मऊ, लुसलुशीत इडली रेसिपी – इडली रवा, उकडा तांदूळ न वापरता

South Indian Idli Recipe – Soft, Spongy Idli Recipe – No Boiled Rice – No Idli Rava

soft, spongy idli, no boiled rice, no idli rava, idli recipes

‘अण्णा’कडे न जाताही तुम्हाला मऊ, लुसलुशीत, हलक्या, जाळीदार इडल्या खायच्या आहेत का? प्रत्येकाच इडलीच प्रमाण वेगवेगळं असतं. आज मी इडलीची जी रेसिपी देत्येय ती चक्क बासमती तांदळाची आहे. म्हणजे तुम्हाला उकडा तांदूळ, तांदळाचा रवा यापैकी काहीही आणायला नको. मी कधीच आणत नाही. परदेशात असताना बासमतीला पर्यायचं नसतो. परदेशात सहसा तांदळात बासमती आणि सोनामसूरी हे दोनच प्रकार मिळतात किंवा मग चायनीज, जॅपनीज चिकट तांदूळ. तुम्ही रोज भातासाठी नेहमी घरी जो तांदूळ वापरता पूर्ण त्याच्याच इडल्या एकदा करूनच बघा.

साहित्य –
2 वाट्या तांदूळ (कोणताही)
1 वाटी उडीदडाळ
1 वाटी शिजलेला भात/कच्चे पोहे (जाडे किंवा पातळ)/चुरमुरे
1 टी स्पून मेथीदाणे

कृती –
तांदूळ आणि उडीदडाळ बुळबुळीतपणा जाईपर्यंत दोन चारदा नीट चोळून धुवा.
दोन्ही वेगवेगळं भरपूर पाण्यात 5 – 7 तास भिजत घाला.
मेथीदाणे तांदळातच भिजवा.
डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले की उपसून मिक्सरमध्ये बारीक वाटा.
वाटताना आधी डाळ आणि मग तांदूळ वाटा आणि मोठ्या भांड्यात मिक्स करा.
डाळ आणि तांदूळ अगदी बारीक गुळगुळीत वाटले जातील पण मिश्रण पातळ होणार नाही इतपत पाणी वापरा.
शेवटची बॅच वाटताना त्यात भात किंवा पोहे, चुरमुरे यापैकी जे घालणार असाल ते घाला.
पोहे किंवा चुरमुरे घालताना ते पाण्यात भिजवून मग घाला. (फोडणीच्या पोह्यांना भिजवतो तसं)
भांड्यात बॅटर काढल्यावर डावाने थोडंस एकाच दिशेने ढवळून फेटून घ्या.
झाकून आंबण्यासाठी ठेवून द्या.

perfect idli batter, idli batter consistency, soft, spongy idli, zesty flavoures
गरम आणि दमट हवामान असेल तर 6 – 7 तासांत पीठ परफेक्ट आंबेल.
याउलट थंडीत 24 तास किंवा थोडा जास्त वेळ लागेल.
भात, पोहे किंवा चुरमुरे घातल्यामुळे पीठ खूप छान आंबतं आणि कमी वेळेत होतं.
पीठ व्यवस्थित आंबल्यावरच इडल्या करा.
well fermented idli batter, perfect idli batter, soft spongy idli, zesty flavoures
इडल्या करताना आयत्यावेळेस मिश्रणात मीठ घालून ढवळून घ्या.
इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा.
इडलीच्या जाळ्यांना तेल लावा.
प्रत्येक साच्यात साचा पूर्ण भरेल इतकं पीठ घाला.
सगळ्या जाळ्या कुकरमध्ये ठेवून झाकण ठेवा.
12 – 15 मिनिटे मोठ्या गॅसवर वाफवा.
इडल्या झाल्या की जाळ्या बाहेर काढा आणि थोड्या गार होऊ द्या.
म्हणजे इडल्या न चिकटता सुटसुटीत निघतात.
गरम इडल्या सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करा.

याच पीठाचे तुम्ही डोसे किंवा उत्तप्पेही करू शकता.
थंडीच्या सीझनमध्ये घाई असेल तर पीठ उबदारजागी ठेवलं तर लवकर आंबेल.
हिटरजवळ किंवा ओव्हन चालू न करता, फक्त लाईट आॅन करून ओव्हनमध्ये ठेवा.
पीठ आंबल्यावर इडल्या लगेच करायच्या नसतील आठवणीने पीठ फ्रिजमध्ये टाका.
म्हणजे पीठ फसफसून पातेल्याबाहेर सांडणार नाही.
4 – 5 दिवस पीठ फ्रिजमध्ये आरामात टिकते.

नाश्त्यासाठी काही पौष्टिक प्रकार –

Leave a Reply