जागतिक पोहे दिनानिमित्त….

Happy World Pohe Day – Pohe Is An Authentic Maharashtrian Breakfast Made Of Flatten Rice – Rice Flakes

मागच्या वर्षी जेव्हा जगभर कोविडची पहिली लाट होती तेव्हा लाॅकडाऊनच्या काळात मी ही पोस्ट ‘खादाडी’च्या फेसबुक पेजवर शेअर केली होती. त्यावेळेस माझ्या ब्लाॅगची सुरूवात झाली नव्हती. आज तुमच्या खादाडीवरच्या अखंड प्रेमामुळे आणि भरभरून दिलेल्या प्रोत्साहनामुळे हा प्रवास ‘खादाडीआॅफिशिअल’ ते zestyflavours.com पर्यंत झाला आहे. लोभ असावा हिच विनंती.
सगळे मिळून या कोविडच्या संकटाचा सामना करू आणि लवकरच चांगले दिवस येतील अशी आशा करू.🙏
Happy-world-pohe-day-pohe-authentic-maharashtrian-bteakfast-flatten-rice
आम्ही सारे खादाडखाऊ – Food Festival for Foodies
सध्या सगळीकडे challengesनी धुमाकूळ घातला आहे. साडीतले फोटो, आई आणि बच्चे कंपनीचे फोटो, चारोळ्या वगैरे वगैरे. अर्थातच मस्त मजा येते आहे. त्यानिमित्ताने आठवणींना उजाळा मिळतो. सगळे एकत्र येतात आणि मुख्य म्हणजे आपला काही वेळ मजेत जातो.
सध्याच्या परिस्थितीत ह्या सकारात्मकतेची खूप गरज आहे आपल्याला. अत्यंत जरूरीच्या कामाशिवाय बाहेर जायचं नाहीये आणि घरी राहण्याला काही पर्याय नाही.
मग ह्या पेजवर थोडासा मस्त टाइमपास करूया.
त्यासाठी commentमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोणत्याही खाद्यपदार्थाचा फोटो द्यायचा आहे. फोटो शेअर करा आणि तो पदार्थ तुम्हाला का आवडतो, त्या पदार्थाशी निगडीत तुमच्या काही आठवणी याबद्दल थोडसं काहीतरी जरूर लिहा. पदार्थ तुम्ही स्वत: केलेलाच असला पाहिजे असं मुळीच नाही. इतर कोणी केलेला, एखाद्या प्रदेशाची खासियत असलेला, प्रवासात किंवा विशिष्ट रेस्टाॅरंटमध्ये चाखलेला असा कोणताही तुमच्या खास लक्षात राहिलेला. English, मराठी, हिंदी यापैकी कोणत्याही भाषेत लिहू शकता.
माझा आवडता पदार्थ कोणता? असं मला कोणी विचारलं तर डोळे मिटून माझं उत्तर असेल – पोहे. मी तिन्ही त्रिकाळ पोहे खाऊ शकते. पटकन होणारे, फारसे तेलकट नाहीत पण तरीही अत्यंत चविष्ट आणि पोटभरीचे फोडणीचे पोहे. कांदे पोहे, बटाटे पोहे, मटार पोहे, वांगी पोहे, त्यात शेंगदाणे घाला, घालू नका, हिरवी मिरची, लाल तिखट काहीही घाला. पोहे छानच लागतात. मग येऊ द्यात मंडळी लई झाक, तोंडाला पाणी सुटणारं फोटू.

Leave a Reply