स्वादिष्ट आंब्याचा शिरा

Delicious Mango Sheera Recipe – Semolina Dessert Using Mango Pulp

mango sheera, mango recipes, halwa recipes, semolina dessert

साहित्य –
1 वाटी जाड रवा
1/2 वाटी + 1 – 2 टेस्पून साजूक तूप
1 वाटी साखर
1 ते दिड वाटी गरम दूध
2 वाट्या हापूस किंवा केशर आंब्याचा रस (फ्रेश किंवा रेडिमेड पल्प)
काजू,बदाम आणि पिस्त्याचे काप आवडीप्रमाणे

कृती –
साजूक तूप गरम करून त्यात मंद आचेवर रवा अगदी खमंग भाजून घ्या.
रवा कमी भाजला गेला तर शिरा छान मोकळा होणार नाही.
रवा व्यवस्थित भाजला गेला की त्यात दूध गरम करून घाला.
ढवळून दोन मिनिटे झाकण ठेवा.
आता रवा छान फुललेला दिसेल.
झाकण काढून त्यात साखर आणि आंब्याचा रस घाला.
ताजा आंब्याचा आमरस घालणार असाल तर दूध, पाणी काहीही न घालता रस मिक्सरवर एकदा फिरवून घ्या.
ढवळून एक दोन टेस्पून साजूक तूप घाला आणि एक वाफ घ्या.
थोडे ड्रायफ्रुटस् शिर्‍यात मिक्स करा आणि मूद पाडून थोडेसे वरून घाला.

आंबा शक्यतो हापूसच घ्या.
नाहीच मिळाला तर केशर किंवा इतर कोणताही गोड आणि मधूर चवीचा आंबा घ्या.
या शिर्‍यात वेलची पूड घालायचीच असेल तर अगदी थोडी घाला.
नाही घातली तरी चालेल, कारण फक्त आंब्याचाच स्वाद खूप छान लागतो.

Leave a Reply