolina cake, no oven, zestyflavours
माझी बहिण कल्याणी गोखले हिने कित्येक महिन्यांपूर्वी मला एगलेस आणि ओव्हनशिवाय करता येण्यासारखी केकची रेसिपी शेअर करायला सागितली होती. पण मागचं वर्ष खूप गडबडीचंच गेलं. मनालीची बारावी, त्या नंतरच्या तिच्या entrance exams, अॅडमिशन आणि मग आमची नेदरलँडला यायची तयारी. ह्या सगळ्यात वेळच मिळाला नाही.
मध्यंतरी आठवणीने एक-दोनदा केला तेव्हा चक्क बिघडला. ती पण सगळी स्टोरी सांगते. एकतर आधी
इलेक्ट्रिक कुकटाॅपचं तंत्र जमावं लागतं.
केक बेक व्हायला वेळ लागतोय म्हणून मी थाेडावेळ गॅसचं सेटिंग 4 वर केलं. थोड्यावेळाने लागेल म्हणून परत 3 वर केलं. एखादा दिवस आपला नसतोच म्हणून कळस म्हणजे बघूया तर म्हणून खालचा तवा काढून 2 – 4 मिनिटचं डायरेक्ट गॅसवर ठेवला. तेवढ्यातच सगळ बोंबललं बहुतेक. केक खालून बर्‍यापैकी लागला. तसा वाया नाही गेला. खालचा लागलेला भाग कापून टाकल्यावर बाकीचा केक खाण्याच्या लायकीचा होता, चव तशी बरी होती. पण ते काही खरं नाही ना! आजचा नीट मनासारखा झाला नसता, तर परत काही ह्या केकच्या वाटेला जायचं नाही असं अगदी ठरवलं होतं. कारण ओव्हनमध्ये मी हा केक आधी केला आहे. 180॰ C ला 25 – 30 मिनिटांत खूप छान होतो.
घरी असलेल्या मोजक्याच साहित्यात हा केक करता येईल. सध्याच्या परिस्थितीत हे सगळ्यात महत्वाचं. काहीही आणायला मुद्दाम बाहेर जाऊ नका. दुधात घालायची चाॅकलेट पावडर माझ्याकडे असतेच. म्हणून मग चाॅकलेट केक केला. बोर्नव्हिटा, हाॅर्लिक्स, नेसक्विक अश्या टाइपचं काहीही घालू शकता.त्यामुळे दुकानात जाऊन कोको वगैरे नाही आणलं तरी चालतं.
केक करताना बॅटरमध्येच तुम्हाला हवा तो रंग, स्वाद काहीही घालता येईल. फक्त त्याप्रमाणे साखर आठवणीने अॅडजस्ट करा. उदा – स्ट्रॉबेरी क्रश, मँगो सिरप.
आणखी एक मुद्दा म्हणजे केकला लागणारा वेळ. माझ्याकडे जी कुकिंग रेंज आहे त्याला स्टोव्हसाठी 1 – 9 अशी सेंटिग्ज आहेत म्हणजे फ्लेमच्या तुलनेत सांगायचं झालं तर 2 – 3 म्हणजे अगदी मंद गॅस, 5 – 6 साधारण मिडिअम आणि 8 – 9 सगळ्यात मोठा. मी केक करताना सेटिंग 3 वर ठेवलं होतं. केक बेक व्हायला 2 तास लागले. दिसायला जरी हा वेळ जास्त वाटला तरी एकदा भांडं ठेवल्यावर मग काहीही काम नाही. एकीकडे आपण आपले बाकीचे उद्योग करू शकतो. फक्त मध्ये मध्ये चेक करत राहायचं. केक होत आला की बेक झाल्याचा खमंग वास येतोच. तेच जर फ्लेम असेल तर मंद आचेवर केलं तरी फरक पडतो. वेळ कमी लागेल.
अंड्याशिवाय, रव्याचा केक, ओव्हनशिवाय, पॅनमध्ये, तव्यावर, zesty flavours
भांड्याखाली तवा ठेवताना जुना नाॅनस्टिक तवा ठेवता येईल. नाॅनस्टिक तवे जुने झाले, त्याचं कोटिंग निघालं की आपण फेकून देतो. त्यातला एखादा अश्या कामासाठी वापरता येईल. तवा गरम करताना मीठ नक्की घाला. मग केक जळण्याची शक्यता कमी होईल आणि भांडंही जाड बुडाचं घ्या.
साहित्य –
11/2 वाटी जाड/बारीक रवा
(थोडासा भाजलेला)
1/2 वाटी कणिक किंवा मैदा
1 वाटी साखर
1 वाटी दूध
1 वाटी फेटलेलं दही
1/4 वाटी रिफाइंड तेल/ पातळ साजूक तूप किंवा बटर
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा/इनो
1/4 वाटी चाॅकलेट पावडर
कृती –
रवा, दूध, दही, साखर मिक्स करून 2 – 4 तास झाकून ठेवा.
केक करताना तवा मध्यम आचेवर 10 मिनिटे तापत ठेवा.
केकच्या भांड्याला ग्रीस करून फाॅईल किंवा बटर पेपर लावून ठेवा.
रव्याच्या बॅटरमध्ये तेल/तूप, बेकिंग पावडर, सोडा आणि चाॅकलेट पावडर घालून तयार केलेल्या भांड्यात ओता.
आता तव्याखालचा गॅस अगदी मंद करून त्यावर केकचं भांड झाकून ठेवा.
झाकण ठेवताना फट राहणार नाही असं ठेवा. म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही.
25 – 30 मिनिटांनी केक चेक करा.
एगलेस केक, रव्याचा, सूजी केक, बिना ओव्हन, eggless cake, semolina cake, zestyflavours
रव्याचा केक, एगलेस, ओव्हनशिवाय, सूजी केक, eggless cake recipe, zestyflavours
तयार झाल्यावर पूर्ण गार करून डिमोल्ड करा.
हवा तसा डेकोरेट करा.
एगलेस केकच्या या रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्की आवडतील –
रव्याचा केक, सूजी केक, एगलेस केक, eggless cake, sooji cake, zesty flavours

Leave a Reply