गवारीची भाजी (दुधातली) रेसिपी

Milk Based Gawarfali / Cluster Beans Curry

gawarichi bhaji, milkbased, creamy cluster beans, gawarfali sabji, भाज्यांचे प्रकार, zesty flavours

गवारीची ही भाजी सौम्य, क्रिमी चवीची होते. रेस्टाॅरंटमध्ये व्हाइट ग्रेव्हीतल्या भाज्या लागतात तशी. मुलंही अगदी आवडीने खातात (स्वानुभव).

साहित्य –

1/2 कि गवार
2 – 3 टे स्पून साजूक तूप
(तुपाएवजी salted किंवा unsalted बटर एकवेळ चालेल, पण तेल शक्यतो नकोच. चवीत फरक पडेल.)
1 टी स्पून जिरं
1 – 2 हिरव्या मिरच्या
2 ते 2 1/2 वाट्या दूध (अंदाजे 1/2 ली)
थोडीशी साखर
मीठ

कृती –

दोन्ही बाजुची टोकं काढून, असल्यास दोरे काढून गवार निवडून घ्या.
गवारीचे बोटाच्या पेराएवढे तुकडे करा.
तूप तापत ठेवा.
चांगलं तापलं की जिरं आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करा.
फोडणीत गवार घालून परतून घ्या.
पाणी न घालता वाफेवर भाजी शिजवा.
भाजी शिजत आली की त्यात दूध घाला.
दूध व्यवस्थित आटवून घ्या.
पण खवा होईल इतपत घट्ट करू नका.
कारण नंतर भाजी आळते.
दूध आटत आले की त्यात चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्या.
थोडी सैलसर असतानाच गॅस बंद करा.
कोथिंबीर घालून पोळीबरोबर खा.

ही भाजी करताना ह्याच साहित्यात अश्याच पद्धतीने करा. बाकी काहीच घालू नका. कांदा, आलं – लसूण, तिखट आणि उग्र चवीचे मसाले असं काहीच नको, तरच हवी तशी परफेक्ट चव मिळेल. तीच या भाजीची खासियत आहे.

Leave a Reply