मग/बाऊल केक – 3 प्रकारचे केक – बीन अंड्याचे मायक्रोव्हेवमध्ये

3 Types of Instant Cakes In Microwave – Eggless Mug / Bowl Cakes Vanilla, Chocolate, Red Velvet

मग केक, बोल केक, मायक्रोव्हेव रेसिपी, ओव्हनशिवाय केक, एगलेस केक, mug cake, no oven cake, microwave recipe, eggless cake, zestyflavours
हा एगलेस केक मायक्रोवेवमध्ये दिड मिनिटात तयार होतो.
मी आज खूप दिवसांनी हा केक केला. कारण हल्ली रेणुका करते. शाळेतून आल्यावर लहर आली की ती केक करून खाते. आमच्याकडे ही रेसिपी सुपर डुपर हिट आहे.
बेसिक साहित्यात थोडासा बदल करून तयार होणारे तीन प्रकार मी खाली दिले आहेत.
मग केक, एगलेस केक, व्हॅनिला केक, चाॅकलेट केक, microwave cake, chocolate cake, vanilla cake, cake recipe marathi
व्हॅनिला केक
साहित्य-
4 टे. स्पून कणिक/मैदा
4 टे. स्पून साखर
4 टे. स्पून तेल
4-6 टे. स्पून दूध
1/4 टीस्पून इनो किंवा बेकिंग पावडर
2-4 थेंब व्हॅनिला इसेन्स
कृती-
एका मायक्रोवेव सेफ मग किंवा बाऊलमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या.
हाय पाॅवरवर दिड मिनिट मायक्रोवेव करा.
केक तयार.
दोन मिनिटांनी केक बाहेर काढा.
आवडत असल्यास
हर्षीज चाॅकलेट सिरप घालून खायला द्या.
चाॅकलेट केक
साहित्य-
4 टे. स्पून कणिक किंवा मैदा
2 टे. स्पून साखर
2 टे. स्पून बोर्नव्हिटा
4 टे. स्पून तेल
4-6 टे. स्पून दूध
1/4 टीस्पून इनो किंवा बेकिंग पावडर
कृती-
एका मायक्रोवेव सेफ मग किंवा बाऊलमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या.
हाय पाॅवरवर दिड मिनिट मायक्रोवेव करा.
दोन मिनिटांनी केक बाहेर काढून खायला द्या.
बोल केक, रेड वेलवेट केक, एगलेस केक, bowl cake, red velvette cake marathi
रेड वेलवेट केक
साहित्य-
4 टे. स्पून कणिक किंवा मैदा
3 टे. स्पून साखर
1 टे. बोर्नव्हिटा
1/4 टिस्पून इनो किंवा बेकिंग पावडर
4-6 टे. स्पून दूध
4 टे. स्पून तेल
2-4 थेंब लाल फूड कलर किंवा
1-2 टे. स्पून बीटाचा रस
(मी बीट वापरले आहे.)
कृती-
एका मायक्रोवेव सेफ मग किंवा बाऊलमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या.
हाय पाॅवरवर दिड मिनिट मायक्रोवेव करा.
दोन मिनिटांनी बाहेर काढून केक खायला द्या.
खूप क्यूट दिसतो हा केक.
माझा मायक्रोवेव 900 W चा आहे.
त्यात दिड मिनिटांत केक छान होतो.
पण कधी जास्त ‘क्रंची'(माझ्या मुलीचा हा आवडता शब्द आहे.) हवा असल्यास 10-20 सेकंद जास्त लावते.
सोईसाठी बॅटर आधी वेगळ्या भांड्यात मिक्स करून घेऊन नंतर मगमध्ये ओतले तरी चालेल.
केक तयार झाल्यावर डायरेक्ट त्याच मग किंवा बाऊलमधुन खाण्यातच मजा आहे.
बोर्नव्हिटाऐवजी कोको पावडरसुद्धा चालेल, फक्त मग साखर त्या प्रमाणात अॅडजस्ट करावी लागेल.

Leave a Reply