शुगर फ्री मोदक (नाचणी – खजूर)

Sugar Free Ragi – Dates Modak Recipe / Ragi – Dates Sweets Recipe

ragi, dates, modak, sugarfree sweets, healthy recipes, zesty flavours, गोड पदार्थ

मग काय मंडळी कसं चालू आहे बाप्पाचं स्वागत? धूमधडाक्यात पण घरीचं करताय ना? करायलाच पाहिजे.🙂 बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मोदक नक्की करून बघा. करायला अगदी सोप्पे पण, चवीला तितकेच खमंग आणि पौष्टिक असे हे मोदक आहेत. ह्याचे वाटल्यास लाडूही वळू शकता किंवा वड्याही थापता येतील. ही रेसिपी मला माझी बहिण कल्याणीने सांगितली होती. तिने ह्या रेसिपीने लाडू केले होते. खूप दिवसापासून मला हे करून बघायचेच होते. शेवटी एकदाचा मुहूर्त मिळाला.

साहित्य –
1 वाटी नाचणीचे पीठ (अंदाजे 200 ग्रॅम)
1 1/2 वाटी कुस्करलेला खजूर
3/4 वाटी तूप
1 टे स्पून खसखस
थोडेसे काजू आणि पिस्ते भरडसर कुटून

कृती –
खसखस कढईत कोरडीच भाजून बाजूला काढून ठेवा.
काजू आणि पिस्तेही कोरडेच परतून घ्या.
आता 1/2 वाटी तूप गरम करून नाचणीचे पीठ खमंग भाजून घ्या.
नाचणीचे पीठ आणि खसखस एकत्र करून वेगळ्या बोलमध्ये काढून ठेवा.
कढईत राहिलेले तूप गरम करून खजूर चांगला खरपूस परतून घ्या.
आता सगळे पदार्थ एकत्र करून ठेवा.
मिश्रण कोमट झाले की थोडेसे मळून घ्या.
साचा वापरून छोटे छोटे मोदक करा किंवा लाडू वळा.

2 thoughts on “शुगर फ्री मोदक (नाचणी – खजूर)

Leave a Reply