लिंबाचे लोणचे / चटणी – आंबट – गोड, चटपटीत

Tangy No Cook Lemon Pickle / Chutney Recipe

तोंडीलावणे किंवा डावीकडचे पदार्थ यांना मराठमोळ्या जेवणात विशेष महत्त्व आहे. लोणची, चटण्या, कोशिंबीरी असे आंबट, तिखट चवीचे पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्यास जेवणाची लज्जत वाढवणारे असतात. लिंबाची ही आंबटगोड चटणी चवीला मस्त चटपटीत लागते आणि 5 मिनिटांत होते. कशी करायची ते बघू या.

sweet lemon pickle, pickle recipes, nimbu achar, limbache god lonache, zesty flavours

साहित्य –
3 लिंबं अगदी मोठ्या आकाराची
(लहान असतील तर 5 – 6 घ्या)
2 वाट्या साखर
1/2 वाटी लाल तिखट
1/4 वाटी मीठ
लहानसा आल्याचा तुकडा
1/2 ते 1 टी स्पून जिरं

कृती –
लिंबं स्वच्छ धुवून अगदी कोरडी करा.
एका लिंबाच्या आठ फोडी करा.
बिया असतील तर काढून टाका.
आता लिंबं, आलं आणि जिरं मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करा.
तयार पेस्ट भांड्यात काढून घ्या.
त्यात साखर, मीठ आणि तिखट घालून छानपैकी ढवळून घ्या.

ही चटणी उपासालाही चालते.
साखर जाड असल्यास विरघळेपर्यंत एखादा दिवस तशीच ठेवा.
पिठीसाखर घातल्यास लगेच विरघळते.
मुरल्यावर ही चटणी चांगली लागतेच.
पण ताजी असताना पण अप्रतिमच लागते.
त्यामुळे थांबायची गरज नाही.
लगेच खाता येते.
मला स्वत:ला थोड्या प्रमाणात केलेली ताजी ताजी लोणचीच जास्त आवडतात.
जास्त प्रमाणात करायची असेल तर एअरटाइट बरणीत भरून ठेवा.
भरपूर टिकते.

Leave a Reply