वांग्याचे भरीत (अव्हनमध्ये)

Baingan ka Bharta Recipe in Oven – Spiced and Mashed Aubergine or Eggplant Dish

baingan bharta, eggplant recipes, baingan recipes,brinjal

गॅसवर (flame) भाजलेल्या वांग्याची चव कितीही खरपूस लागत असली, तरी अव्हनमध्येही वांगी तितकीच छान भाजली जातात. सो तुमच्याकडे इलेक्ट्रिक काॅईल्स असल्या तरी तुम्ही मनात येईल तेव्हा वांग्याचं भरीत खाऊ शकता. विशेषत: परदेशात असाल तर अव्हनचा पुरेपूर उपयोग करता येतो. बार्बेक्यु वगैरे लाड तर फक्त उन्हाळ्यातच शक्य असतात. मग काय वांग्याचं भरीत खायचच नाही का? खायचं ना. फक्त वांगी अव्हनमध्ये भाजायची. वांगी अव्हनमध्ये भाजा किंवा गॅस बर्नरवर भरताला खास, खमंग चव आणण्यासाठी मी एक युक्ती सांगणार आहे.

साहित्य –
3 – 4 भरताची वांगी
5 – 6 लसणीच्या पाकळ्या
3 – 4 हिरव्या मिरच्या
1 इंच आल्याचा तुकडा
1 – 2 कांदे
1 टॉमॅटो
1/2 वाटी ओबडधोबड कुटलेले शेंगदाणे
3 – 4 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरं
1 टी स्पून हळद
1/2 ते 1 टी स्पून लाल तिखट
1/2 ते 1 टी स्पून गरम मसाला
मीठ
कृती –
वांगी स्वच्छ धुऊन प्रत्येक वांग्याला देठापासून खालपर्यंत तीन ते चार चीरा द्या.
या चीरा थोड्याशा खोल द्या.
लसूण सोलून घ्या.
आल्याचे पातळ काप करा.
आता प्रत्येक वांग्याच्या चीरांमध्ये आलं, लसूण आणि मिरच्या भरा.

baingan bharta, eggplant recipes, baingan recipes, brinjal


वाग्यांना तेलाचा हात लावून घ्या.
अव्हन ग्रील मोडवर (Grill + Fan) 180०Cवर 10 – 15 मिनिटे प्रीहिट करा.
अव्हन प्रीहिट झाल्यावर 180०C वर 35 ते 40 मिनिटे वांगी ग्रील करा.
भाजताना वांगी  अधून मधून खालीवर करा, म्हणजे सगळ्या बाजूने वांगी व्यवस्थित भाजली जातील.

baingan bharta, eggplant recipes, baingan recipes, brinjal


वांगी गार झाली की आलं, लसूण आणि मिरच्या काढून घ्या आणि सालं काढून मॅश करा.
आलं, लसूण आणि मिरच्या चुरडून ठेचा करा.
वांगी नीट भाजली गेली असल्यामुळे अजिबात गर न चिकटता सालं सहज सुटून येतात.
आता कढईत तेल गरम करून जिर्‍याची फोडणी करा.
जिरं तडतडलं की आलं, लसूण घालून परता.
त्यावर बारीक चिरलेला कांदा घाला.
कांदा चांगला लाल होईपर्यंत खमंग करा.
मग त्यात बारीक चिरलेला टाॅमॅटो घालून थोडं परता.
टाॅमॅटो थोडासा मऊ झाला की हळद आणि लाल तिखट घालून तेल सुटेपर्यंत परता.
आता त्यात शेंगदाणे घालून, चांगले तळले गेले की वांग्याचा गर आणि मीठ घाला.
वांगी तेल सुटेपर्यंत अधून मधून परतत राहा.
सगळ्यात शेवटी गरम मसाला घालून गॅस बंद करा.
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी किंवा पोळीबरोबर गरम गरम भरताचा आस्वाद घ्या.

आलं, लसूण आणि मिरच्या वांग्याबरोबरच भाजल्या गेल्यामुळे भरीत खूपच स्वादिष्ट लागते.
भरीत जास्त झणझणीत हवे असल्यास हिरव्या मिरच्या आणि तिखटाच प्रमाण आवडीप्रमाणे वाढवा.

Leave a Reply