होममेड न्यूटेला रेसिपी – सोपी आणि झटपट

Homemade Nutella Recipe without Hazelnuts

homemade recipes, nutella, without hazelnuts, zesty flavours

रेडिमेड न्यूटेलामध्ये हेजलनटस् असतात. जे सगळीकडे सहज मिळतीलच असे नाही. पण हेजलनटस् न घालताही अगदी सोप्प्या पद्धतीने न्यूटेला घरी करता येतं. काही काही पदार्थ असे करून बघायलाही मजा येते. केल्यावर तुमचाही विश्र्वास बसणार नाही की जो पदार्थ आपण नेहमी विकतच आणत होतो तो तसाच्या तसा इतक्या सहजरित्या आपण घरी केला आहे.

साहित्य –
150 ग्रॅम कोणतही प्लेन मिल्क चाॅकलेट (कॅडबरी)
150 ग्रॅम भाजलेले काजू (मीठ नसलेले)
1 टेस्पून तेल
2 – 4 टेस्पून पिठीसाखर
1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स

कृती –
एका वाटीत चाॅकलेट तुकडे करून घ्या.
आता चाॅकलेट काचेच्या एका मोठ्या बोलमध्ये काढा.
त्याच वाटीने मोजून एक वाटी काजू घ्या.
काजू रोस्टेड नसतील तर भाजून घ्या.

nutella using cashew, without hazelnuts, zesty flavours
डबल बाॅयलर पद्धत वापरून किंवा मायक्रोवेवमध्ये कमी पाॅवरवर चाॅकलेट वितळवून घ्या.
चाॅकलेट वितळले की त्यात चमचाभर तेल घालून स्मूथ फेटून घ्या.
चाॅकलेट गार करत ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात काजू घालून आधी बारीक पावडर करा.
मग थांबून थांबून पल्स करत तेल सुटेपर्यंत काजूची पेस्ट करा.
oil release, ground chashew paste, homemade nutella, zesty flavoures
आता या पेस्टमध्ये चाॅकलेट, पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून एकदा फिरवून सगळं मिक्स करा.
तयार न्यूटेला बरणीत भरून ठेवा.

न्यूटेला करताना काजूऐवजी बदाम किंवा शेंगदाणेही घेता येतात.

मारी किंवा डायजेस्टिव सारखे कोणतेही अगोड बिस्किट घेऊन त्यावर न्यूटेला पसरून लावा.
वर ड्रायफ्रुटसचा चुरा किवा रंगीत स्प्रिंकल्स घाला.

गॅस न वापरता हे झटपट डेझर्ट अगदी लहान मुलंही करू शकतात.
माझ्या मुली लहान असताना जॅम वापरून हा प्रयोग करायच्या.

असाच केकही डेकोरेट करू शकता.

2 thoughts on “होममेड न्यूटेला रेसिपी – सोपी आणि झटपट

Leave a Reply