मुगाच्या डाळीचे पौष्टिक आप्पे – प्रोटिनयुक्त हिरवे आप्पे

Protein Rich Green Appe – Green Lentil and Spinach Savoury Snacks

हिरवी मूगडाळ, पालक, पौष्टिक आप्पे, प्रोटिन आप्पे, green appe, protein appe, spinach recipes, appe recipe in marathi
हिरवी मूगडाळ आणि पालक असल्यामुळे हे आप्पे अतिशय पौष्टिक आहेत. चवीलाही अगदी खमंग आणि रूचकर लागतात. नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हे आप्पे करू शकता.
हिरवी मूगडाळ, green lentil, पालक, spinach, पोहे, आप्पे रेसिपी, पौष्टिक आप्पे, appe recipe marathi
साहित्य –
1 कप हिरवी मुगाची डाळ
1/4 कप पोहे
1/2 टीस्पून मेथीदाणे
1 कप निवडलेला पालक
4 – 5 लसणीच्या पाकळ्या
2 हिरव्या मिरच्या
1 इंच आल्याचा तुकडा
1 टी स्पून जिरं
1/2 कप ताक
1/4 ते 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
1/2 टीस्पून इनो
मीठ
तेल
कृती –
मुगाची डाळ आणि पोहे 3 – 4 वेळा स्वच्छ धुऊन घ्या.
मूगडाळ, पोहे आणि मेथीदाणे एकत्र करून 4 – 5 तास भिजत घाला.
नंतर डाळ उपसून घेऊन त्यात आलं, मिरची, लसूण, पालकाची पाने आणि जिरं घालून बारीक वाटून घ्या.
आप्पे रेसिपी, हिरवी मूगडाळ, पालक, ताक, पौष्टिक रेसिपी, नाश्ता, मुलांचा डबा, appe recipe, breakfast indian,
वाटताना पाण्याच्या ऐवजी लागेल तसं ताक घालून वाटून घ्या.
हे वाटण एका बोलमध्ये काढा.
त्यात चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करा.
आप्पेपात्रात तेल घालून गरम होऊ द्या.
तेल गरम होईपर्यंत पीठात इनो घालून ढवळून घ्या.
आप्पे रेसिपी मराठी, पौष्टिक आप्पे, तिखट आप्पे, नाश्ता, appe recipe marathi, healthy breakfast, spinach, onion
आप्पेपात्राच्या वाट्यांमध्ये एकेक टेस्पून बॅटर घालून झाकण ठेवा.
गॅस मध्यम ठेवा.
तिखट आप्पे, आप्पेपात्र, डाळीचे आप्पे, आप्पे रेसिपी, नाश्ता, appe recipe marathi
साधारण पाच मिनिटांत खालची बाजू झाली की आप्पे उलटून घ्या.
परत दोन चार मिनिटे झाकण ठेवा.
आप्पेपात्र खूप तापलं असेल तर गॅस कमी करा.
बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ, छान जाळी पडलेले असे हे आप्पे होतात.
तिखट आप्पे, आप्पे रेसिपी, पौष्टिक आप्पे, नाश्ता, मुलांचा डबा, appe recipe marathi, green appe
ताक नसेल तर एक दोन टेस्पून दही घालून मग लागेल तसं पाणी घातलं तरी चालेल.
आप्पे करताना काही जण पीठात फोडणी घालतात.
मी घातली नाहीये.
पण तुम्हाला आवडत असेल तर त्याप्रमाणे घालू शकता.
कांदा आणि लसूणही आवडत नसेल तर घालू नका.
नुसत्या आलं, मिरचीचा स्वादही चांगला लागतो.
तसंही बरोबर आपण एखादी चटणी, साॅस असं काहीतरी घेतोच.
आप्पेपात्रातील ह्याही रेसिपीज बघा –

Protein Rich Green Appe Recipe in English

Ingredients

1 cup green moong dal
1/4 cup Pohe/Flatten Rice
1/2 tsp fenugreek seeds
1 cup spinach leaves (loosely pack)
4 – 5 cloves of garlic
2 green chillies
1 inch piece of ginger
1 tsp cumin seeds
1/2 cup buttermilk
1/4 to 1/2 cup finely chopped onion
1/2 tsp Eno Fruit Salt
Salt
Oil

Directions


Wash Moong dal and Pohe 3-4 times.
Combine green gram, poha and fenugreek seeds and soak for 4-5 hours.
Now drain off and grind this dal in a mixer along with ginger, chilli, garlic, spinach leaves and cumin seeds.
Consistency should be neither too thick or too thin.
Add buttermilk as needed instead of water.
Transfer this batter into a bowl.
Add salt and finely chopped onion  and mix well.
Heat oil in a Appe pan.
Add Eno to the batter and stir gently.
Put one tbsp of batter in a each mould of Appe Maker (Mini Pancake Maker) and cover with a lid.
Keep the heat on medium.
After five minutes, flip the Appe and turn them upside down.
Put the lid back on for a couple of minutes and cook Appe from bottom side too.
If the pot is too hot, reduce the heat.
You will get nicely crunchy on the outside and soft, spongy Appe on the inside.
 
 

5 thoughts on “मुगाच्या डाळीचे पौष्टिक आप्पे – प्रोटिनयुक्त हिरवे आप्पे

Leave a Reply