काजू मोदक/पेढे

Kaju Modak / Peda Recipe – Cashew Sweets Recipe

kaju modak, kaju peda, cashew sweets, ganesh chaturthi, cashew, nuts, zesty flavours

गणपतीचे दहा दिवस म्हणजे गोडाधोडाची नुसती रेलचेल असते. पहिल्या दिवशी उकडीचे किंवा तळलेले मोदक आपण करतोच. त्याशिवाय सकाळ – संध्याकाळ आरतीसाठी वेगवेगळी खिरापत आणि नातेवाईक, मित्रमंडळींकडे जाताना नैवेद्यासाठी विविध स्वादाचे पेढे, मोदक बाजारात मिळतात. यावर्षी तर कोणाकडे जायचा यायचा प्रश्नच नाही. बाप्पाचे स्वागत शक्यतो घरच्या घरीच करू या. बाजारात गर्दी करण्यापेक्षा हे काजू मोदक/पेढे घरीच करून बघा.

साहित्य –
200 ग्रॅम काजू
1 1/4 वाटी दूध
1 वाटी साखर
1 वाटी मिल्क पावडर
2 टे स्पून बदाम + पिस्ता पावडर
2 टी स्पून तूप
1/2 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर

कृती –
मिक्सरमध्ये काजूची रवाळ पूड करा.
मिक्सर अगदी थांबून थांबून फिरवा.
म्हणजे तेल न सुटता रवाळ पूड होईल.

बदाम, पिस्त्याची पावडर किंवा बारीक चिरून पॅनमध्ये परतून काढून ठेवा.
आता पॅनमध्ये दूध आणि साखर घालून सणसणीत उकळी येऊ द्या.
दूध उकळलं की त्यात तूप घाला.
आता काजूची पावडर घालून गोळा होईपर्यंत शिजवा.
घट्ट गोळा झाला की वेलची, जायफळ आणि सुकामेवा घालून गॅस बंद करा.
मिश्रण थोडेसे गार होईपर्यंत अधून मधून ढवळत राहा.
गार होत आले की मिल्क पावडर घालून मिक्स करा.
साचा वापरून मोदक करा किंवा पेढे वळा.

Leave a Reply