तिखट मीठाचा सांजा/शिरा

Traditional Maharashtrian Style Upma Recipe – Savory Semolina Breakfast

maharashtrian upma, breakfast recipe, semolina, porridge
 
सकाळचा नाश्ता म्हटला की डोळ्यासमोर सगळ्यात पहिली नावं येतात, ती म्हणजे उपमा आणि पोहे. सगळ्यांचा आवडता ब्रेकफास्ट. त्याला कारणही तसेच आहे. धिरडं, थालीपीठ, डोसे असे प्रकार करायला वेळ लागतो. उभं राहून प्रत्येकाला वेगवेगळं करून द्यायला लागतं. पण पोहे, उपमा, सांजा या पदार्थांचं असं नसतं. फार तेल लागत नाही, त्यामानाने पटकन होतात आणि म्हणूनच जास्त प्रमाणात (bulk) करायला सोपे पडतात.

साऊथ इंडियन उपम्याचे मराठी व्हर्जन असलेला तिखट, मीठाचा शिरा हाही असाच एक प्रकार. काही जण याला शिरा म्हणतात, तर काही ठिकाणी हा सांजा असतो. मला उपम्यापेक्षा तिखट मीठाचा शिरा जास्त आवडतो. खास करून घरी करून खायला. घरी करताना माझ्याकडून आपोआपच तिखट मीठाचा शिराच केला जातो. हा सांजा करताना मी माझ्या पद्धतीने उपमा आणि सांजा मिक्स करून करते.
मी मालती कारवारकरांची जबरदस्त फॅन असल्यामुळे मला ती सवयच झाली आहे. त्यांची जवळजवळ सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत. त्यात त्यांनी काही खूप सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजकालच्या आपल्या आधुनिक लाइफ स्टाईलमध्ये वन डिश मील ही काळाची गरज आहे. तुम्हाला वेळ नसेल तर चारी ठाव स्वयंपाक अजिबात करू नका, त्याची गरजही नाही. पण एकच पदार्थ करताना तो परिपूर्ण कसा होईल ते बघा. थोडक्यात एकाच पदार्थात आवश्यक ते सगळे अन्नघटक मिळतील हे बघा. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास कोणतीही एकच डिश केली तरी त्यात पिष्टमय पदार्थ (carbs), प्रथिने (proteins) आणि जीवनसत्व आणि खनिजं(vitamins and minerals)या सगळ्याचा समावेश करा. असे केल्याने आपला वेळ वाचून, पौष्टिक आणि तरीही टेस्टी – हे सगळ्यात महत्वाचे, पदार्थ कमीत कमी श्रमात आपण करू शकतो.
आता तिखट मीठाचा शिरा करताना मी हे कसं करते ते रेसिपीच्या ओघात तुम्हाला कळेलच.

साहित्य –
1/2 वाटी बारीक किंवा जाड रवा
1 मध्यम आकाराचा किंवा लहान कांदा
1/2 मध्यम टाॅमॅटो
1/4 वाटी किंवा थोडे जास्त मटार
5 – 6 कढीपत्याची पाने
चवीप्रमाणे मीठ आणि साखर

फोडणीसाठी –
2 टे स्पून तेल
मोहरी, हिंग, हळद
1 – 2 टे स्पून उडदाची डाळ

वरून घालायला
खोबरं, कोथिंबीर

कृती –
कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग घालून फोडणी करा.
फोडणीत उडदाची डाळ घालून परतून घ्या.
उडदाची डाळ लालसर झाली की त्यात कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या दोन तुकडे करून घाला.
कढीपत्ता आणि मिरच्या तळल्या गेल्या की त्यात कांदा घाला.
कांदा परतून मऊ आणि पारदर्शक होऊ द्या.
कांदा शिजला की त्यात टाॅमॅटो घाला.
दोन मिनिटे टाॅमॅटो परतून मग हळद घाला.
टाॅमॅटो एकजीव होऊन तेल सुटेपर्यंत परता.
नंतर रवा घालून चांगला गुलाबी होईपर्यंत परता.
रवा चांगला भाजला गेला तरच शिरा मऊ आणि मोकळा होईल.
रवा भाजला गेला की मीठ आणि साखर घालून ढवळून घ्या.
त्यानंतर फ्रोजन मटार घालून थोडे परता.
वर 11/2 वाटी गरम पाणी घालून झाकण ठेवा.
5 मिनिटांत रवा फुलून सांजा शिजलेला दिसेल.
शिजला की वरून खोबरे, कोथिंबीर पेरून खायला घ्या.

उडदाची डाळ घालून आपण सहसा उपमा करतो किंवा उडदाची डाळ घातली की तो उपमा असं आपल्या डोक्यात असतं.
पण तिखट मीठाचा शिरा करताना सुद्धा त्यात उडीद डाळ घातली तर त्यातून आपल्याला प्रोटिन्स मिळतात आणि शिरा जास्त पौष्टिक होतो.
रवा व्यवस्थित भाजला तर दिड वाटी पाणी घालून शिरा मऊ पण मोकळा असा होतो.
थोडा आणखी सैल हवा असेल तर दोन वाट्या पाणी घाला.
कांदा आवडत नसेल तर घातला नाही तरी चालेल.
जास्त आंबट चव आवडत असेल तर एक अख्खा टाॅमॅटो घालू शकता.
सुक्या मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे घ्या.
मटार ताजे असतील तर रवा घालण्याआधी फोडणीत किंवा वेगळे वाफवून घ्या.

 

Tikhat Sheera/Saanja Recipe in English

Ingredients

1/2 cup fine or coarse semolina
1 medium-sized or small onion
1/2 medium tomato
1/4 cup or a little more peas
5 – 6 curry leaves
Salt and sugar to taste

For Tempering –

2 tbsp oil
Mustard, asafoetida, turmeric
1 – 2 tsp urad dal

For Garnishing
Coconut, cilantro(coriander)

Instructions

Heat oil in a pan, add mustard seeds and asafoetida.
Add urad dal and fry.
When urad dal turns brown, add curry leaves and two pieces of dried chillies.
Once the curry leaves and chillies are fried, add onion.
Saute the onion and let it become soft and transparent.
When onion is cooked, add tomatoes.
Saute tomatoes for two minutes then add turmeric.
Saute the tomatoes until soft and mushy.
Then add semolina and saute till golden brown.
Once the semolina is roasted, add salt and sugar and stir.
Then add frozen peas and saute for a while.
Add 11/2 cup hot water and cover.
In 5 minutes, semolina will be cooked and Sheera will be cooked.
When cooked, sprinkle coconut and cilantro on top and eat.

If you don’t like onion, just skip it.
If you like more sour taste, you can add a whole tomato.
Take dried chillies or green chillies as you like.
If the peas are fresh, boil them separately before adding to the semolina. 

Leave a Reply