लुसलुशीत, जाळीदार, इंस्टंट खमण ढोकळा

Super Soft, Spongy – Instant, Gujarati Khaman Dhokla Recipe

Khaman Dhokla, Instant Dhokla, Dhokla Recipes, Zesty Flavours

 

Instant Dhokla, Khaman Dhokla, Dhokla Recipes, Gujarati Recipes

हलका आणि कापसासारखा मऊ, गुजराती खमण ढोकळा सगळ्यांनाच आवडतो. पारंपारिक ढोकळा आणि इंस्टंट खमण ढोकळा यात फरक आहे. खमण हा प्रकार हलवायांनी आदल्या दिवशीचा शिळा ढोकळा खपवण्यासाठी केलेली युक्ती आहे. उरलेला ढोकळा कुस्करून फोडणीत परतायचा आणि वरून शेव घालून मस्त नवीन रूपात सर्व्ह करायचा या प्रकारातून खमण ढोकळ्याचा जन्म झाला असे म्हणतात. हा प्रकार अमिरी खमण या नावाने ओळखला जातो. असाच एक चविष्ट पदार्थ म्हणजे गुजराती हांडवो.
आज आपण यकदम इंष्टंट होणारा खमण ढोकळा कसा करायचा ते बघू. सकाळचा नाश्ता किंवा पटकन खायला काही खमंग पण खूप मेहनत नसणारा पदार्थ हवाय तर अशा वेळेस खमण ढोकळा करता येतो. अगदी डाएटवर असतानाही किंवा डिनरला काही हलकं फुलकं खायचे असेल तर  ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. हिरव्या चटणीबरोबर ढोकळ्याचे दोन – चार पिसेस आणि एखादं फळ खाल्ल्यास मस्त जेवण होईल. आवश्यकतेप्रमाणे तेलाची फोडणी कमी घ्या किंवा अजिबात घातली नाही तरी चालेल.

साहित्य –
1 कप बेसन पीठ
1 कप ताक (1/2 कप दही + 1/2 कप पाणी एकत्र फेटून)
1 टेस्पून रवा (जाड किंवा बारीक)
2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आले वाटून
1 टेस्पून लिंबाचा रस
1 टेस्पून तेल
1 टीस्पून साखर
चवीप्रमाणे मीठ
चिमूटभर हळद
1 टीस्पून भरून इनो

फोडणीसाठी –
1 – 2 टे स्पून तेल
2 टी स्पून मोहरी
1 टीस्पून तीळ
3 – 4 हिरव्या मिरच्या
कढीपत्ता
हिंग
1/4 कप पाणी
1 टीस्पून साखर

वरून घालण्यासाठी खोबरं, कोथिंबीर

कृती –

Khaman Dhokla, Besan, Sooji, Rava, Curd, Buttermilk
चण्याच्या पीठात रवा आणि ताक घालून फेटून घ्या.
गुठळ्या होऊ न देता गुळगुळीत मिश्रण तयार करा.
बाकीची तयारी होईपर्यंत हे बॅटर झाकून ठेवा.
Instant Dhokla, Tadka, Musterd Seeds, Sesame, Curry Leaves, Green Chilli

छोट्या कढईत किंवा पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा.
तेल तापले की मोहरी, हिग, तीळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी करा.
मिरच्यांना मधोमध उभी एक चीर द्या आणि मग फोडणीत घाला.
फोडणी तडतडली की त्यात 1/4 कप पाणी आणि 1 टीस्पून साखर घाला.
पाणी उकळलं की गॅस बंद करा.
ही फोडणी थंड होऊ द्या.

मोठ्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये एक ते दिड ग्लास पाणी घालून ते गरम होऊ द्या.
ज्या डब्यात ढोकळा करायचा आहे त्याला सगळीकडून नीट तेल लावा.

आता ढोकळ्याच्या पीठात एकेक करून सगळ्या वस्तू घाला.
आलं मिरचीचे वाटण, तेल, लिंबाचा रस, हळद,साखर आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या.

Khaman Dhokla Batter, Spices, Zesty Flavours, Instant Dhokla

वाफवायला ठेवायच्या जस्ट आधी पीठात ईनो घालून त्यावर चमचाभर पाणी घाला आणि एकाच दिशेने पटापट मिक्स करा.

khaman dhokla batter, active eno, fruit salt, instant dhokla

आता हे बॅटर ज्या टिनमध्ये ढोकळा लावणार आहोत त्यात ओता.
एक दोनदा डबा ओट्यावर टॅप करा आणि वाफवायला ठेवा.

मोठ्या पातेल्यावर किंवा कुकरवर हलके झाकण ठेवा.
मोठ्या गॅसवर 15 – 20 मिनिटे ढोकळा वाफवा.
15 मिनिटांनी ढोकळ्याच्या सेंटरला टूथपीक घालून चेक करा.
काहीही न चिकटता स्वच्छ निघाली की गॅस बंद करा.

khaman dhokla, toothpick test, insert toothpick, instant dhokla
khaman dhokla, clean toothpick, dhokla done, instant dhokla

आता हा ढोकळा डब्यातच नीट गार करा.
काढायची घाई करू नका.
घाईघाईत काढला तर सेट होणार नाही.
व्यवस्थित गार झाल्यावर काढून तुकडे करा.
वरून फोडणी घाला.
आवडीप्रमाणे खोबरं आणि कोथिंबीर घालून खायला घ्या.

spongy khaman dhokla, super soft instant dhokla, coriander, coconut, tadka
spongy khaman, instant dhokla, gujarati recipes, zesty flavours

Khaman Dhokla

Ingredients
 
1 cup gram flour
1 cup buttermilk (1/2 cup yogurt + 1/2 cup water whisk together)
1 tbsp semolina (coarse or fine)
Crush 2 green chillies and 1 inch ginger
1 tbsp lemon juice
1 tbsp oil
1 tsp sugar
Salt to taste
A pinch of turmeric
Eno Fruit Salt 1 heapped tsp

For Temparing –

1 – 2 tbsp oil
2 tsp mustard seeds
1 tsp sesame seeds
3 – 4 green chillies
Curry leaves
Asafoetida
1/4 cup water
1 tsp sugar

Coconut, cilantro(chopped coriander) for garnishing

Directions

Add semolina and buttermilk to the gram flour and whisk.
Make a smooth mixture without lumps.
Cover this batter and keep aside.

Heat oil in a small skillet or pan for tempering.
Heat oil and add mustard seeds, asafoetida, sesame seeds, green chillies and curry leaves.
Make a vertical slit in the middle of the peppers and then add in the batter.
Add 1/4 cup water and 1 tsp sugar.
When the water boils, switch off the flame.
Let this tempering get cool.

Put one to one and a half glass of water in a large bowl or cooker and let it heat up.
Grease the tin in which you want to pour the Dhokla batter.

Now add all the ingredients one by one to the batter.
Add ginger, chilli powder, oil, lemon juice, turmeric powder, sugar and salt and mix well.

Just before steaming, add Eno Fruit Salt to the batter and a tablespoon of water and mix in one direction.
Now pour this batter into the tin.
Tap the tin gently on a kitchen platform a couple of times.

Place a lid on a large bowl or cooker.
Steam Khaman Dhokla for 15 – 20 minutes on high heat.
After 15 minutes, insert a toothpick at the center of the Dhokla.
Turn off the gas when it comes out clean without sticking anything.

Now cool this Dhokla in a box.
Do not rush to remove.
If removed in a hurry, it will not be set.
Once cool, remove and slice.
Pour the prepared tempering over the top.
Garnish with grated coconut and some coriander and serve.

 

4 thoughts on “लुसलुशीत, जाळीदार, इंस्टंट खमण ढोकळा

  1. मला वाटत कि एक दिवस सहकुटुंब आणि मित्र मंडळींसह तुझ्या घरी यावं लागेल. नाश्ता आणि जेवण करायला.तु recipe एवढ्या छान टाकतेस .

Leave a Reply