उपासासाठी साबुदाण्याचे खमंग लाडू

Sabudana Laddu Recipe for Vrat – Sweet Sago Balls Dessert

sabudana laddu, vrat recipes, sabudana, laddu recipes

तुम्ही आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले आणि खाल्ले असतील. पण तुम्हाला काहीतरी वेगळी चव ट्राय करायची असेल तर यावर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे एकदम हटके प्रकारचे व अगदी सोप्पे असे लाडू करून बघा. एरवीही उपास म्हटला की ताटात त्याच त्या ठराविक पदार्थांचा कंटाळा येतो. त्यामुळे तुमचा उपास असला किंवा नसला तरी चवीत बदल म्हणून करून आवर्जून करून बघण्यासारखा हा पदार्थ आहे.

साहित्य –
1 वाटी साबुदाणा
1/2 ते 3/4 वाटी पिठीसखर
1/2 वाटी दूध
1/4 वाटी तूप
1 टी स्पून वेलची पूड
आवडीप्रमाणे बदाम, पिस्ते बारीक चिरून
केशर (एच्छिक)

कृती –
लाडूत केशर घालणार असाल तर 1/2 वाटी दूध गरम करून त्यात केशराच्या काड्या घालून भिजवून ठेवा.
सुकामेवा नुसताच किंवा तुपावर जरासा परतून घ्या.
आता साबुदाणा भाजायला घ्या.
मंद आचेवर लालसर होईपर्यंत साबुदाणा अगदी खमंग भाजा.
साबुदाणा किंचीतही कच्चा राहू देऊ नका.

roasted sabudana, golden brown sabudana, laddu recipes
हे साबुदाणा भाजण्याचे मुख्य काम झाल्यावर पुढचे काम अगदी सोप्पं आहे.
साबुदाणा व्यवस्थित गार झाला की मिक्सरमध्ये अगदी बारीक पीठ करा.
मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या.
त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
तूप गरम करून घाला.
केशराचे किंवा साधे दूध गरम करा.
थोडं थोडं दूध लाडूच्या मिश्रणात घालून मळून गोळा करा.
सुकामेवा घालून लहान लहान लाडू वळा.

Leave a Reply