घरगुती चाट मसाला रेसिपी – सोपी आणि झटपट होणारी चाट मसाला रेसिपी

घरगुती चाट मसाला रेसिपी – सोपी आणि झटपट होणारी चाट मसाला रेसिपी

Homemade Chaat Masala Recipe – Quick and Instant Chaat Masala Recipe

चाट मसाला रेसिपी, मसाले रेसिपी, घरगुती मसाले रेसिपी,चाट रेसिपी, चंकी चाट मसाला, chaat masala recipe, homemade masala recipe, chuncky chaat masala, chaat recipe
 

पाणीपुरी, भेळ, रगडा पॅटिस या कॅटेगरीत येणार्‍या पदार्थांना मिळून एक नांव आहे. ते म्हणजे चाट. जे पदार्थ चाटून पुसून खाल्ले जातात ते चाट. चाट या नावातच सगळं काही येतं. या प्रकारांच नाव घेताच आपल्याला एक परफेक्ट आंबट, गोड आणि तिखट चव आठवते. या चवीचं सगळं श्रेय जातं ते चाट मसाल्याला.

चाट मसाला कोणत्याही पदार्थावर नुसता भुरभुरला तरी त्या पदार्थाची चव खुलते. चाट मसाला करायलाही अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे. झटपट म्हणजे अक्षरश: 5 मिनिटांत आपण हा मसाला करू शकतो. शिवाय अगदी घरी सहज उपलब्ध असणार्‍या साहित्यातच चाट मसाला करता येतो. म्हणजे इतर मसाले करताना जसं बारीक सारीक भरपूर अख्खे मसाले गोळा करावे लागतात. तसं चाट मसाल्याच्या बाबतीत होत नाही. तेव्हा लगेच हा मसाला करून बघा आणि कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.

साहित्य –
1/4 कप जिरे
2 टेबलस्पून धणे
1 टेबलस्पून काळी मिरी
1/4 कप आमचूर पावडर
2 टेबलस्पून काळं मीठ/सैंधव
1 टीस्पून नेहमीचं मीठ
1/2 टी स्पून हिंग

चाट मसाला रेसिपी, मसाला रेसिपी, घरगुती मसाला, चंकी चाट मसाला, चाट रेसिपीज, chaat masala recipe, homemade chaat masala, chuncky chaat masala, chaat recipe
चाट मसाला रेसिपी, मसाला रेसिपी, चंकी चाट मसाला रेसिपी, चाट रेसिपी, chaat masala recipe, homemade chaat masala, chuncky chaat masala, masala recipes
चाट मसाला रेसिपी, घरगुती मसाले रेसिपी, चंकी चाट मसाला, चाट रेसिपीज. chaat masala recipe, homemade masala recipe, chuncky chaat masala, chaat recipes


कृती –
धणे, जिरं आणि काळी मिरी पॅनमध्ये भाजून घ्या.
खूप जास्त भाजायची गरज नाही.
पॅन गरम करून मंद आचेवर 5 मिनिटे भाजा.
मसाल्यांचा छान वास यायला लागला की गॅस बंद करा.
हे भाजलेलं जिरं, धणे आणि काळी मिरी व्यवस्थित थंड करा.
नंतर मिक्सरमध्ये बारीक करा.
मसाले अगदी बारीक झाले की त्यात बाकीच्या पावडरी म्हणजे आमचूर पावडर, दोन्ही मीठ आणि हिंग घालून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
तयार चाट मसाला बाटलीत भरून ठेवा.

सांबार मसालाही आपल्याला नेहमीच लागतो. त्याची सोपी आणि पटकन होणारी रेसिपी मी शेअर केली आहे. ती सुद्धा करून बघा.

 

Homemade Chaat Masala Recipe in English

Ingredients –
1/4 cup cumin seeds
2 tablespoons coriander seeds
1 tablespoon black pepper
1/4 cup amchoor powder (dry mango powder)
2 tablespoons black salt / sendha namak
1 tsp regular salt
1/2 tsp asafoetida
 
Directions –
Roast coriander, cumin and black pepper in a pan.
No need to roast too much.
Heat a pan and dry roast on low flame for 5 minutes.
Turn off the heat  when spices become aromatic.
Cool the roasted cumin seeds, coriander and black pepper properly.
Then grind it in a powerful blender or coffee grinder.
Grind them to a fine powder and add the remaining powders like amchoor powder, both type of salt and asafoetida.  
Pulse in the blender once or twice and combine everything well together.
Store this Chaat Masala in a airtight jar.

2 thoughts on “घरगुती चाट मसाला रेसिपी – सोपी आणि झटपट होणारी चाट मसाला रेसिपी

Leave a Reply