वड्यांची रस्साभाजी – आप्पेपात्रातील रेसिपी

Vadyanchi Rassa Bhaji – Lentil Pops in Spinach Gravy

vadyanchi rassa bhaji, appepan recipe, vade recipe, lentil pops, spinach gravy, zesty flavours

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सांडग्यांना वडे म्हणण्याची पद्धत आहे. खरंतर तो बडी किंवा बडे या हिंदी शब्दाचा अपभ्रंश आहे. त्यामुळे नाव वाचून ही सांडग्यांची भाजी वाटली तरी तसं नाहीये.

परवा जेव्हा मी दहीवड्यांची रेसिपी शेअर केली तेव्हा ती आवडल्याचे आवर्जून बर्‍याच जणांनी सांगितले. ‘खादाडी’वरच्या तुमच्या प्रेमामुळेच मला नवनवीन रेसिपीज ट्राय करण्याचा उत्साह येतो. तर झालं असं की तेव्हा मला वड्यांचा आप्पेपात्रातला फोटो काढायचा होता पण मी विसरले. म्हणून मग आज ही वड्यांची भाजी केली.

दहीवडे आपण सहसा उडदाच्या डाळीचेच करतो. पण नुसते चटणीबरोबर खायला किंवा भाजीसाठी वडे करताना आवडीप्रमाणे उडीदडाळ, मूगडाळ किंवा चणाडाळ यापैकी कोणतीही डाळ किंवा मिक्स डाळीही घेता येतील. उडीद आणि चणाडाळीच्या तुलनेत मूगाची डाळ ही पचायला हलकी असते. मी केलेले वडे मूगाच्या डाळीचे आहेत.

साहित्य – (वड्यांसाठी)
1 वाटी पिवळी मूगडाळ
1 – 2 हिरव्या मिरच्या
आल्याचा तुकडा
थोडीशी हळद (ऐच्छिक, रंगासाठी)
मीठ

vadyanchi rassabhaji, masale, spices, gravy preperation, onions, tomato, zesty flavours

ग्रेव्हीसाठी –
4 वाट्या पालकाची पाने
2 कांदे
1 टाॅमॅटो
3 – 4 हिरव्या मिरच्या
आल्याचा तुकडा
4 – 5 लसणीच्या पाकळ्या
1 तमालपत्र
1 टी स्पून जिरं
1/2 टी स्पून गरम मसाला
3 – 4 टे स्पून तेल
मीठ

कृती –
डाळ 3 – 4 तास भिजत ठेवा.
चांगली भिजली की आलं, मिरच्या आणि मीठ घालून वाटून घ्या.
वाटताना लागेल तितकेच पाणी घालून घट्टसर वाटा.
आप्पेपात्राच्या वाट्यांमध्ये तेल घालून ते थोडेसे गरम झाले की डाळीचे मिश्रण घाला.
झाकण ठेवून वडे शिजू द्या.
खालची बाजू लालसर झाली की उलटून वरची बाजू करून घ्या.
वाटल्यास पुन्हा वरून थोडसं तेल घाला.
असे सगळे वडे करा.

vadyanchi rassabhaji, appepatrat vade, kofta, appepan, mini pancake maker, less oily, healthy recipe, zesty flavours
ग्रेव्हीसाठी सगळ्यात आधी पालक लागेल तसे पाणी घालून वाटून घ्या.
तयार प्युरी बाजूला काढून ठेवा.
मी पालक सहसा ब्लांच नाही करत.
तुम्ही आवडत असेल तर ब्लांच करू शकता.
आता कांदा, टाॅमॅटो, आलं, लसूण इ. सगळे मसाले गुळगुळीत वाटून घ्या.
कढईत तेल तापवून कांद्याचं वाटण परतून घ्या.
थोडसं परतून गरम मसाला घाला.
झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या.
आता त्यात पालक प्युरी घाला.
झाकण ठेवून शिजवा.
चांगला शिजला की वाटीभर पाणी घाला.
मीठ आणि थोडीशी साखर घालून 1 – 2 उकळ्या घ्या.
आता त्यात वडे आख्खे किंवा अर्धे कापून घाला.
वडे घातल्यानंतर पाच मिनिटांनी गॅस बंद करा.
थोडे मुरले की खायला घ्या.

Leave a Reply