कणकेच्या कुकीज (मैदा आणि अंड्याशिवाय)

Delicious Eggless Whole Wheat Cookies

घरी असलेल्या मोजक्या साहित्यात या कुकीज तुम्ही करू शकता. ह्या कुकीजसाठी बेकिंग पावडर, सोडा हे काहीही लागत नाही. हे या कुकीजचे खास वैशिष्ट्य आहे. अजिबात खटपट न करता मनात येईल तेव्हा करता येण्यासारखा प्रकार आहे.

wholewheat cookies, eggless, no refind flour, baking, cookies recipe, zesty flavours

साहित्य –
1 वाटी कणिक
3/4 वाटी पिठी साखर
1/2 वाटी पातळ तूप
2 – 3 टे स्पून दूध (लागल्यास)
1/2 टी स्पून वेलची पावडर

कृती –
कणकेत साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
त्यात पातळ तूप घालून सारखे करा.
आता पिठात रूम टेंपरेचरचे दूध घालून कणिक भिजवा.
कणिक मऊ पण साधारण घट्ट अशी भिजवा.
खूप सैल करू नका आणि जास्त मळूही नका.
भिजवलेली कणिक अर्धा तास झाकून ठेवा.
अर्ध्या तासाने कणकेचे छोटे छोटे गोळे करून, ते दोन्ही तळहातात दाबून व्यवस्थित चपटे करा किंवा
पोळी लाटून कुकी कटर किंवा एखादा साचा वापरून हव्या त्या आकारात कापून घ्या.
ह्या कुकीज जास्त जाड करू नका.
जाडसर केल्यास थंड झाल्यावर थोड्या कडक होतात.
ओव्हन 180० सेल्सियस तापमानावर 10 मिनिटे प्रीहिट करा.
बेकिग शीटला बटर पेपर, फाॅइल किंवा तेल लावा.
त्यावर कुकीज मांडताना दोन कुकीजमध्ये थोडे अंतर ठेवा.
त्यामुळे कूकीज एकमेकांना चिकटणार नाहीत.
कारण बेक करताना कुकीजचा आकार साधारण दुप्पट होतो.
गरम ओव्हनमध्ये 10 – 12 मिनिटे कुकीज बेक करा.
बेक झाल्यानंतर लगेच गरम कुकीजना हात लावू नका म्हणजे कुकीज मोडणार नाहीत.
10 – 15 मिनिटांनी थंड झाल्यावर कुकीज पूर्णपणे सेट झाल्यावरंच हाताळा.

wholewheat cookies, eggless, no refind flour,baking, cookies recipe, zesty flavours

Leave a Reply