मकर संक्रांत स्पेशल भोगीची मिक्स भाजी – लेकुरवाळी भाजी

Bhogichi Bhaji – Mankar Sankranti Special Authentic Maharashtrian Mix Vegetable Stew Recipe

bhogichi bhaji, lekurwali bhaji, makar sankranti special, mix veg stew, zesty flavours

आपल्या सणांचे पारंपारिक पदार्थ आणि नैवेद्य ऋतुंप्रमाणे ठरलेले आहेत. हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर भाज्या येतात. मग काय! मिक्स करा आणि खा. दक्षिण भारतातील अवियल असो, गुजरातमधले उंधियो किंवा आपली भोगीची भाजी. नावं फक्त वेगवेगळी आहेत. उंधियो आणि अवियलपेक्षा भोगीची भाजी पटकन होणारी, कमी खटाटोप असणारी आहे.

साहित्य –
1 वाटी मटार
1 वाटी वांग्याचे तुकडे
1 वाटी गाजराचे तुकडे
1 मोठा बटाटा
1 टाॅमॅटो

भोगीच्या भाजीसाठी मटार, green peas, mix veg stew, zesty flavours
भोगीच्या भाजीसाठी गाजरे, carrots, mix veg stew, zesty flabours
भोगीची भाजी, मोठा बटाटा, potato, mix veg stew, zesty flavours
भोगीची भाजी, वांगे, eggplant, brinjal, aubergine, zesty flavours
1/2 वाटी भाजलेले तीळ
1/4 वाटी दाण्याचे कूट
1/4 वाटी ओला नारळ किंवा सुक्या खोबर्‍याचा किस
1 टी स्पून धणेपूड
1/2 ते 1 टी स्पून लाल तिखट
1 – 2 टीस्पून गरम मसाला
साधारण 1/2 टी स्पून चिंचेचा कोळ
गूळ आणि मीठ
फोडणीसाठी –
3 – 4 टे स्पून तेल
मोहरी, हिंग, हळद
कढीपत्ता

कृती –
मिक्सरमध्ये चटणीच्या भांड्यात तीळ, दाण्याचं कूट आणि खोबरं कोरडंच बारीक वाटून घ्या.
कढईत तेल घालून चांगलं तापलं की मोहरी, हिंग घालून
फोडणी करा.
फोडणीत कढीपत्ता घाला.
कढीपत्ता तळला गेला की टाॅमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता.
नंतर हळद, धणेपूड, लाल तिखट आणि तीळकूट घाला.
सगळे मसाले तेल सुटेयर्यंत चागले परता.
आता एकेक भाजी घालून थोडं परता आणि झाकण ठेवा.
वाफेवर भाज्या थोड्या शिजल्या की मग मधून मधून गरम पाणी घालत भाजी शिजवून घ्या.
भाजी पूर्ण शिजत आली की गूळ, मीठ, गरम मसाला आणि चिंचेचा कोळ घाला.
जेवढा रस हवा असेल तितके पाणी घाला आणि एक वाफ घ्या.
भोगीच्या भाजीबरोबर तीळ घालून बाजरीची भाकरी, लोणी आणि लसणीचं तिखट मस्ट आहे.😋

भोगीची भाजी, तीळ, बाजरीची भाकरी, लोणी, लसूण चटणी, zesty flavours
हिवाळ्यात मिळणार्‍या ओले हरबरे, पावटे, वालपापडीच्या शेंगा या मुख्य भाज्यांशिवाय भोगीच्या भाजीला मजा नाही.
पण आम्हाला ओले हरबरे आणि पावटे वगैरे गुणी भाज्या इकडे मिळतच नाहीत.
वाल पापडीच्या शेंगा इथल्या सुपर मार्केटात खूप छान मिळतात.
पण मी नव्हत्या घातल्या.
या शेंगा मला खूप आवडतात, त्यामुळे आवड्यातून एकदा तरी ही भाजी आमच्याकडे असतेच.
दोन दिवसापूर्वीच वालपापडीची भाजी केली होती, त्यामुळे शेंगा घरी नव्हत्या.
आजच्यासाठी ठेवायला मी विसरले आणि जाऊन आणायला वेळ नव्हता.
सो पुढच्या वेळेस.

Leave a Reply