लसणीची फोडणीची चटणी

Spicy Garlic Chutney Recipe – Different Way

spicy garlic chutney, chutney recipes, garlic, zesty flavours

लसणीचं तिखट आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. साध्या वरण भातापासून ते वडापाव पर्यंत सगळ्याची चव खुलवण्याचं काम हा पदार्थ करतो. पण कधी कधी तिच ती ठराविक चव बोअर होते.

मग तेच घटक पदार्थ वापरुन मंडळी नविन नविन प्रयोग करतात. आज यु ट्युबवर फेरफटका मारताना अशीच ही चटणी सापडली. सोप्पी आणि पटकन होणारी. मला स्वयंपाक करायला किंवा स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग करायला खूप आवडतं. पण तरीही सहसा किचकट, वेळखाऊ पदार्थांच्या वाटेला मी फारसं जात नाही.

आणि असं काहीतरी वेगळं केलं कि मग मला ‘खादाडी’ची आठवण येते. रेसिपी देते आहे, लगेच करुन बघा ही लसणीची चटणी.

साहित्य –

1 मध्यम वाटीभर बारीक चिरलेला लसूण

1/4 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट

1 टी स्पून जिरं

5 – 6 कढीपत्त्याची पाने

मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर

1/2 वाटी तेल (हो लागतं एवढं)

4 – 5 टी स्पून लाल तिखट

चवीप्रमाणे मीठ

कृती –

कढईत तेल गरम करा.

तेल चांगल तापलं कि त्यात जिरं घाला.

जिरं तडतडलं कि मग कढीपत्ता घाला.

मिनिटभर परतून घ्या.

मग कोथिंबीर घाला.

कोथिंबीर नीट तळली गेली कि लसूण घाला.

मीठही घाला.

लसणीचा कच्चेपणा जाऊन सोनेरी रंगावर आली कि गॅस बंद करा.

तेल किंचित थंड झाल्यावर त्यात तिखट आणि दाण्याचं कूट घालून मिक्स करा.

तेल आणि तिखट जरा सढळ हातानी घातल्यावरच या चटणीची खरी मजा येते.

पण झेपेल तसं कमी जास्त करू शकता.

Leave a Reply