द्राक्षाचे चटकदार लोणचे

Hot and Spicy – Grapes Pickle Recipe

hot-and-spicy-grapes-pickle-recipe
आंबट गोड, चमचमीत, चटकदार पदार्थ उन्हाळ्यात तोंडाला चव आणतात. लोणचं हा त्यातलाच एक प्रकार. पण नेहमीची, तीच ती ठराविक पद्धतीची लोणची खाऊन कंटाळा आला असेल तर बदल म्हणून हे द्राक्षाचे लोणचे जरूर करून बघा.
ह्या लोणच्यासाठी द्राक्षं घेताना हिरवीगार, आंबट द्राक्षं निवडून घ्या. पिकलेली, गोड द्राक्षं घेऊ नका. आपण कैरीचे लोणचं करतो तसचं हे लोणचं करायचं आहे, फक्त कैरीच्या एवजी द्राक्षं वापरा.
साहित्य –
4 वाट्या निवडलेली द्राक्षं (अंदाजे 1/2 किलो)
4-5 लिंब
50 ग्रॅम कैरी लोणच्याचा मसाला
(बाजारात लोणचं मसाल्याचे 100 ग्रॅमचे जे पाकिट मिळते त्यातला अर्धा मसाला)
1/2 वाटी मीठ
फोडणीसाठी –
1/2 वाटी तेल
मोहोरी, हिंग आणि हळद
कृती –
देठ काढून द्राक्षं निवडून घ्या.
एका पातेल्यात भरपूर पाणी घेऊन त्यात थोडसं मीठ आणि हळद घाला.
ह्या पाण्यात द्राक्षं एक-दोन तास भिजत घाला.
नंतर द्राक्षं उपसून घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
पाणी निथळून घेऊन द्राक्षं पूर्ण कोरडी करा.
द्राक्षं लहान असल्यास अख्खीच ठेवा, पण जास्त मोठी किंवा लांबट असतील तर द्राक्षं उभं धरून देठाच्या बाजूने एक चीर द्या.
(भरल्या वांग्याला देतो तशीच पण दोन चीरा न देता एकच दिली तरी चालेल)
म्हणजे मसाला व्यवस्थित आत पर्यंत शिरून लोणचं लवकर मुरेल.
लिंबही धुऊन – पुसून कोरडी करून घ्या.
लिंबांचा रस काढून त्यातील बीया काढून टाका.
पातेल्यात द्राक्षं घेऊन त्यात मीठ आणि लोणचं मसाला घाला.
त्यावर लिंबांचा रसही घाला.
छोट्या कढल्यात तेल कडकडीत गरम करा.
हिंग, मोहोरी आणि हळद घालून खमंग फोडणी करा.
फोडणी गार झाली की वरील मिश्रणात घालून व्यवस्थित ढवळून घ्या.
चटकदार द्राक्षाचे लोणचे खायला तयार आहे.
चटकदार लोणच्याचे आणखी काही प्रकार –

Spicy Grapes Pickle Recipe in English

Ingredients
 4 cups grapes (approximately 1/2 kg)
 4 – 5 lemons
 50 g Kairi pickle Masala
 (Half of the 100 gram packet of pickle masala available in the market)
 1/2 cup salt
 For Tempering –
 1/2 cup oil
 Mustard seeds, asafoetida and turmeric powder
 Directions
Remove the stems from the grapes.
Take a bowl of water and add a little salt and turmeric.
Soak the grapes in this water for one or two hours.
Then wash the grapes with clean water.
Drain the water and let the grapes dry completely.
If the grapes are small, keep them intact, but if they are too big or long, hold the grapes upright and make a slit along the side of the stalk.
(Just like you give a stuffed eggplant (Bharwa Baingan), but you can give only one without giving two)
This means that the masala will be properly absorbed and the pickle tastes nice.
Wash and dry the lemons.
Sqeeze the lemon juice and remove seeds.
Take the grapes in a bowl and add salt and pickle masala.
Add lemon juice.
Heat oil in a small pan.
Add asafoetida, mustard seeds and turmeric powder.
Let the mustard seeds crackle and then add all the tempering ingredients in it.
If the oil becomes too hot switch of the flame and wait till oil gets littlebit cool.
Then add the ingredients in it.
Make sure the tempering will not burn.
Once the tempering cools completely!  add it to the above mixture and stir well.
The tangy grapes pickle is ready to eat.

Leave a Reply