गाजर हलवा – गाजरं न किसता, सोप्या पद्धतीने

Gajar ka Halwa – Indian Style Carrot Pudding Recipe Using Pressure Cooker

Gajar Halwa, Carrot Pudding, Without Grating, Easy Method, Dessarts, Mithai, Zesty Flavours

डिसेंबर, जानेवारी महिन्यात मस्त थंडी पडली की घरी गाजर हलवा गाजर हलवा असा जप सुरु होतो. पण हलवा करण्याआधी गाजरं किसणं हे एक मोठं आव्हान असतं. यावेळेस नेटवर शोधाशोध केल्यावर एक झकास उपाय सापडला. नो किसण्याची कटकट.

साहित्य-

1 किलो गाजरे, 1/2 ली दूध, 1 मोठी वाटी साखर, 2-3 टिस्पून तूप, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटस्, वेलची पूड.

कृती-

गाजरे स्वच्छ धुऊन सालं काढून घ्या. गाजराचे उभी आणि आडवी चिरून मोठे मोठे तुकडे करुन घ्या. गॅसवर कुकर ठेवून त्यात चिरलेली गाजरं आणि दूध घाला. कुकरच्या साइजप्रमाणे गाजरं शिजण्यासाठी आवश्यक तेवढे दूध अंदाजाने घाला. दूध जास्त झाल्यास शिजताना बाहेर येऊन कुकर खराब होतो. 2-3 शिट्टया झाल्यावर गॅस बंद करा.

वाफ पूर्ण जिरली की कुकर उघडा. गाजरं छान मऊ शिजलेली दिसतील. पावभाजी मॅशरने किंवा रवीने घोटून एकजीव करून घ्या. झालं काम. पुढची कृती मग नेहमी प्रमाणे.

आधी सगळे दूध घातले नसल्यास आता घाला. दूध आटवून घ्या. नंतर साखर घाला. साखर विरघळली की हवा तितका कोरडा होईपर्यंत परतून घ्या. शेवटी थोडसं तूप घालून पुन्हा छानपैकी परतून घ्या. गॅस बंद करा. वेलची पूड आणि ड्रायफ्रूटस् घाला. ड्रायफ्रूटस् मी चमचाभर तूपात परतून घेऊन मग घालते त्यामुळे कच्चट न लागता मस्त खमंग लागतात.

Leave a Reply