चीज (पिझ्झा) पराठा – 2

Pizza Flavoured Cheese Paratha – Indian Flatbread

pizza flavoured, cheese paratha, indian flatbread, paratha recipes

या आधी आपण चीज किसून, भरून केलेला पराठा बघितला.

चीज पराठा – 1

आजही आपण stuffed पराठाच करणार आहोत. पण करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पिझ्झा पराठा नक्की आवडेल.

साहित्य-
2 वाट्या कणिक
2 टे स्पून तेल
2 टे स्पून इटालिअन सिझनिंग

1 टे स्पून ओरिगॅनो
1 टी स्पून चिली फ्लेक्स
8 – 10 चीज स्लाईसेस
चवीप्रमाणे मीठ
थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कांदापात (कांदे नको)

कृती –
कणकेत तेल आणि सगळे मसाले घालून मिक्स करा.
कांदापात घालून कणिक भिजवा.
कणिक साधारण मऊ अशी भिजवा.
खूप घट्ट नको.
आता कणकेचा एक गोळा घेऊन थोडी मोठी पोळी लाटा. आपल्याला पोळीच्या मधोमध चीज स्लाईस ठेवायची आहे.
त्यामुळे पूर्ण चीज स्लाईस कव्हर होईल इतकी मोठी पोळी लाटा.
लाटलेल्या पोळीवर एक चीज स्लाईस ठेेवा.
माझ्याकडे असलेल्या चीज स्लाईसेस मोठ्या होत्या.
त्यामुळे मी त्या फोल्ड करून अर्ध्या केल्या.

pizza flavoured, cheese paratha, paratha recipes
आता पोळी डावीकडून दुमडा.
folded paratha, pizza flavoured, cheese paratha, paratha recipes
तसाच पोळीचा उजवा भागही दुमडा.
folded both sides, pizza flavoured, cheese paratha, paratha recipes
याप्रमाणेच वरचा भागही मधोमध अर्धा दुमडा.
folded upper side, pizza flavoured, cheese paratha, paratha recipes
 
खालचा भाग फोल्ड करताना थोडासा वरच्या भागावर येईल अश्या रितीने दुमडून बंद करा.
पराठा चौकोनी पाकिटाच्या आकाराचा करा.
square paratha, envelop paratha, pizza flavoured, cheese paratha, paratha recipes
लाटणं फिरवून सारखा करा.
तवा तापत ठेवून, तेल किंवा बटर सोडून पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या.
टाॅमॅटो केचप किंवा पिझ्झा साॅसबरोबर सर्व्ह करा.
जर तुम्ही लहान चीज स्लाईसेस वापरणार असाल तर एकावर एक अश्या दोन स्लाईसेस ठेवा.
त्यासाठी वर दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त स्लाईसेस लागतील.

5 thoughts on “चीज (पिझ्झा) पराठा – 2

  1. मस्तं नाश्त्यासाठी नवीन छान पदार्थ मिळाला👌👌👍👍

Leave a Reply