साऊथ इंडियन नारळाची चटणी(इडली, डोसे प्रकारांसाठी)

Coconut Chutney for South Indian Recipes

coconut chutney, chutney recipes, south indian recipes, coconut, zesty flavoures

साहित्य –

1 वाटी नारळाचा चव किंवा रेडिमेड डेसिकेटेड खोबरं
1/4 वाटी भिजलेली चणाडाळ
1 टी स्पून जिरं
4 – 5 हिरव्या मिरच्या
1 इंच आल्याचा तुकडा
चवीप्रमाणे मीठ

फोडणीसाठी-
1 टे स्पून तेल
मोहरी
हिंग
1 टी स्पून उडीद डाळ
कढीपत्ता
2 – 3 सुक्या मिरच्या

कृती –
रेडिमेड खोबरं वापरणार असाल तर चटणी वाटण्याआधी थोडावेळ त्यात थोडसं गरम पाणी घालून भिजत ठेवा.
मिक्सरमध्ये नारळ, चणाडाळ आणि चटणीसाठी लागणारे साहित्य एकत्र करून आवश्यक तेवढे पाणी घालून सरसरीत चटणी वाटा.
ही चटणी थोडीशी पातळच छान लागते, त्याप्रमाणे पाणी घाला.
छोट्या कढईत तेल चांगले गरम करा.
तेल तापले की फोडणीचे सर्व साहित्य घालून खमंग फोडणी करा.
फोडणीत उडीद डाळ घातली की चांगली परतून लाल होऊ द्या.
चरचरीत फोडणी चटणीवर ओतून छानपैकी मिक्स करा.

आवडत असतील तर चटणीत 2 – 4 लसणीच्या पाकळ्या वाटताना घातल्या तर चांगल्या लागतात.

Leave a Reply