काॅफी डालगोना – घट्ट आणि क्रिमी लाॅकडाऊन स्पेशल काॅफी रेसिपी

Dalgona Coffee – Thick and Creamy Lockdown Special Coffee

dalgona coffee, cold coffee, whipped coffee, dalgona coffee maathi, lockdow challenges fame, zestflavours
आजचा दिवस डालगोना काॅफीचा होता. सध्या जो उठतोय तो डालगोना काॅफी करतोय. जिकडे बघावं तिकडे काॅफीचे ग्लास दिसतायत. मग काय! उठणं आणि करणं आलचं. डालगोना म्हणजे फेटलेली (whipped) काॅफी.
साहित्य –
2 टेस्पून इंस्टंट काॅफी पावडर
2 टेस्पून साखर
2 टेस्पून उकळतं पाणी (गरम नाही. उकळतं म्हणजे उकळतंच)
2 ग्लास थंड दूध
दूधात घालायला साखर (ऐच्छिक)
बर्फाचे खडे
कृती –
सगळ्यात आधी व्हिपिंग (फेटलेली घट्ट काॅफी) तयार करून घेऊ या.
त्याकरता काचेच्या मोठ्या बाऊलमध्ये काॅफी पावडर घ्या.
आता त्यात साखर घालून दोन चमचे उकळतं पाणी घालून मिश्रण फेटायला घ्या.
बाऊल बर्फाच्या ट्रेवर ठेवल्यास काॅफी लवकर घट्ट होते.
फेटण्यासाठी हँड ब्लेंडर, स्टँड मिक्सर किंवा काटा, चमचा, व्हिस्कर यापैकी कशाचाही वापर करता येईल.
मी साधा चमचा वापरला आहे.
मिश्रण थोडेसे असेल तर फार वेळ लागत नाही.
मध्ये मध्ये थांबत काॅफी, साखर आणि पाणी घट्ट होईपर्यंत फेटा.
चमच्याने टाकले असता पटकन पडणार नाही, पण तरीही मऊ असे. (soft peak consistency)
सर्व्ह करताना साधारण पाऊण ग्लास भरेल इतके थंड दूध घ्या.
हवी असल्यास साखर घालून ढवळा.
मुलांसाठी करणार असाल तर चवीकरता थोडीशी साखर घाला, नाहीतर आवश्यकता नाही.
आता ग्लासात एक दोन आइस क्युब्ज घाला.
वर काॅफीचा स्कूप घाला.
डालगोना काॅफी तैयार.

2 thoughts on “काॅफी डालगोना – घट्ट आणि क्रिमी लाॅकडाऊन स्पेशल काॅफी रेसिपी

Leave a Reply