मटार पनीर रेसिपी

Mutter Paneer Recipe in Marathi – Punjabi Green Peas Curry with Cottage Cheese

mutter paneer, green peas, cottage cheese, paneer recipes, punjabi dishes, zesty flavours
 

चविष्ट, चमचमीत पंजाबी पद्धतीच्या भाज्या आजकाल आपल्या जेवणाचा अविर्भाज्य भाग बनल्या आहेत. मटार पनीर ही अशीच एक भाजी. मऊ, लुसलुशीत पनीर आणि ताजे, हिरवेगार मटार मिळून बनलेली ही भाजी चवीला अफलातून लागते. पार्टीसाठी किंवा कोणत्याही कारणाने मोठ्या प्रमाणात करायला मटार पनीर हे बेस्ट आॅप्शन आहे. कारण जास्त चिराचीरी करायला लागत नाही आणि मुलांची, मोठ्यांची सगळ्यांचीच आवडती भाजी असते. अनेक ठिकाणी मटार पनीर वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. त्यातली ही रेसिपी अगदी सोपी आहे. काजू आणि खसखस घातल्यामुळे भाजीला विशेष स्वाद येतो. काजू आणि खसखस दुधात भिजवून पेस्ट करून घातल्यामुळे मटार पनीर चवीला एकदम स्पेशल लागतात. या पद्धतीने मटार पनीर करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. पनीरच्या या भाज्याही बघा –

पंजाबी पालक पनीर – रेस्टाॅरंट स्टाईल
चविष्ट भेंडी पनीर

mutter paneer recipe, fresh green peas, punjabi dishes, zesty flavours
mutter paneer recipe, saute paneer, paneer recipes, punjabi dishes, zesty flavours
साहित्य –
2 वाट्या पनीरचे तुकडे (साधारण 500 ग्रॅम)
2 वाट्या मटार (ताजे/फ्रोजन)
2 कांदे
4 टाॅमॅटो
mutter paneer recipe, gravy, onions, tomato, zesty flavours

4 – 5 लसूण पाकळ्या + 2 हिरव्या मिरच्या + 1 इंच आले वाटून
2 टे स्पून तूप + 1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
2 टी स्पून धणे पावडर
1 टी स्पून हळद
1 टी स्पून तिखट
1/2 टी स्पून गरम मसाला
चवीपुरते मीठ आणि साखर

mutter paneer recipe, gravy, spices, ginger garlic paste, zesty flavours

काजू पेस्टसाठी –
8 – 10 काजू
1 टे स्पून खसखस
काजू बुडतील एवढे दूध

mutter paneer recipe, kaju paste, cashew paste, खसखस, poppy seeds, zesty flavours

कृती –
एका वाटीत काजू आणि खसखस घ्या.
त्यात काजू बुडतील इतके गरम दूध घालून थोडावेळ भिजत ठेवा.
मायक्रोव्हेव सेफ बोलमध्ये काजू, खसखस आणि दूध घालून डायरेक्ट मायक्रोव्हेवमध्येही गरम करता येईल.
एकीकडे एका पॅनमध्ये अगदी थोडं तेल गरम करा.
त्यात पनीरचे तुकडे घालून परतायला ठेवा.
ग्रेव्ही होईपर्यंत पनीर अधूनमधून परतत सोनेरी होऊ द्या.
कढईत तूप गरम करा.
त्यात जिरे घालून तडतडले की बारीक चिरलेला कांदा घाला.
कांदा पारदर्शक झाला की त्यात वाटलेला मिरचीचा ठेचा घाला.
मंद आचेवर कांदा खूप परता.
चांगला लाल होईपर्यंत परता.
आता त्यात बारीक चिरलेला टाॅमॅटो घाला.
टाॅमॅटो थोडा मऊ झाला की त्यात हळद, तिखट आणि धणेपूड घाला.
टाॅमॅटोचा वाटल्यासारखा लगदा होऊन तेल सुटेपर्यंत परतत रहा.
टाॅमॅटोला तेल सुटले की त्यात भिजत घातलेले काजू वाटून ती पेस्ट घाला.
काजूची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता.
त्यात मटार आणि मीठ, साखर घाला.
नीट मिक्स करून या मिश्रणात वाटीभर पाणी घाला.
मटार ताजे असतील तर झाकण ठेऊन पूर्ण शिजवा.
ग्रेव्ही कशी हवी आहे त्याप्रमाणे पाण्याची कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करा.
गार झाल्यावर ग्रेव्ही घट्ट होते.
मटार चांगले शिजले की त्यात पनीरचे तुकडे आणि गरम मसाला घालून मिक्स करा.
पनीर घातल्यानंतर दोन मिनिटांत गॅस बंद करा.
जास्त शिजवल्यास पनीर मऊ राहणार नाही.

मटार पनीर करताना पनीर परतून घेणे आॅप्शनल आहे.
आवडत असेल तर पनीर कच्चं घातलं तरी चालेल.
कच्च्या पनीरचाही स्वाद छान क्रिमी लागतो.
तूप आणि तेल मिक्स न करता दोन्हीपेकी एक काहीतरी घातलं तरी चालेल.

 
Mutter Paneer Recipe in English
 
Ingredients
 
2 cups paneer pieces (approximately 500 gms)
2 cups green peas (fresh / frozen)
2 onions
4 tomatoes
Crush 4 – 5 garlic cloves + 2 green chillies + 1 inch ginger
2 tsp ghee + 1 tsp oil
1 tsp cumin seeds
2 tsp coriander powder
1 tsp turmeric
1 tsp chili powder
1/2 tsp Garam Masala
Salt and sugar to taste

For cashew paste –

 
8 – 10 cashews
1 tsp poppy seeds
Milk as required to soak cashews

Directions


Take cashws and poppy seeds in a bowl.
Add hot milk in the cashew nuts and soak for a while.
You can also heat it in a direct microwave by adding cashews, poppy seeds and milk in a microwave safe bowl.
Heat a little oil in a pan.
Add paneer pieces and fry.
Let the paneer turn golden brown.
Heat ghee in a pan.
Add cumin seeds and finely chopped onion.
When onion becomes transparent, add crushed ginger, garlic and chilli paste.
Saute onion over low heat.
Saute until well done or becomes golden brown.
Now add finely chopped tomatoes.
When the tomatoes become soft, add turmeric powder, red chilli powder and coriander powder.
Stir in the tomato paste until the oil starts leaving the sides of the pan.
When the oil is released from the tomato, add cashew paste and saute till oil releases.
Add green peas, salt and sugar.
Mix well and add a cup of water to this mixture.
If the peas are fresh, cover and cook thoroughly.
Adjust the water according to the desired consistency of gravy is needed.
The gravy thickens after some time.
When the peas are well cooked, add paneer pieces and garam masala and mix well.
After adding the paneer cook the gravy for two minutes and turn off the heat.
If cooked too much, the paneer will not remain soft.

It is optional to saute paneer while making Mutter Paneer.
If you like, you can add raw paneer.
Raw paneer also tastes creamy.
You can either use ghee or oil as per your choice.
  

2 thoughts on “मटार पनीर रेसिपी

Leave a Reply