पौष्टिक प्रथिनयुक्त डोसा

Nutricious Protein Dosa – Healthy Mix Lentils Fermented Crepes Recipe

Protein, Dosa Recipes, Khadadi, Zesty Flavours

साऊथ इंडियन पदार्थ मला भयंकर प्रिय आहेत. माझ्याकडे फ्रिजमध्ये मोठ्ठ पातेलंभरुन पीठ नेहमीच तयार असतं. कधी कधी मग मुद्दामहून 8-15 दिवसांची गॅप देते.

हे पीठ हाताशी असलं की नाश्ता आणि लागल्यास रात्रीच्या झटपट जेवणाचा मोठा प्रश्न सुटतो.

आज मी डोश्याची जी रेसिपी शेअर करणार आहे ती थोडी वेगळी म्हणजे त्यात तांदूळ नाहीयेत. साधा डोसा, अडाई आणि पेसरट्टु ह्या सगळ्याचं combination म्हणता येईल.

डायबेटीस किंवा इतर कोणत्याही कारणाने तांंदूळ खायचे नसल्यास हे डोसे उपयोगी पडतात. भरपूर प्रोटीन असल्याने अतिशय पौष्टिक आहेत.

साहित्य-

Protein, Dosa Recipes, Khadadi, Zesty Flavours

1वाटी उडीद डाळ

1 वाटी चणा डाळ

1 वाटी हिरवी सालासकट मूगडाळ (पिवळीही चालेल)

2-3 टी स्पून मेथी दाणे

कृती-

दुपारी डाळी वेगवेगळ्या भिजत घाला.

मेथी दाणेही भिजत घाला.

रात्री सगळं वाटून घ्या.

पीठ आंबल्यावर चवीप्रमाणे मीठ घालून डोसे करा.

आवडत्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

नारळाची चटणी (इडली, डोसे प्रकारांसाठी)

मी ह्यावेळेस जे प्रमाण आणि डाळी घेतल्या ते अंदाज येण्यासाठी वर दिले आहे.

अगदी ह्याच डाळी ह्याच प्रमाणात घेतल्या पाहिजेत असं नाही.

आवडीप्रमाणे निरनिराळ्या डाळी आलटून पालटून वापरून केलेले डोसेही छान लागतात.

हे डोसे पेपर डोश्यासारखे फार पातळ न करता थोडे जाडसर करा.

ह्याच बॅटरचे आप्पे आणि उत्तपेही मस्त होतात.

नक्की करुन बघा.

Protein Rich Dosa Recipe in English

Ingredients

1 cup urad dal

1 cup chana dal

1 cup green or yellow moong dal (moong dal with/without skin)

2-3 tsp fenugreek seeds

Directions

Soak the pulses seperately in the afternoon.

Soak fenugreek seeds too.

Blend everything at night or 5 – 6 hours after soaking.

Blend these lentils into a smooth batter.

Batter should not be very thick or runny.

Use water as required.

Cover with the lid and keep aside for fermenting.

When the Dosa batter is fermented, add salt to taste and make dosa.

Serve with your favorite chutney.

Leave a Reply