शेवयांची स्वादिष्ट शाही खीर

Shahi Semiya Kheer – Vemicelli Pudding Using Nuts and Saffron

Semiya Kheer, Vermicilli Kheer

भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्र्चिमेकडे खीर हे पक्वान्न लोकप्रिय आहे. भारतातल्या सर्व प्रांतात वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी केल्या जातात. वेगवेगळ्या प्रदेशानुसार खीर करण्याची पद्धतही बदलत जाते. काही ठिकाणी घट्ट, काही खिरी पातळ तर कुठे नारळाचे दूध घालून तर कुठे साधं दूध घालून. महाराष्ट्रात बर्‍याच जणांकडे सणावाराला किंवा शुभप्रसंगी तांदळाची खीर करत नाहीत. पण माझ्या एका उत्तर भारतीय मैत्रिणीने त्यांच्याकडे ‘शगुनकी’ (शकुनाची) म्हणून खास तांदळाचीच खीर करतात असे सांगितले होते. अशी मजा असते. आपल्याकडे शकुनाचे म्हणून गव्हले केले जातात. या सगळ्या खिरींमध्ये सगळ्यात पाॅप्युलर खीर कोणती असेल तर ती शेवयांची. ही पोस्ट शेवटपर्यंत पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला परफेक्ट शाही खिरीसाठी भरपूर टिप्स मिळतील.

Semiya kheer, Vermicelli kheer

साहित्य –
1 वाटी शेवया (साध्या किंवा भाजक्या)
11/2 ली दूध
1/4 वाटी साजूक तूप
1 वाटी साखर
1/2 वाटी मिल्क पावडर
किसमिस, काजू, बदाम आणि पिस्ते
केशराच्या काड्या
वेलची पावडर
केवडा/गुलाब इसेन्स किंवा वाॅटर

Semiya kheer, Vermicelli kheer
कृती –

पॅनमध्ये तूप गरम करून त्यात सगळा सुकामेवा परतून घ्या.
किसमिस फुगले की हा सगळा सुकामेवा लहान बोलमध्ये काढून घ्या.
आता शेवया परतून घ्या.
शेवया भाजक्या नसतील तर चांगल्या तांबूस होईपर्यंत परता.
शेवया छान परतून झाल्या की त्यात शेवया बुडतील इतकं थंड पाणी घाला.
दोन चार मिनिटे परतून हे पाणी आटेपर्यंत शेवया शिजवा.
या पद्धतीने शेवया खूप छान फुलून येतात.
आता वाटीभर दूधात मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करा.
थंड दूधातच मिक्स करा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
शेवया चांगल्या फुलल्यावर त्यात दूध घाला.
हे दूध थोडसं गरम झालं की त्यात मिल्क पावडरचे दूध घालून व्यवस्थित ढवळून घ्या.
एक उकळी आली की साखर घाला.
केशरही घाला.
चांगल्या दोन तीन उकळ्या आल्या की गॅस बंद करा.
शेवयांची खीर थोडी थंड झाली की त्यात सुकामेवा, वेलची पावडर आणि केवडा किंवा रोझ इसेन्सपैकी जे घालणार असाल ते घाला.
थोडा सुकामेवा वरून घालून सर्व्ह करा.

Semiya kheer, Vermicelli kheer

मी खीर करताना साध्या शेवया घेतल्या होत्या.
भाजक्या शेवया असतील तर फार परतायची गरज नाही.
खीर करताना तुम्ही स्किम मिल्क किंवा फुल फॅट कोणत्याही प्रकारचं दूध घेतलं तरी ते शक्य असल्यास न तापवता, कच्चच शेवयांवर घाला.
असं केल्याने खीर करताना दुधाची फॅट(साय) त्यातच जिरल्याने खीर अप्रतिम होते.
दूध मी स्किम मिल्क घेतलं होतं.
पण मिल्क पावडर घातल्यामुळे ते लगेच घट्ट झालं.
तुम्ही फुल क्रिम दूध घेणार असाल तर मिल्क पावडर नाही घातली तरी चालेल.
पण मिल्क पावडर घातल्यामुळे खीर क्रिमी आणि रिच होते.
मुख्य म्हणजे दूध आटवत बसायची गरज नाही.
दोन तीन उकळ्या घेतल्या की लगेच घट्ट होते.
खीर तुम्ही आवडीप्रमाणे गरम किंवा गार खाऊ शकता.
पण वेळ असेल तर खीर आधी करून फ्रिजमध्ये ठेवली तर मस्तच घट्ट होते आणि खिरीतलं तूप गोठून ती फार म्हणजे फारच छान लागते.

 
 

Shahi Shevai (Vermicelli) Kheer Recipe in English

Ingredients
 1 cup vermicelli (plain or roasted)
 11/2 lit milk
 1/4 cup Ghee
 1 cup sugar
 1/2 cup milk powder
 Raisins, cashews, almonds and pistachios
 Saffron strands
 Cardamom powder
 Kevada / Rose Essence or Water
Directions
Heat ghee in a pan and fry all the chopped nuts in it.
When the raisins are puffed, remove all the nuts in a small bowl.
Now saute vermicelli.
If vermicelli is not pre – roasted, then fry till it becomes nice brown.
Once the vermicelli is well cooked, add enough cold water to cover the vermicelli.
Saute for two to four minutes till the water evaporates.
In this way vermicelli absorbes the water and will get fluffy.
Now mix milk powder in a bowl of milk.
Mix in cold milk only so that no lumps form.
When the vermicelli is well cooked, add milk.
Once the milk is slightly hot, add milk mixed with powder and stir well.
Add sugar to a boil.
Add saffron too.
Let the Kheer boil for some time.
Keep steering in between.
Once the Shevai Kheer cools down a bit, add dry fruits, cardamom powder and kevada or rose essence and mix well.
Garnish with some dry fruits and serve hot or chilled as per your choice.
I had taken plain vermicelli while making kheer.
If you use roasted vermicelli, there is no need to fry them so long.
When making kheer, if you take skim milk or any type of full fat milk, you can use raw milk.
By doing this, while making kheer, milk fat (malai) will dissolve in it and Kheer becomes cteamy and thick.
 I had taken skim milk.
But adding milk powder made it thicker immediately.
If you are going to take full cream milk, it will work even if you don’t add milk powder.
But adding milk powder makes Kheer creamy and rich.
You can eat kheer hot or cold as you like.

2 thoughts on “शेवयांची स्वादिष्ट शाही खीर

Leave a Reply