खूप सोप्पी भाकरी (100%जमणारी)

Easy No Fail Jowar Roti Recipe – Indian Millets Bread

अजिबात कष्ट न घेता गरम भाकरी पानात पडण्यासारखे सुख नाही. एक खूप मस्त, सोपी पद्धत तुमच्या बरोबर शेअर करते आहे. त्यामुळे पीठ ताजं आहे की जुनं, पाणी फिरवणे, थापणे अशी कोणतीही कटकट न होता खमंग, सुबक आणि मऊ अशी भाकरी करू शकाल.
भारतात राहणार्‍यांना खरंतर याचे काहीचं अप्रूप वाटणार नाही. कारण हवं तेव्हा, पाहिजे त्या प्रकारचं ताजं पीठ दळून आणण्याची चैन भारतात करता येते आणि त्याहूनही मजा म्हणजे हवं तेव्हा, हवं ते करून देणार्‍या ‘मावश्या’ असतात.😀 पण परदेशात हे लाड नसतात. शिवाय पीठ वगैरे चांगले आणि ताजे असेलच याची खात्री देता येत नाही. अश्या वेळेस असे सोप्पे उपाय मदतीला येतात. मी केलेल्या भाकर्‍या बाजरीच्या आहेत.

ज्वारीची भाकरी, सोप्या पद्धतीने, लाटून, bhakri recipe, easy method, jowar roti, millet recipes, zesty flavours

साहित्य –
1 ते 11/2 वाटी ज्वारी किंवा बाजरीचे पीठ
1 वाटी कणिक
2 टे स्पून तेल
पीठ भिजवायला पाणी

कृती –
परातीत कणिक आणि भाकरीचे पीठ घेऊन त्यात तेल घाला.
लागेल तसे पाणी घालून फुलक्यांसाठी भिजवतो तितकी घट्ट कणिक भिजवा.

ज्वारीची भाकरी, सोपी पद्धत, भाकरीचे पीठ, लाटून, jowar roti, zesty flavours
थोडावेळ झाकून ठेवा.
नंतर छानपैकी मळून घ्या आणि नेहमीसारखे फुलके करा.
ज्वारीची भाकरी, स्टेप बाय स्टेप रेसिपी, सोपी पद्धत, लाटून, jowar roti, zestyflavours
तवा व्यवस्थित तापला की लाटलेला फुलका तव्यावर टाका.
काही सेकंदात तव्याकडच्या बाजूचा जस्ट रंग बदलला की भाकरी उलटा.
ज्वारीची भाकरी, सोपी पद्धत, लाटून, स्टेप बाय स्टेप रेसिपी, jowar roti, zestyflavours
खालची बाजू 1 – 2 मिनिटे होऊ द्या.
लगेच उचलून वरची, कमी भाजलेली बाजू फ्लेमवर येईल अशी भाजा.
टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी, स्टेप बाय स्टेप रेसिपी, सोपी पद्धत, लाटून, jowar roti, zesty flavours
भाकरी हमखास मस्त फुगते.

Leave a Reply