लिंबू – पुदिना सरबत (कृत्रिम रंग आणि स्वादाशिवाय)

mint lemonade, lemonade recipes, refreshing drink, digestive

पुदिना पाचक आणि थंड प्रकृतीचा आहे. उन्हाळ्यात नुसतं लिंबू सरबत पिण्यापेक्षा त्यात पुदिना घातला तर मस्त चटपटीत लागतं. तोंडाला खूप छान चव येते. या सरबतात काळं मीठ असल्यामुळे पाणीपुरीच्या पाण्याचीच चव येते. अगदी सोप्प आणि पटकन होणारं हे वेगळ्या चवीच सरबत नक्की करून बघा.

साहित्य –
1 वाटी पुदिन्याची पाने
2 वाट्या साखर
1 वाटी पाणी
3/4 वाटी लिंबाचा रस
1 टी स्पून भाजलेल्या जिर्‍याची पावडर
2 टी स्पून काळं मीठ
1 टी स्पून साधं मीठ

कृती –
पुदिना निवडून स्वच्छ धुऊन घ्या.
मिक्सरमध्ये पुदिना पाव वाटी पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या.
आता हा वाटलेला पुदिना गाळून घ्या.
पॅनमध्ये दोन वाट्या साखरेत एक वाटी पाणी घालून पाक करायला ठेवा.
मध्यम आचेवर सतत ढवळत साखर विरघळू द्या.
आता गॅस बारीक करून यात पुदिन्याच पाणी घाला.
पाच मिनिटे पाक उकळला की त्यात दोन्ही प्रकारच मीठ आणि जिर्‍याची पावडर घाला.
दोन बोटांच्या चिमटीत पाक चेक करा.
पाक चांगला चिकट लागला की गॅस बंद करा.
पाकाला तार येण्याची आवश्यकता नाही.
आपल्याला पाक एक तारीपेक्षा कमीच करायचा आहे.
आता हा पाक थोडा थंड होऊ द्या.
मग त्यात गाळलेला लिंबाचा रस घालून मिक्स करा.
पूर्ण थंड झाल्यावर हे सिरप बाटलीत भरून ठेवा.
सर्व्ह करताना ग्लासात बर्फाचे एक – दोन खडे टाकून, त्यात एक भाग सिरप आणि तीन भाग थंड पाणी घाला आणि ढवळून घ्या.

मी या सरबतात रंग घातला नाहीये.
तुम्ही हवा असल्यास हिरवा रंग घालू शकता.
सिरप आणि पाण्याचे प्रमाण आवडीप्रमाणे घ्या.
मीठही चवीप्रमाणे adjust करा.

Leave a Reply