उपासासाठी साबुदाणा वडे – आप्पेपात्रात

Sabudana Vada Recipe in Appe Maker – Sago Snacks Recipe for Vrat

साबुदाणा वड्यांची ही रेसिपी नेहमीचीच आहे. पण आप्पेपात्रात करण्याची आयडिआ माझ्या एका मैत्रिणीची. तिने तिच्या ब्लाॅगवर ही रेसिपी शेअर केली होती. आपले नेहमीचेच साधे, पारंपारिक पदार्थ, पण असे थोडेसे वेगळ्या पद्धतीने करुन बघायला मला खूप आवडतात.
त्यामुळेच आज हा साबुदाणा वड्यांचा यशस्वी प्रयोग केला गेला. छान, मस्त कुरकुरीत झाले होते. Try करनेकी तो बनती है.
sabudana vada recipe, sabudana, vada, vrat recipes, appepan recipe, zesty flavours
साहित्य –
1 वाटी साबुदाणा
2 बटाटे
1/2 वाटी शेंगदाण्याचे कूट
1 टीस्पून जीरे
हिरव्या मिरच्या किंवा
लाल तिखट आवडीप्रमाणे
मूठभर कोथिंबीर
किसमिस आणि काजूचे तुकडे ( ऐच्छिक)
मीठ
तेल किंवा तूप
कृती –
साबुदाणा तासभर भरपूर पाण्यात भिजत घाला.
साधारण एका तासाने साबुदाण्यातले सगळे पाणी काढून टाका आणि झाकण घालून 4 – 5 तास ठेवा.
साबुदाणा मऊ, मोकळा भिजेल.
बटाटे उकडून घ्या.
जीरं आणि मिरच्या वाटून घ्या.
कोथिंबीर बारीक चिरा.
साबुदाण्यात कुस्करलेले बटाटे, दाण्याचं कूट, जीरं आणि हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट घाला.
एक – दोन चमचे तेल/तूप गरम करून तेही घाला.
ह्या मिश्रणात कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून हलक्या हाताने एकत्र करा.
आप्पेपात्राच्या प्रत्येक साच्यात थोडेसे तेल किंवा तूप घालून गॅसवर गरम करायला ठेवा.
तेल किंवा तूप गरम झाले की साबुदाण्याच्या मिश्रणाचे गोळे करुन प्रत्येक साच्यात ठेवा.
साबुदाण्याचे गोळे करताना आवडत असल्यास मध्ये काजू किसमिस घालू शकता.
आप्पेपात्रावर झाकण ठेवून मंद आचेवर वडे शिजवून घ्या.
खालची बाजू सोनेरी, खमंग झाली की वडे उलटून घ्या.
पुन्हा थोडेसे तेल किंवा तूप सोडून दुसर्‍या बाजूनेही खमंग करून घ्या.
गरमागरम साबुदाणा वडे हिरवी चटणी, टाॅमेटो केचपबरोबर enjoy करा.

2 thoughts on “उपासासाठी साबुदाणा वडे – आप्पेपात्रात

  1. Wow..mouth watering.. Thank you for this great piece..Looking for more.

Leave a Reply