नागपुरी पुरणपोळी रेसिपी – नो फेल रेसिपी

Nagpuri Puranpoli Recipe – Sweet Lentil Stuffing Flatbtead – Authentic Maharashtrian Dessert

puranpoli recipe, nagpur, authentic maharashtrian, dessert,sweet flatbread

पुरणपोळी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची शान आहे. ‘हसवणूक’मध्ये पुलंनी म्हटल्याप्रमाणे ज्या मराठी घरात वर्षातून कमीत कमी एकदातरी पुरणपोळी होत नाही ते घर मराठी नाहीच. पण गंमत म्हणजे ही पुरणपोळी महाराष्ट्रात सगळीकडे सरसकट एकाच चवीची अजिबातच नसते आणि हेच तिचे खास वैशिष्ट्य आहे. काही ठिकाणी फक्त गुळाची, काही ठिकाणी फक्त साखरेची, काही कुटुंबांत पुरणपोळी करताना गूळ आणि साखर दोन्ही घालतात. काही ठिकाणी पुरणपोळ्या अगोड करून गुळवणी, नारळाच्या किंवा साध्या दूधात गूळ, साखर घालून त्यात बुडवून खातात.

विदर्भात पुरणपोळी पूर्ण साखरेची आणि भरपूर पुरण भरलेली जाडजूड असते. साखरेमुळे हे पुरण कोरडे, भगराळ न होता, ओलसर होते.
पुरणपोळीची रेसिपी शेअर करण्याआधी त्या संदर्भातली एक गंमतही मला शेअर करायची आहे. अमेरिकेत जसं ‘गुडविल’ आहे तसंच आमच्या आरन्हेममध्ये ‘टू स्वीच’ नावाचं दुकान आहे. काही दिवसांपूर्वी मनालीला तिच्या प्रोजेक्टसाठी काही मटेरिअल हवे होते. म्हणून मनाली आणि मनिष ‘टू स्वीच’मध्ये गेले होते. येताना चक्क काय घेऊन आले असतील?🙂
हे आमचे डच पुरणयंत्र.

puranpoli recipe, nagpur, authentic maharashtrian, desserts, sweet flatbread
ओके. तर आता पुरणपोळी करू या.
puranpoli recipe, nagpur, authentic maharashtrian, desserts

साहित्य –
पोळीसाठी –
1 वाटी कणिक
1/2 वाटी मैदा किंवा न भाजलेला बारीक रवा (मी रवा घेतला आहे)
1/2 वाटी तेल
किंचीत मीठ

पुरणासाठी –
1वाटी चण्याची डाळ
11/2 वाटी साखर
चिमूटभर हळद
1 टी स्पून वेलची पूड
1/2 टी स्पून जायफळ पूड

कृती –
कणिक आणि मैदा मिक्स करून चाळून घ्या.
रवा घालणार असाल तर नुसती कणिक चाळून घ्या.
कणिक, रवा/मैदा व मीठ घालून, तेल न घालता घट्ट भिजवा.
एका बोलमध्ये कणकेचा गोळा ठेऊन त्यात कणिक पूर्ण बुडेल इतके पाणी ओता.
एक ते दोन तास कणिक पाण्यात भिजत ठेवा.

पुरणपोळीची कणिक, puranpoli recipe, authentic maharashtrian dessert
दोन तासांनी कणिक निथळून घ्या.
कणिक चांगली सैल झालेली दिसेल.
पुरणपोळीची सैल कणिक, puranpoli recipe, authentic maharashtrian dessert
आता कणकेत 2 – 3 टे स्पून तेल घालून 10 – 15 मिनिटे कणिक चांगली भरपूर मळून घ्या.
आता परत कणिक बोलमध्ये ठेऊन त्यावर राहिलेले तेल ओता.
कणिक तासभर तरी तेलात मुरली पाहिजे.
पुरणपोळीची तेलात बुडलेली कणिक, puranpoli recipe, authentic maharashtrian dessert
पुरणपोळ्या करताना कणिक खूप मळून घ्या.
म्हणजेच कणकेला चांगली तार सुटली पाहिजे.
कणिक साधारण एक फुटावरून खाली सोडली तर न तुटता खालपर्यंत पोहोचली पाहिजे.
कणकेला तार सुटणे, पुरणपोळीची तिंबलेली कणिक, puranpoli recipe
चण्याची डाळ दोन तीनदा स्वच्छ धुऊन घ्या.
डाळीत भरपूर पाणी घालून कमीत कमी दोन तीन तास किंवा रात्रभर भिजवा.
नंतर डाळीत तीन वाट्या पाणी, हळद आणि चमचाभर तेल घाला.
तेल घातल्यामुळे डाळ कुकरच्याबाहेर उतू जात नाही.
कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून डाळ मऊ शिजवून घ्या.
वाफ जिरल्यावर कुकर उघडून कट गाळून घ्या.
डाळीत साखर घालून पुरण शिजायला ठेवा.
मध्यम आचेवर सतत परतत पुरण घट्ट शिजवा.
पुरण परफेक्ट शिजल्याची खूण म्हणजे कालथा पुरणात उभा ठेवल्यावर न पडता काही सेकंद उभा राहिला पाहिजे.
पुरण शिजवणे, पुरण शिजल्याची खूण, puranpoli recipe
याप्रमाणे पुरण शिजल्यावर गॅस बंद करा.
पुरणात वेलची आणि जायफळ पावडर घालून ढवळून घ्या.
गरम असतानाच पुरण यंत्रातून किंवा पुरणाच्या चाळणीतून पुरण गाळून घ्या.
पुरण संपूर्ण गार झाल्यावरच पोळ्या करायला घ्या.

तवा मध्यम आचेवर तापत ठेवा.
कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याच्या दिडपट तरी पुरणाचा गोळा घ्या.

कणिक आणि पुरणाचे प्रमाण, puranpoli recipe, authentic maharashtrian
कणकेची हातावर वाटी करून त्यात पुरण भरून गोळा बंद करा.
हलक्या हाताने तांदळाच्या पिठीवर पोळी लाटा.
तांदळाच्या पिठामुळे पोळ्या सरसरीत लाटता येतात.
लाटलेली पोळी अलगद हाताने किंवा लाटण्यावर घेऊन तव्यावर टाका.
तूप सोडून खमंग भाजा.
मऊ लुसलुशीतपुरणपोळ्या, नो फेल रेसिपी, puranpoli recipe

Leave a Reply