दाक्षिणात्य सांबार मसाला रेसिपी – घरगुती आणि इंस्टंट रेसिपी

South Indian Sambar Powder Recipe – Homemade Sambar Podi

homemade sambar masala, south indian, sambar podi, easy recipe, zesty flavours

तसं बघितलं तर मसाले वगैरे घरी करत बसण्याइतका वेळ आणि patience हल्ली कुणाकडेच नसतो. बाजारात हवे त्या प्रकारचे, नामांकित ब्रँडसचे किंवा खास घरगुती पद्धतीने केलेले मसाले सहज मिळतात. सहसा आपण तेच आणतो. त्यातूनही केलाच तर काही काही घरांतून एखादा खास चवीचा कुटुंबात लागणारा पारंपारिक मसाला करण्याची पद्धत असतेही. नाही असं नाही. पण तो एखादाच. बाकी एरवी पावभाजी मसाला, छोले मसाला, चाट मसाला असे प्रकार आपण विकतच आणतो. शिवाय घरी मसाला करताना बारीकसारीक साहित्य जमवावे लागते. सरसकट विचार केला तर मसाला विकत आणणेच केव्हाही सोयीचे पडते.
पण सांबार मसाल्याचं तसं नाही. सांबार मसाला करताना फार वेगवेगळ्या प्रकारचे आख्खे मसाले लागत नाहीत. सगळे साहित्य कोरडेच भाजायचे असते, तेलावर नाही. त्यामुळे काम आणखी सुटसुटीत होतं आणि कितीही म्हटलं तरी ताजा मसाला घरी केल्यामुळे चवीचाही बोनस. मग काय हरकत आहे करून बघायला!

साहित्य –
1/4 वाटी आख्खे धणे किंवा पावडर
2 टे स्पून चण्याची डाळ
2 टे स्पून उडीद डाळ
1 टे स्पून तूर डाळ
2 टे स्पून किसलेले सुके खोबरे किंवा डेसिकेटेड कोकोनट
20 – 25 कढिपत्त्याची पाने
10 – 12 सुक्या मिरच्या
2 टी स्पून जिरं
2 टी स्पून काळी मिरी
1 टी स्पून मेथी
1/2 टी स्पून हळद
1/2 टी स्पून लाल तिखट

sambar masala preperation, red chilli, coriander, sambar

कृती –
मसाला करायच्या आधी डाळी स्वच्छ धुवून वाळवून घ्या.
धणे निवडून घ्या.
मिरच्यांचे देठ काढून मिरच्या निवडून घ्या.
हळद आणि तिखट सोडून सगळे साहित्य मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
थंड झाल्यावर मसाला मिक्सरवर अगदी बारीक दळून घ्या.
दळताना त्यात हळद आणि तिखट घाला.
थोडावेळ उघडा ठेवून नंतर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.

Leave a Reply