कैरीचे आंबटगोड सार

Kairiche Saar – Indian Raw Mango Soup

Kairiche Saar, Raw Mango Soup, Raw Mango Recipes

आमच्याकडे अजूनही थंडी आहे. बाहेर पडताना स्वेटर, जॅकेट घालावच लागतय. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत निदान कैर्‍या आणि आंबे तरी बर्‍यापैकी मिळतायत. मागच्या वर्षी या दिवसांमध्ये कोरोना अगदी पीकवर होता. त्यामुळे संपूर्ण सीझनमध्ये एक – दोनदाच आंबे मिळाले होते. त्यामुळे या वेळेस उन्हाळ्याची आठवण काढत आंबे खाणं चालू आहे.

साहित्य –
1 मोठी कैरी
(साधारण 1/2 वाटी गर निघेल इतपत)
1 – 2 हिरव्या मिरच्या
1/4 वाटी बारीक चिरलेला गूळ
3 – 4 वाट्या पाणी
चवीप्रमाणे मीठ
फोडणीसाठी –
2 टेस्पून साजूक तूप
1 टीस्पून जिरं
हिंग
2 – 3 सुक्या मिरच्या
5 – 6 कढीपत्त्याची पाने

कृती –
थोडं पाणी घालून कैरी 2 – 3 शिट्ट्या करून कुकरमध्ये उकडून घ्या.
थंड झाल्यावर सालं काढून कोळून घ्या.
आता हा गर, हिरवी मिरची आणि गूळ घालून मिक्सरमधून काढून घ्या.
वाटताना लागल्यास थोडं पाणी घाला.
कढईत तूप तापवून त्यात जिरं, हिंग, सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा.
वाटलेला कैरीचा गर घालून तीन चार वाट्या पाणी घाला.
मीठ घालून सार चांगले उकळा.
हवी असल्यास वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

सार आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट करा.
साध्या भातावर घ्यायचे असेल तर थोडे घट्ट चांगले लागते.
नुसते पिताना थोडे पातळ ठेवले तरी चालेल.
हे सार गरम गरम भाताबरोबर तसेच पुलाव, मसालेभात असे प्रकार केल्यास त्याबरोबर जोडीने प्यायला छानच लागते.
तोंडाला एकदम चव येते.
या सारासाठी आंबट आंबा किंवा पिवळी पडलेली कैरीही वापरू शकता.
अशावेळेस चव बघून त्याप्रमाणे गूळ घाला किंवा अजिबात घातला नाही तरी चालेल.

 

Kairiche Saar or Indian Style Sweet and Sour Raw Mango Soup Recipe in English

 
Ingredients –
1 large raw mango
(approx. 1/2 cup boiled raw mango pulp)
1 – 2 green chillies
1/4 cup finely chopped jaggery or jaggery powder
3 – 4 cups of water
Salt to taste
For tempering –
2 tbsp Ghee
1 tsp cumin seeds
Asafoetida
2 – 3 dried chillies
5 – 6 curry leaves
 
Directions –
Add a little water and boil the raw mango in a pressure cooker until 2 – 3 whistles.
When cool, peel and make a pulp.
Now add this pulp, green chillies and jaggery in a blender and make a smooth paste.
Add a little water as needed while grinding a pulp.
Heat ghee in a pan and add cumin seeds, asafoetida, dried chillies and curry leaves.
Let it crackle and make tadka.
Add raw mango pulp and three to four cups of water.
Add salt and simmer this Kairi Saar for 5 – 10 minutes.
Add finely chopped cilantro and serve hot.
 
 

Leave a Reply