पंचमेळ किंवा पंचरत्न डाळ (राजस्थानी पदार्थ)

Panchratna/Panchmel Dal – Spicy Mix Dal Curry

पंचरत्न डाळ, पंचमेळ डाळ, राजस्थानी रेसिपी, panchmem dal recipe, dal recipe marathi, five lentil curry, mix lentil curry, rajsthani food
राजस्थानच्या खाद्यसंस्कृतीतील एक सुप्रसिद्ध पदार्थ.
मिक्स डाळी असल्यामुळे शाकाहारींसाठी प्रोटीनचा उत्तम स्त्रोत. ह्यात पाच डाळी असतात म्हणून पंचमेळ डाळ. तूरडाळ, चणाडाळ, मूगडाळ, मसूर आणि उडीदडाळ. या सगळ्या डाळी आपल्या स्वयंपाकघरात असतातच. मला इथल्या लोकल ग्रोसरी स्टोरमध्ये मिक्स डाळींचे रेडिमेड पॅकेट मिळाले. योगायोगाने त्यात पाचचं डाळी, पण थोड्या वेगळ्या होत्या. आख्खे काळे उडीद, आख्खा मसूर, मसूर डाळीशिवाय फ्रेंच लेंटिल्स आणि ग्रीन लेंटिल्स असे दोन प्रकार होते. जे मला कळले नाहीत. कोणाला माहित असल्यास जरूर सांगा. कारण ग्रीन लेंटिल मूगडाळ दिसत नव्हती. नेटवर शोध घेतला असता गोंधळात टाकणारी नावं आणि माहिती समोर आली.
पंचमेळ डाळ रेसिपी, पंचरत्न डाळ मराठी, राजस्थानी रेसिपी, panchmel dal recipe, rajsthani food, zestyflavours
ही डाळ फार पातळ न करता घट्टच करायची असते. वेगळी भाजी करायची नसेल तर भात तसेच पोळीबरोबरही खाता येते.
साहित्य –
1 वाटीभर वर सांगितलेल्या डाळी (सगळ्या मिळून)
1 मोठा कांदा
1 मोठा टाॅमॅटो
5 – 6 लसणीच्या पाकळ्या
1 आल्याचा तुकडा
4 – 5 हिरव्या मिरच्या किंवा
1 – 2 टीस्पून लाल तिखट
फोडणीसाठी –
2 – 3 टेस्पून तेल किंवा तूप
1 टीस्पून जिरं
हिंग, हळद
1 टीस्पून धणेपूड
1 – 2 तमालपत्र
2 – 4 सुक्या मिरच्या
1 चमचा गरम मसाला
मीठ
पंचमेळ डाळ, पंचरत्न डाळ, राजस्थानी रेसिपी, panchmel dal recipe, zestyflavours
कृती –
डाळी धूऊन कुकरमध्ये 4 – 5 शिट्या करून शिजवून घ्या.
अगदी मऊ शिजवा पण गरगट करू नका.
कढईत तेल/ तूप तापवा.
चांगलं तापलं कि त्यात जिरं आणि हिंग घाला.
जिरं तडतडलं कि तमालपत्र आणि सुक्या मिरच्या घालून परता.
आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून खमंग करा.
आता बारीक चिरलेला कांदा घालून चांगला सोनेरी होऊ द्या.
त्यावर बारीक चिरलेला टाॅमॅटो घाला.
तेल सुटेपर्यंत परतत राहा.
आता त्यात धणेपूड आणि हळद, तिखट घालून व्यवस्थित परता.
सगळे मसाले एकजीव झाले की शिजवलेली डाळ घाला.
आवश्यक तेवढे पाणी घालून मीठ आणि गरम मसाला घालून 2 – 3 उकळ्या येऊ द्या.
पानं घ्या आणि जेवायला बसा.
पंचमेल दाल रेसिपी, पंचरत्न डाळ मराठी, panchmel dal marathi, five lentil mix, zestyflavours

Leave a Reply