रोज फिरणी रेसिपी – गुलाबाच्या स्वादाची फिरणी

रोज फिरणी रेसिपी – गुलाबाच्या स्वादाची फिरणी

Rose Phirani Recipe in Marathi – Ground Rice Pudding in Rose Flavour

रोज फिरनी रेसिपी मराठी, फिरणी रेसिपी, तांदळाची खीर, खीर रेसिपीज, phirani recipes, zesty flavours
 

खीर हा प्रकार असा आहे की थंड किंवा गरम कसाही खाल्ला तरी छानच लागतो. याआधी मी शेअर केलेली शेवयांची स्वादिष्ट शाही खीर ही तुम्हाला जरूर आवडेल. फिरणी हा तांदळाच्या खिरीचाच एक प्रकार आहे. अख्ख्या तांदळाची खीर करायची नसेल तर आपण फिरणी करू शकतो. फिरणी करायलाही अगदी सोपी आहे. शिवाय त्यासाठी अजिबात तूप लागत नाही. घरी उपलब्ध असणार्‍या अगदी कमी साहित्यात फिरणी करता येते. तुमच्या आवडीच्या अनेक वेगवेगळ्या स्वादात तुम्ही फिरणी करू शकता. आज आपण रोज फिरणी कशी करायची ते बघू.

साहित्य –
1ली दूध
1/4 वाटी तांदूळ (बासमती किंवा जुना, सुवासिक)
1/4 वाटी साखर
1/4 वाटी मिळून काजू, बदाम आणि पिस्त्याची बारीक किंवा भरडसर पूड
1/4 वाटी रूह अब्जा
1 टी स्पून गुलाबपाणी

कृती –
तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.
अर्ध्या तासाने तांदळातील जास्तीचे पाणी काढून टाका.
थोड्या राहिलेल्या पाण्यासकट तांदूळ मिक्सरमध्ये रवाळ वाटा.
अगदी गुळगुळीत पेस्ट करायची नाहीये.
गॅसवर दूध उकळत ठेवा.
दुधाला चांगली उकळी आली की गॅस बारीक करा.
आता दुधात वाटलेले तांदूळ घाला.
गुठळ्या होऊ न देता नीट ढवळून मिक्स करा.
थोडी ड्रायफ्रुटसची पावडर सजावटी करता काढून ठेवा.
आता राहिलेली ड्रायफ्रुटसची पूड आणि साखर दुधात घाला.
सतत ढवळत तांदूळ दुधात पूर्ण शिजवून घ्या.
तांदूळ भिजवल्यामुळे लगेच शिजतात.
फार वेळ लागत नाही.
तांदूळ व्यवस्थित शिजले की गॅस बंद करा.
पाच मिनिटांनी फिरणीमध्ये रूह अब्जा आणि गुलाबपाणी घाला.
सगळं नीट मिक्स करा.
फ्रिजमध्ये ठेऊन फिरणी थंड करा.
खाताना वरून बाजूला काढून ठेवलेले ड्रायफ्रुटस घालून सर्व्ह करा.

फिरणी नेहमी फ्रिजमध्ये थंड करूनच खातात.
तसेच फिरणी फ्रिजमध्ये ठेवल्यावर सेट होईल इतकी घट्ट असते.
पण तुम्ही आवडीप्रमाणे थोडी सैल कन्सिस्टन्सी (गरगट) करू शकता.
वर दिलेल्या ड्रायफ्रुटसपैकी एखादा प्रकार तुमच्याकडे नसेल किंवा आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. 

Rose Phirni Recipe in English

Ingredients
 
1 lit. milk
1/4 cup rice (basmati or old, fragrant)
1/4 cup sugar
1/4 cup finely chopped cashew, almond and pistachio powder
1/4 cup Rooh Abjah
1 tsp rose water

Directions

Wash the rice and soak it in water for half an hour.
After half an hour remove excess water from the rice and keep aside for another half an hour.
Grind the rice in a mixer with the remaining water.
Make a smooth but littlebit coarse paste.
Keep the milk on the heat and let it boil.
When the milk boils well, add ground rice paste in the milk.
Stir and mix without lumps.
Remove some dry fruit (nuts) powder for garnish.
Now add the remaining dried fruits (nuts) powder and sugar to the milk.
Cook the rice completely in the milk, stirring constantly.
The rice paste cooks immediately after soaking.
It doesn’t take long.
Turn off the heat when the rice is cooked properly.
After five minutes, add Ruh Abja and rose water to the Phirni.
Mix everything well.
Garnish it with remaining nuts.
Refrigerate Phirni for sometime and serve cold.

Phirni is always eaten chilled.
After refrigerating Phirni becomes thick so while making adjust the consistency accordingly.
It should not be thin or liquid consistency while eating.

Leave a Reply