उपासासाठी उकडलेल्या बटाट्याचा शिरा

उपासासाठी उकडलेल्या बटाट्याचा शिरा

Potato Halwa Recipe for Fasting – Aloo Sheera Recipe for Vrat

बटाट्याचा शिरा मराठी रेसिपी, बटाट्याचा हलवा, उपासाचे पदार्थ, उपास स्पेशल, आलू हलवा, आलू शिरा, potato sheera, aloo halwa, sheera recipes, halwa recipes

‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ अशी म्हणच आहे. मग ती सार्थ तर केलीच पाहिजे. मला तर नेहमीच वाटतं की, आषाढी एकादशी, महाशिवरात्र, नवरात्र असे काही सण त्याच्या धार्मिक कारणांपेक्षा उपासासाठीच जास्त प्रसिद्ध आहेत. पण उपासाच्या निमित्ताने नेहमीच्या जेवणात थोडासा चेंज होतो ना!  हीच तर खरी गंमत आहे! मोठ्या उपासाच्या दिवशी घरातल्या सगळ्यांचाच उपास असतो. मग सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय करायचं ते प्लॅन करावं लागतं. शिवाय असं काही करायचं की त्यामुळे लहान मुलांसाठी किंवा उपास नसलेले मेंबर्स असलेच तर त्यांच्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही.

उपासासाठी नैवेद्याला किंवा ताटात गोड म्हणून हा बटाट्याचा शिरा करून बघा. एरवी गोड म्हणून किंवा पक्वान्न म्हणून मुद्दाम बटाट्याचा शिरा केला जात नाही. मग आता हा बटाट्याचा खमंग शिरा करूनच बघा.

साहित्य –
4 – 5 बटाटे (मध्यम ते थोडे मोठे)
1 वाटी तूप
1 वाटी साखर
अर्धी ते पाऊण वाटी दूध
1 टीस्पून वेलची पावडर
आवडीचा सुकामेवा आवडेल त्या प्रमाणात 🙂

बटाट्याचा शिरा रेसिपी, आलू हलवा, आलू शिरा, potato halwa, aloo halwa, aloo sheera

कृती –
कुकरच्या 4 – 5 शिट्या करून बटाटे उकडून घ्या.
बटाटे गार झाले की कुस्करून किंवा किसून लगदा करा.
एक वाटी तूप हाताशी ठेवा.
पॅन तापत ठेवा.
एक टेबल स्पून तूप पॅनमध्ये गरम करा.
या तुपात सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते, किसमिस) परतून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
परत 1 ते 2 टेबलस्पून तूप घालून बटाट्याचा गोळा परतायला घ्या.
बटाट्याचा लगदा परतताना सगळे तूप एकदम घालू नका.
प्रत्येक वेळेस थोडं थोडं तूप घालून बटाटा परतून घ्या.
बटाट्याचा पिठूळपणा जाऊन त्याचा रवा होईल इतकं परता.

बटाट्याचा शिरा मराठी रेसिपी, बटाट्याचा हलवा, आलू शिरा, आलू हलवा, शिरा, हलवा, aloo halwa, aloo sheera, halwa recipe
बटाट्याचा शिरा मराठी रेसिपी, बटाट्याचा हलवा, sheera recipes, halwa recipes

बटाट्याला व्यवस्थित भाजलेल्या रव्याच्या शिर्‍यासारखं टेक्स्चर आलं पाहिजे.

हे काम बर्‍यापैकी वेळखाऊ आणि पेशन्स लागणारं आहे.
नाॅनस्टिक पॅनमध्ये बटाट्याचा गोळा परतायला ठेऊन, गॅस शक्य तितका मंद ठेवा.
मधून मधून परतत एकीकडे इतर कामं करता येतात.
बटाट्याचा लगदा चांगला सोनेरी, ब्राऊन झाला की त्यात उकळतं दूध घाला.
दूध थंड किंवा कमी गरम असेल तर शिरा छान फुलून येणार नाही.
शिर्‍यात दूध जिरलं की साखर घाला.
साखर घातली की बटाट्याचा शिरा पातळ होईल.
साखर आळून घट्ट होईपर्यंत शिरा ढवळून घ्या.
गॅस बंद करून वेलची पावडर आणि सुकामेवा घाला.

बटाट्याचा शिरा करताना उकडलेला बटाटा व्यवस्थित परतणे गरजेचे आहे.
बटाटा थोडा जरी पिठूळ राहिला तर शिरा खमंग होत नाही आणि चवीला चांगला लागत नाही.

साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे आणि बरोबर गोड म्हणून हा शिरा केला तर मस्त बेत होतो.
 
Potato or Aloo Halwa/Sheera Recipe for Vrat – Aloo ka Halwa Recipe in English

 
Ingredients –
4 – 5 potatoes (medium to slightly large)
1 cup ghee
1 cup sugar
1/2 to 3/4 cup milk
1 tsp cardamom powder
Nuts like (cashew, almonds, pistachioes and raisins)
as per choice.
 
Directions –
Boil the potatoes with 4 – 5 whistles in the pressure cooker.
When the potatoes are cold, mash or grate them.
Keep a bowl of ghee by hand.
Put the pan on a heat.
Heat a tablespoon of ghee in a pan.
Fry the nuts (cashews, almonds, pistachios, raisins) and set aside.
Add 1 to 2 tablespoons ghee and fry the potatoes.
Do not add all the ghee at once while frying the potatoes.
Add a little ghee each time and fry the potatoes.
Fry the potatoes till they become golden brown.
Potatoes should have a texture similar to roasted semolina.
This is time consuming and requires patience.
Fry the mash potatoes in a nonstick pan, keeping the heat as low as possible.
So you don’t need to stand continuesly to saute the potatoes.
When the potato is golden brown, add boiling milk.
If the milk is cold or less hot, you won’t get proper texture of potato halwa or sheera.
Stir continuesly and let the milk dissolves in the potato sheera.
Now add sugar and mix well.
Adding sugar will thin the potato mixture.
Saute until the sugar thickens.
Turn off the heat and add cardamom powder and nuts.

2 thoughts on “उपासासाठी उकडलेल्या बटाट्याचा शिरा

Leave a Reply