कंडेंस्ड मिल्क – घरच्या घरी

Homemade Sweetened Condensed Milk Recipe

मिल्क पावडर ही एक अशी वस्तू आहे की, जी हाताशी असेल तर अनेक पदार्थ – खास करून गोडधोड, वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्ने अगदी पटापट करू शकतो. विकत आणायची गरज नाही. सणासुदीच्या दिवसांत हमखास उपयोगी पडणारी वस्तू.
घरी कंडेंस्ड मिल्क करताना बेस म्हणून आपण मिल्क पावडरच वापरणार आहोत. कंडेंस्ड मिल्क घालून लाडू, वड्या, विविध प्रकारचे हलवे, केक, आईस्क्रीम असे खूप पदार्थ करता येतात. करून बघा. तुमचा विश्र्वास बसणार नाही इतक्या कमी वेळेत, अगदी बाजारातनं आणतो त्याच चवीचे कंडेंस्ड मिल्क घरी करता येते.
घट्ट झाकणाच्या डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवल्यास खूप दिवस टिकते.

homemade condensed milk, sweetned condensed milk, गोड पदार्थ, milk powder recipe, zesty flavours

साहित्य –
1 वाटी मिल्क पावडर
1 वाटी दूध
1 वाटी साखर
1 टे स्पून काॅर्नफ्लोर
1 टी स्पून तूप किंवा लोणी
कृती –
एका मोठ्या बोलमध्ये मिल्क पावडर, दूध, काॅर्नफ्लोर आणि साखर एकजीव करून घ्या.
गुठळ्या होऊ न देता गुळगुळीत मिश्रण तयार करा.
आता यात तूप घाला.
जाड बुडाच्या कढईत किवा नाॅनस्टिक पॅनमध्ये अगदी मंद आचेवर मिश्रण शिजत ठेवा.
एक सणसणीत उकळी येऊ द्या.
उकळी आल्यानंतर दोन – तीन मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.
पूर्ण गार होईपर्यंत अधूनमधून ढवळंत राहा.
गार झाल्यावर कंडेंस्ड मिल्क हवे तितके घट्ट होते.
लगेच वापरायचे नसल्यास घट्ट झाकणाच्या डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा.
फ्रिजमध्ये पुष्कळ दिवस टिकते.
कंडेंस्ड मिल्क घालून उपासासाठी पदार्थ करायचा असेल किंवा दूध छान घट्ट असेल (full cream) तर काॅर्नफ्लोर नाही घातले तरी चालेल.

Leave a Reply