पिझ्झा क्रॅकर्स – पिझ्झाच्या चवीचे खुसखुशीत शंकरपाळे – ओव्हन रेसिपी

Pizza Flavoured Crackers – Crispy and Crunchy Snacks Recipe

pizza flavoured crackers, baked snacks, पिझ्झा क्रॅकर्स, पिझ्झा शंकरपाळे, दिवाळी फराळ, बेकरी पदार्थ, zesty flavours

सध्या माझ्या डोक्यात बेकिंगचं खूळ शिरलं आहे. काय काय करू आणि किती किती करू असं झालं आहे. भारतात असताना मी फारसं बेकिंग करत नाही. एकतर तेवढा वेळही मिळत नाही आणि इच्छाही होत नाही. भारतात माझ्याकडे सॅमसंगच कन्ह्वेक्शन माॅडेल आहे. पण त्यात मी क्वचितच बेकिंग केलं आहे, मायक्रोवेव्ह मोडच नेहमी वापरला जातो.
परदेशात कुकिंग रेंजमध्ये असलेला पारंपारिक पद्धतीचा ओव्हन वापरायला अतिशय सोप्पा असतो आणि मुख्य म्हणजे आकाराने अगदी ऐसपैस मोठा असतो. ओव्हनबरोबर बर्‍याचदा एक – दोन कुकी शीटस् किंवा बेकिंग ट्रे मिळतातचं.

pizza crackers, baked snacks, oven recipes, पिझ्झा शंकरपाळे, ओव्हन, बेक करून, zesty flavours
pizza crackers, baked snacks oven recipes, पिझ्झा क्रॅकर्स, ओव्हन, बेकरी पदार्थ, zesty flavours

त्यामुळे एकावेळेस जास्त प्रमाणात पदार्थ करणे खूपचं सोयीचे पडते. मधल्या वेळेस तोंडात टाकायला काही करताना तळण न करता तिखट गोड अनेक प्रकार करता येतात. तळून केलेले बरेचसे पदार्थ बेक करता येतात. हे पिझ्झा क्रॅकर्स करायला सोप्पे आहेत, शिवाय भरपूर चीज असल्यामुळे बच्चे कंपनीला खूप आवडतात. तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात कोणतेही मसाले घालता येतील. प्रमाणही हवे तसे कमी जास्त करू शकता.

साहित्य –
1 वाटी मैदा किंवा कणिक
1/2 ते 1/4 वाटी किसलेलं चीज
2 टे स्पून तेल
1 टे स्पून ओरिगॅनो/मिक्स हर्ब्ज/ इटालियन सिझनिंग
1 टी स्पून मिरपूड
1/2 टी स्पून लाल तिखट
1/4 टी स्पून बेकिंग पावडर
मीठ
कणिक भिजवायला फ्रिजमधलं थंड पाणी

कृती –
कणकेत चीज, तेल, मसाले, मीठ आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करा.
थंड पाणी घालून पुर्‍यांसाठी भिजवतो तितकी घट्ट कणिक भिजवा.
थोडावेळ कणिक मुरवत ठेवा.
नंतर एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटा.
फोटोत दाखविल्याप्रमाणे एकावर एक घड्या घालून पोळीचा चौकोन करून घ्या.

pizza crackers, baked snacks, पिझ्झा शकरपाळे, शंकरपाळ्याची पोळी, zesty flavours
pizza crackers, baked snacks, पिझ्झा शंकरपाळे, शंकरपाळ्याची पोळी, zesty flavours
pizza crackers, folded dough, पिझ्झा शंकरपाळे, शंकरपाळ्याची पोळी, zesty flavoures
pizza crackers, पिझ्झा शंकरपाळे, लाटलेली पोळी, चौकोनी आकार, zesty flavoures

आता हा चौकोन हलक्या हाताने किंचित जाडसर लाटून घ्या आणि काट्याने सगळीकडे टोचून घ्या.

pizza crackers, पिझ्झा क्रॅकर्स, तिखट शंकरपाळे, खारे शंकरपाळे, दिवाळी फराळ, zesty flavours

म्हणजे क्रॅकर्स फुगणार नाहीत.
पापडासारखा पातळ लाटू नका.
लाटलेल्या पोळीची छोटी छोटी चौकोनी बिस्किटे कापा किंवा कुकी कटर, छोटी वाटी, झाकण वापरून आकार द्या.
ओव्हन 180० से. ला 10 मिनिटे प्रीहिट करून घ्या.
नंतर 12 – 15 मिनिटे क्रॅकर्स बेक करा.

पिझ्झा क्रॅकर्स, तिखट शंकरपाळे, खारे शंकरपाळे, खुसखुशीत, दिवाळी फराळ, zesty flavours

Leave a Reply