ब्लूबेरी आईस्क्रीम – न शिजवता, फक्त तीन वस्तू वापरून

No Cook – BLUEBERRY ICE CREAM – 3 Ingredients

No Cook, Blueberry, Ice cream, 3 Ingredients

आज मी जे आईस्क्रीम शेअर करणार आहे, तो स्वाद नेहमीपेक्षा वेगळा आहे. पण करायला अगदी सोप्प, 5 मिनिटांत होणारं आहे. म्हणजे मिक्सरमधली 5 मिनिटे. या आधी मी मँगो आईस्क्रीमची रेसिपी शेअर केली होती ती सुद्धा अशीच पटकन होणारी न शिजवता करायची आहे.

मँगो आईस्क्रीम

यावेळेस आपण ब्लूबेरीआईस्क्रीम कसं करायचं ते बघू. तेही फक्त 3 प्रकारचे साहित्य वापरून न शिजवता.

साहित्य –
1 मोठी वाटी भरून ब्लूबेरीज (अंदाजे 200 ग्रॅम)
1 टिन मिल्कमेड किंवा कोणतही स्वीट कंडेंस्ड मिल्क (400 ग्रॅम)
200 – 250 मिली फ्रेश क्रिम
चवीप्रमाणे साखर

कृती –
फ्रेश क्रिम वापरण्याआधी फ्रिजमध्ये थंड करत ठेवा.
थंड फ्रेश क्रिम आणि कंडेंस्ड मिल्क हलके होईपर्यंत मिक्सरमध्ये pulse करा.
आता हे मिश्रण बोलमध्ये काढून घ्या.
ब्लूबेरीजही मिक्सरमध्ये वाटून प्युरी करा.
ही प्युरी कंडेंस्ड मिल्कच्या मिश्रणात मिक्स करा.
चव बघून लागली तरचं साखर घाला.
आता हे कंटेनरमध्ये घालून फ्रिज करा.
2 – 3 तासांनी किंवा रात्री फ्रिजरमध्ये ठेवलं असल्यास सकाळी 5 मिनिटे बाहेर काढून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि परत फ्रिज करायला ठेवा.
दुपारी जेवणानंतर आईस्क्रीम खाऊ शकता.
अजिबात बर्फाळ नसलेले मऊ आईस्क्रीम तयार होते.

ब्लूबेरीज ताज्या किंवा फ्रोजन कोणत्याही घेतल्या तरी चालतील.
फ्रेश क्रिम विकत आणा किंवा घरची दूधाची साय निघत असेल तर तीसुद्धा चालेल.

 
Blueberry Ice Cream Recipe in English
Ingredients
1 large bowl of blueberries (approximately 200 g)
1 tin milkmaid or any sweetened condensed milk (400 gms)
200 – 250 ml fresh cream
Sugar to taste
Directions
Refrigerate fresh cream before using.
Pulse in the blender until the chilled fresh cream and condensed milk are light and fluffy.
Hand blender or stand mixer can be used.
Don’t over do as cream would get churned into butter.
Now remove this mixture into a bowl.
Grind the blueberries in a mixer.
Mix this puree into the condensed milk mixture.
Add sugar as per your taste.
Now put it in a container and freeze it.
If kept in the freezer for 2-3 hours or overnight, take it out for 5 minutes in the morning, pulse it back in the mixer and put it again in the freezer.
Ice cream will be ready after 7 – 8 hours.
This Ice Cream turns out very soft without ice crystals.
Fresh or frozen any types of bluberries can be used for this ice cream.
Buy fresh cream or use homemade milk cream(malai)  according to your choice.

Leave a Reply