रिफ्रेशींग मँगो लस्सी

रिफ्रेशिंग मँगो लस्सी रेसिपी – आंब्याच्या स्वादाची लस्सी

Mango Lassi, Lassi Recipes, Mango Recipes

आंब्यांचा सीझन वर्षातून एकदा येतो. मग तो enjoy तर केलाच पाहिजे. नुसते आंबे आणि आमरस तर आपण खातोच. पण आंबेप्रेमींना एवढंच पुरेसं नसतं. फळांचा हा राजा इतरही अनेक पक्वानांची चव आणि रंगत वाढवण्याचे काम करतो. कोणताही कृत्रिम रंग न घालता पदार्थाला येणारा नैसर्गिक केशरी/पिवळा रंग बघूनच मन प्रसन्न होते. जसं  की,

आंब्याचा शिरा
मँगो आईस्क्रीम

आम्रखंड

यापैकीच आणखीन एक पदार्थ म्हणजे सगळ्यांची आवडती मँगो लस्सी. आंब्याचा सीझन नसला तरी अनेकजण रेडिमेड मँगो पल्प वापरून ही लस्सी करत असतात. मग काय? ताज्या आंब्याच्या दिवसांमध्ये तर झालीच पाहिजे.

साहित्य –
1 वाटी आंब्याचा रस किंवा फोडी (हापूस किंवा केशर)
1 वाटी दही (गोड आणि ताजं)
1/2 ते 1 वाटी दूध
4 टेस्पून साखर

कृती –
आंब्याचा रस किंवा फोडी मिक्सरच्या जारमध्ये घाला.
त्यात दही, दूध आणि साखर घालून फिरवून घ्या.
तयार लस्सी पिण्याआधी फ्रिजमध्ये ठेऊन अगदी मस्त थंडगार होऊ द्या.
ही लस्सी बर्‍यापैकी घट्टच असते.

मँगो लस्सीसाठी आंबे घेताना अगदी पिकलेले गोड आंबे घ्या.
अजिबात आंबट नको, तसेच दोरे असलेला आंबाही घेऊ नका.
दही घेतानाही अगदी ताजं आणि गोड दही घ्या.
मी ग्रीक योगर्ट घेतलं होतं त्यामुळे मला पूर्ण एक वाटी दूध लागलं.
दह्याच्या घट्टपणानुसार दूधाच प्रमाण ठरवा.
तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करा.
मी या लस्सीत वेलची पूड घातली नाहीये.
तुम्ही हवी असेल तर चवीला थोडीशी घालू शकता.

लस्सीमध्ये जास्त थंड होण्यासाठी 1 – 2 बर्फाचे क्यूब्ज घालू शकतो.
पण अशी लस्सी थोडीशी पाणचट लागू शकते, त्यापेक्षा थोडी आधी करून फ्रिज किंवा फ्रिजरमध्ये ठेऊन थंड केलेली लस्सी जास्त टेस्टी लागते.

Refreshing Mango Lassi Recipe in English

Ingredients –
1 cup mango puree or cubed pieces
(Hapus/Alphanso or Kesar)
1 cup yogurt (sweet and fresh)
1/2 to 1 cup milk
4 tbsp sugar
Directions –
Pour the mango puree or pieces into the blender jar.
Add curd, milk and sugar and blend together.
Mango Lassi is ready.
Before drinking the prepared lassi, keep it in the refrigerater and serve chilled.
This lassi should be thick in consistency
Take ripe and sweet mangoes.
Make sure mangoes are not sour or even fiberous.
Take fresh and sweet yogurt.
I had taken Plain Greek yogurt so I used a cup of milk.
Decide the amount of milk according to the consistency of the curd.
Adjust sugar as per your taste.
I did not add cardamom powder in this lassi.
You can add a little bit flavor if you want.
You can add ice cubes to make the lassi instant cool.
But it can make the lassi little watery.
So better to make it in the advance and refrigerate.
By doing this you will get chilled yet flavourful Mango Lassi.

Leave a Reply