थंडगार आणि मलईदार होममेड आम्रखंड (चक्क्यासहित)

थंडगार आणि मलईदार होममेड आम्रखंड (चक्क्यासहित)

Mango Shreekhand Recipe – Greek Yogurt and Alphanso Mango Dessert

mango shreekhand, alphanso mango, mango recipes, greek yogurt

आम्रखंड मी गुढीपाडव्याला केलं होतं. त्या दिवसाची सगळी स्टोरी मी शेअर केलीच आहे. अगदी आठवणीत राहिल 2021चा गुढीपाडवा. 

https://khadadiofficial.blogspot.com/2021/04/13th.html

या सुप्रसिद्ध गुढीपाडवा स्पेशल आम्रखंडाची रेसिपी मात्र आज अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर शेअर करते आहे. तर मग या सिझनमध्ये मस्त फ्रेश हापूस आंबा वापरून आम्रखंड करूनच बघा आणि कसं झालं होतं ते मला नक्की सांगा.

साहित्य –
1/2 कि चक्का किंवा 1 कि ग्रीक योगर्ट
1 वाटी हापूस आब्याचा रस किंवा रेडिमेड पल्प
1 वाटी साखर
1/4 वाटी दूध
4 – 5 केशराच्या काड्या
जायफळ

कृती-
चक्का घरी करण्यासाठी ग्रीक योगर्ट काॅटनच्या पंचात बांधून ठेवा.
पंचाऐवजी 2 – 3 जाड पेपर टाॅवेल घेऊन त्यात योगर्ट गुंडाळून  ठेवलं तरी चालेल.
हे दही एखाद्या चाळणीत किंवा सूप गाळतो त्या गाळणीत ठेवा.
चाळणीच्या खाली पाण्यासाठी एक खोलगट बोल ठेवा.
वर काहीतरी पनीर करताना ठेवतो तसे वजन ठेवा.
मी चक्का असाच केला होता किंवा मग दही टांगून ठेवले तरी चालेल.
5 – 7 तासानंतर पाणी गळायचे थांबले की तयार चक्का काढून घ्या.
आता चक्क्यात साखर आणि आमरस घाला.
साखर आणि आमरस घालताना एकदम सगळं न घालता थोडं थोडं घालून मिक्स करा.
म्हणजे कन्सिस्टन्सीचा अंदाज येईल.
मी ग्रॅन्युलेटेड साखर वापरल्यामुळे श्रीखंड गाळावे लागले नाही.
थोडं फेटल्यावरच आम्रखंड छान क्रिमी, स्मूथ झाले.
पाव वाटी दूध गरम करून त्यात केशर घालून ठेवा.
थोड्यावेळाने आम्रखंडात ते दूध आणि साधारण अर्धा टीस्पून जायफळ पावडर मिक्स करा.
खायच्या आधी थोडावेळ आम्रखंड फ्रिजमध्ये गार करा.

मी या ब्लाॅगवर शेअर केलेले आंब्याच्या स्वादाचे खालील पदार्थही तुम्हाला नक्की आवडतील –
 
Amrakhand or Mango Shreekhand Recipe in English
Ingredients –
1/2 kg chakka or hung curd or 1 kg Greek yogurt
1 cup Alphanso Mango pulp, fresh or readymade pulp
1 cup sugar
1/4 cup milk
4 – 5 saffron strands
Nutmeg powder
Directions –
Tie the Greek yoghurt to the cheese cloth to make the chakka home.
Instead of cheese cloth, take 2-3 thick paper towels and wrap yoghurt in it.
Place the yoghurt in a colander or in a strainer.
Place a bowl under the colander.
Put some heavy thing on the yogurt so water or whey from the curd will easily drip down and we will get thick curd or chakka.
That’s what I did, or maybe just hung up the yogurt.
After 5 – 7 hours, when the water stops leaking, remove the prepared chakka.
Now add sugar and the mango pulp in this thick hung curd.
When adding sugar and mango pulp, add little by little and mix.
So we can adjust the consistency and Amrakhand or Mango Shreekhand will not be too thin or watery.
I didn’t have to strain the shrikhand because I used granulated sugar.
After adding mango pulp and sugar mix everything very well.
This is how you will get creamy and smooth Amrakhand.
Heat a cup of milk and add saffron.
Mix the milk and about half a teaspoon of nutmeg powder in Amrakhand.
Refrigerate Amrakhand for a while before eating.
Amrakhand tastes awesome when serve chilled.

Leave a Reply