तोंडात विरघळणारा मँगो मलई पेढा – इंस्टंट पेढा रेसिपी

तोंडात विरघळणारा मँगो मलई पेढा – इंस्टंट पेढा रेसिपी

Mouth Melting Mango Malai Peda – Instant Peda Recipe

मँगो मलई पेढा, पेढे रेसिपी, इंस्टंट पेढा, मिल्क पावडर पेढा, गोड पदार्थ, उपासाचे पदार्थ, mango sweets, malai peda, peda recipes, instant peda, easy peda recipe, zesty flavours

मिठाईच्या दुकानात न जाता खमंग पेढे खायला मिळाले तर? तेही घरच्या घरी पाच दहा मिनिटांत अगदी कमी कष्टात. मी जी मँगो मलई पेढ्याची रेसिपी शेअर करणार आहे ती करून बघितल्यावर तुमचा या गोष्टीवर नक्की विश्र्वास बसेल. पिवळे धमक आंब्याच्या स्वादाचे पेढे आणि त्यावर हिरवीगार पिस्त्याची पखरण. पाणी सुटलं ना तोंडाला? हो अगदी असेच होतात हे पेढे. थोडक्यात झटपट होणारे आणि इंस्टंट होणारे हे पेढे तुम्ही आता मनात येईल तेव्हा करू शकता. इतके सोपे आहेत. करून बघा आणि मला comment करून नक्की सांगा तुम्हाला आवडले का ते.

आंब्याचे हेही प्रकार बघा –

साहित्य –

2 टेस्पून तूप

1/4 कप आंब्याचा रस (ताजा किंवा कॅनमधला)

1 कप मिल्क पावडर

3 टेस्पून साखर

1 टेस्पून दूध + 7 – 8 केशराच्या काड्या

 
सजावटीसाठी पिस्त्याचे काप

कृती –
सगळ्यात आधी दूध गरम करून त्यात केशराच्या काड्या घालून भिजत ठेवा.
त्यामुळे केशराचा रंग आणि स्वाद दुधात पूर्णपणे उतरेल.
पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप गरम करा.

पेढे रेसिपी, आंब्याचे पदार्थ, मलई पेढा, साजूक तूप, mango peda, malai peda, instant peda, ghee, peda recipe marathi

तूप गरम झाले की त्यात आंब्याचा रस घाला.

मँगो मलई पेढा, मलई पेढा, पेढे रेसिपी, इंस्टंट पेढा, mango sweets, malai peda, instant peda recipe

एक – दोन मिनिटे हे मिश्रण गरम होऊ द्या.
मग त्यात मिल्क पावडर घाला.

मँगो पेढा, मलई पेढा, इंस्टंट पेढा, मिल्क पावडर पेढा, mango peda, peda recipe, malai peda, milk powder peda

व्यवस्थित परतून एकजीव करा.
आता यात केशराचे दूध आणि साखर घाला.

मँगो पेढा, मलई पेढा, इंस्टंट पेढा, पेढे रेसिपी, mango, malai peda, peda recipe marathi, instant pedai
मँगो पेढा, मलई पेढा, पेढे रेसिपी, इंस्टंट पेढा, mango peda, malai peda, peda recipe marathi, instant peda

साखर घातल्यावर मिश्रण पातळ होईल.
मंद आचेवर परतत मिश्रण शिजवा.
8 – 10 मिनिटांत कडा सुटून मिश्रणाचा गोळा होईल.
7 – 8 मिनिटांनंतर पेढ्याच्या मिश्रणातून छोटासा भाग काढून घेऊन त्याची गोळी करून बघा.
हाताला न चिकटणारी सुटसुटीत गोळी झाली की गॅस बंद करा.

मँगो पेढा, मलई पेढा, इंस्टंट पेढा, पेढे रेसिपी, mango peda, malai peda, instant peda, pedhe recipe marathi

आता हे पेढ्याचे मिश्रण हाताला सोसेल इतके गार होऊ द्या.
गरम असताना मिश्रण सैलसर दिसेल.
पण गार झाले की आळून येईल आणि पेढे कोरडे होतील.
त्यामुळे पूर्ण गार व्हायच्या आधीच आपल्याला पेढे वळायचे आहेत.
मिश्रण पूर्ण गार झाल्यावर ते भगराळ होईल व पेढे नीट वळता येणार नाहीत.
त्यामुळे पेढ्यांना भेगा पडतील.
मिश्रण थोडे कोमट झाले की हव्या त्या आकाराचे पेढे वळा.

मँगो पेढा, मलई पेढा, पेढे रेसिपी, इंस्टंट पेढा, mango recipes, malai peda, peda recipe, pedhe recipe marathi

प्रत्येक पेढ्याच्यामध्ये पिस्त्याचा एकेक काप ठेऊन अंगठ्याने दाबून घ्या.
असे सगळे पेढे करून मांडून ठेवा.

आंब्याचे पदार्थ, मलई पेढा, पेढे रेसिपी, इंस्टंट पेढा, mango recipes, malai peda, instant peda recipe, pedhe recipe marathi

पेढे, बर्फी अशा टाइपची मिठाई करताना pure मिल्क पावडरच घ्या.
डेअरी व्हाईटनर घेऊ नका.
डेअरी व्हाईटनरमुळे मिठाई चिवट, दाताला चिकटणारी होते.

 

Mango Malai Peda Recipe in English

Ingredients – 
2 tbsp ghee
1/4 cup mango juice (fresh or canned)
1 cup milk powder
3 tbsp sugar
1 tbsp milk + 7 – 8 saffron sticks
 Pistachio slices for decoration
Directions –
First of all, heat the milk, add saffron and soak it.
So the color and taste of saffron will be completely absorbed in the milk.
Heat two tablespoons of ghee in a pan.
When the ghee is hot, add mango puree.
Let the mixture heat for a minute or two.
Then add milk powder.
Stir well.
Now add saffron milk and sugar.
Adding sugar will dilute the mixture.
Cook over low heat.
The mixture will leaves the pan and becomes a mass within 8 – 10 minutes.
Don’t overcook.
After 7 – 8 minutes, take a small portion from the mixture and make a small ball.
Turn off the heat if you find the mixture is not sticky.
If the mixture is sticking to your fingersthen, cook it for few more minutes.
Now let the mixture get little cool so you can handle it.
When hot, the mixture will look to thin and loose consistency.
But when it is cold, it will dry up and the Pedas will be thick.
So you have to roll the Pedas before it is completely cold.
When the mixture cools down, it will crack and the Pedas will not be able to form properly.
When the mixture is slightly warm, shape the Pedas to the desired size.
Place a single slice of pistachio in the centre of each Peda and press with a thumb.
Make all the Pedas like this and keep it in a serving plate.
Take pure milk powder only when making sweets like Pede, Barfi.
Do not take Dairy Whitener.
Dairy whitener makes the dessert chewy and sticky.
 

Leave a Reply