गरमागरम चिजी आणि क्रिमी पोटॅटो सूप

Delicious Cheesy and Creamy Potato Soup with Milk

potato soup recipe, सूप रेसिपी, बटाट्याचे सूप, creamy, cheesy, zesty flavoures

फ्राइज असो किंवा वडापाव नाहीतर चीप्स बटाटा जगात सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. हे नेहमीचे पदार्थ तर आपण खातच असतो. पण बटाट्याचा एक वेगळा पदार्थ म्हणून कधीतरी हे सूप नक्की करून बघा.

साहित्य –
2 – 3 मध्यम बटाटे
3 – 4 लसूण पाकळ्या
2 – 3 पातीचे कांदे
4 – 5 वाट्या दूध
4 टे स्पून लोणी
मीठ
मिरपूड
1/2 वाटी किसलेलं चीज (ऐच्छिक)

कृती –
भाजीसाठी उकडतो तसे बटाटे उकडून घ्या.
कांदापात आणि लसूण बारीक चिरा.
पॅनमध्ये लोणी गरम करा.
लोणी गरम झालं की जाडसर कुस्करलेले बटाटे, कांदापात, लसूण लोण्यावर परतून घ्या.
रंग बदलणार नाही इतपत परता.
परतताना त्यात चवीप्रमाणे मिरपूड घाला.
हे सगळं थंड झालं की थोडसं दूध घालून मिक्सरमध्ये पेस्ट करा.
आता ही पेस्ट उरलेलं दूध घालून उकळायला ठेवा.
मीठ आणि हवं असल्यास चीज घाला.
हे सूप नेहमीच्या सूप सारखं पातळ नसून पिठल्यासारखं घट्ट असतं.
पण आपल्या आवडीप्रमाणे थोडं पातळ करू शकता.
शिवाय उकळताना बटाटा दूध शोषून घेतो.
त्या अंदाजाने दूध घाला.
एक सणसणीत उकळी आली की गॅस बंद करा.
वरून थोडी मिरपूड आणि कांदापात घालून प्यायला द्या.

Leave a Reply