प्रोटिन आणि मिलेटस् दलिया प्रीमिक्स

Protein and Millets Dalia Premix – Homemade Premix Recipe for Healthy and Instant Meals

Protein, Millets Recipes, Dalia Recipes, Premix

ज्वारी आणि बाजरीचे आहारातील महत्व सगळ्यांनाच माहित आहे. बर्‍याच आजारांवर उपाय म्हणून डाॅक्टर-वैद्य मंडळी गहू वर्ज्य करून ज्वारीची भाकरी खायला सांगतात. पण धावपळीच्या शहरी जीवनात बर्‍याचजणांना भाकर्‍या करणे अवघड आणि किचकट काम वाटते. शिवाय कधी मदतीला कोणी नसणे, घरातील सदस्यांच्या वयोगटानुसार भाकरी न आवडणे, चावता न येणे, पचायला त्रास होणे इ. अनेक कारणे असतातचं.

अश्या वेळेस हीच धान्ये आपण भाजून, बारीक करून दलियाच्या स्वरूपात खाऊ शकतो. ह्या मिश्रणात ज्वारी, बाजरी बरोबर अख्खे मूग किंवा मुगाची डाळ वापरल्यास दलिया जास्त पौष्टिक होतो. असा दलिया घरी तयार करून ठेवल्यास त्याचे अनेक तिखट आणि गोड पदार्थ करता येतात.

साहित्य:-

1 वाटी ज्वारी

1 वाटी बाजरी

1 वाटी अख्खे हिरवे मूग

किंवा

मुगाची डाळ (सालासकट/बीन सालीची)

1 – 2 टे स्पून मेथीदाणे

कृती:-

ज्वारी, बाजरी आणि मूग/मुगाची डाळ कढईत वेगवेगळी भाजून घ्या.

लालसर रंगावर खमंग भाजा.

मेथीदाणेही भाजून घ्या.

भाजल्यानंतर सगळं एकत्र करा.

मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करा.

तयार दलिया डब्यात भरून ठेवा.

एकदा असा दलिया तयार असल्यास साधा प्लेन दलिया, भाज्या घालून पुलाव, गुळ किंवा साखर घालून लापशी, खीर अशासारखे अनेक पदार्थ तुम्ही पटकन करू शकता.

बर्‍याचदा धान्य दळतानाच अनेकजण त्यात ओवा आणि जीरं घालतात.

पण फक्त मेथीदाणे घातलेल्या दलियाचे गोड आणि तिखट असे दोन्ही पदार्थ करता येतात.

ओवा आणि जीरं आपल्या आवडीप्रमाणे फोडणीत घालता येते.

जास्त प्रमाणात दलिया करायचा असेल तर गिरणीत दळायला देऊ शकता.

मग न भाजता दिला तरी चालेल.

हवामानामुळे किंवा प्रकृतीमुळे बाजरी गरम पडत असल्यास कमी प्रमाणात घ्या.

Protein and Millets Dalia Premix Recipe in English

Ingredients

1 cup sorghum (Jowar Millets)

1 cup bajara (pearl millets)

1 cup whole green beans (Green Moong beans)

Or

Moong dal (green or yellow Moong lentil)

1 – 2 tsp fenugreek seeds

Directions

Roast sorghum, millet and green beans / moong dal separately in a pan.

Dry roast all the grains well until becomes golden brown in colour.

Roast fenugreek seeds too.

Combine everything after roasting.

Once the mixture has cooled, grind it in a blender.

Store this Dalia Premix in a airtight container.

Once such porridge (Dalia Premix) is ready, you can quickly make plain Dalia, pilaf (Pulav)with vegetables, kheer or lapshi using sugar or jaggery and many more.

4 thoughts on “प्रोटिन आणि मिलेटस् दलिया प्रीमिक्स

Leave a Reply