कलिंगडाच्या सालीची भाजी

Watermelon Peels Sabji – Watermelon Rind curry

watermelon rind curry, watermelon, sabji recipes, kalingdachi saal, zesty flavours

करणार्‍या व्यक्तीसाठीच ही फक्त कलिंगडाच्या सालीची भाजी आहे. पण ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी दुधी भोपळ्याची भाजी. हो! शिजल्यावर सेम दुधी भोपळ्याच्या भाजीसारखीच चव लागते.

कलिंगडाच्या सालीचा उपयोग, भाजीसाठी, watermelon rind uses, zesty flavours

साहित्य –
2 वाट्या बारीक चिरलेली कलिंगडाची साल
1/4 वाटी भिजलेली चणाडाळ किंवा पिवळी मूगाची डाळ
2 – 3 टे स्पून तेल
2 – 3 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून गरम मसाला
फोडणीसाठी – मोहरी, हिंग आणि हळद
थोडासा गूळ
मीठ चवीप्रमाणे

कृती –
कलिंगडाची साल स्वच्छ धुऊन घ्या.
वाटल्यास थोडावेळ हळद आणि मीठाच्या पाण्यात घालून ठेवा.
भाजी करायच्या आधी सालीचा एक छोटासा तुकडा तोंडात टाकून बघा.
कडू वगैरे नसेल तर बारीक चिरून घ्या.
कढईत तेल तापवून सणसणीत फोडणी करा.
फोडणीत मिरच्या घालून त्या तळल्या गेल्या की पाणी निथळून भिजवलेली डाळ घाला.
मंद आचेवर परतून लालसर होऊ द्या.
अगदी थोडसं पाणी घालून झाकण ठेवा.
2 – 4 मिनिटांनी डाळ शिजली की चिरलेली भाजी घाला.
परतून झाकण ठेवा.
5 मिनिटांनी थोडसं गरम पाणी घालून परत झाकण ठेवा.
लागेल तसा अधून मधून पाण्याचा शिपका देत भाजी शिजवून घ्या.
जवळ जवळ शिजत आली की मीठ, गूळ आणि गरम मसाला घालून पूर्ण शिजवून घ्या.
या भाजीला निदान अंगाबरोबर तरी रस असल्यास भाजी चांगली लागते.

आवडत असेल तर फोडणीत लसूण घालता येईल.
वेगळ्या चवीसाठी मेथीदाणे आणि ओवा ही घालू शकता.
ही भाजी डायरेक्ट शिजायला थोडा वेळ लागतो.
घाई असेल तर आधी वाफवून घेऊन मग फोडणीला टाकली तर झटपट काम होईल.

Leave a Reply