मिक्स व्हेज पराठा

Mix Vegetables Paratha Recipe

मिक्स व्हेज पराठा, मिक्स भाज्यांचा पराठा, पराठा रेसिपीज, mix veg paratha, paratha recipes, zesty flavours
 

रोज रोज पोळीभाजी खायचा मुलांनाच काय मोठ्यांनाही कंटाळा येतो. पण त्याच पोळीभाजीला ‘मिक्स व्हेज पराठ्याच’ रूप दिलं तर ती अगदी आवडीने खाल्ली जाते. शिवाय एकाच वेळी थोड्या प्रमाणात का होईना आपोआप मुलांच्या पोटात अनेक भाज्या जातात. या पराठ्याची तुम्ही आवडीप्रमाणे अनेक व्हेरिएशन्स करू शकता. खास आवडीच्या नसलेल्या भाज्यांचा मस्त उपयोग करून हे पराठे केले तर कोणाच्या लक्षातही येणार नाही असा हा प्रकार आहे. मी या ठिकाणी मिक्स व्हेजिटेबल पराठ्याची संपूर्ण कृती फोटोसहित शेअर केली आहे.

 
मिक्स व्हेज पराठा, पराठा रेसिपीज, मिक्स भाज्या, टोफू, mix veg paratha, paratha recipes, mix vegetables, tofu, zesty flaours
साहित्य –
1 कप किसलेल्या किंवा बारीक चाॅप केलेल्या भाज्या
(मी गाजर कोबी, कांद्याची पात आणि नेहमीचा कांदा या भाज्या घेतल्या आहेत)
1/2 कप किसलेलं टोफू (चीज किंवा पनीरही चालेल)
5 – 6 लसूण पाकळ्या
2 – 3 हिरव्या मिरच्या
साधारण 1 इंच आल्याचा तुकडा
1 टीस्पून ओवा
1/2 टीस्पून हळद
चवीप्रमाणे मीठ
2 ते 21/2 कप गव्हाचे पीठ
तेल

कृती –
भाज्या, किसलेलं टोफू/पनीर/चीज, आलं – लसूण पेस्ट, ओवा आणि मीठ हे सगळं एकत्र करून 15 – 20 मिनिटे झाकून ठेवा.
थोड्यावेळाने या मिश्रणाला पाणी सुटलेलं दिसेल.
आता यात साधारणपणे अडिच कप कणिक घाला आणि छान मिक्स करा.
लागेल तसं पाणी घालून थोडी घट्ट कणिक भिजवा.
भिजवलेल्या कणकेच्या गोळ्याला थोडसं तेल लावून पुन्हा 15 – 20 मिनिटे झाकून ठेवा.
पराठे करताना कणिक जर सैलसर वाटलीच तर थोडं कोरडं पीठ घालून कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करा.

मिक्स व्हेज पराठा, पराठा रेसिपीज, पराठ्याची कणिक, mix veg paratha, paratha recipes, paratha dough, zesty flavours


कारण भाज्या, मीठ आणि पनीर किंवा टोफूमध्ये असलेल्या पाण्यामुळे कणिक सैल होण्याची शक्यता असते.
तवा तापत ठेवा.
भिजवलेल्या पीठाचा एक गोळा घेऊन साधारण 7 – 8 इंच व्यासाचा पराठा लाटा.

मिक्स व्हेज पराठा, पराठा रेसिपी, पराठा, mix veg paratha, paratha recipe, zesty flabours

 

मिक्स व्हेज पराठा, पराठा रेसिपी, mix veg paratha, paratha recipe, zesty flabours
दोन्ही बाजूंनी चांगला खमंग भाजा.
भाजताना तेल लावून भाजा.
गरम पराठा दही, कोणतीही चटणी, लोणचं, साॅस कशाबरोबरही खाल्ला तरी चांगलाच लागतो.

मिक्स व्हेज पराठा करताना आपण वेगवेगळ्या भाज्यांचे काॅम्बिनेशन आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो.
फक्त ज्या भाज्या घेणार आहात त्या किसून किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे चाॅपरमध्ये बारीक करून घ्या.
म्हणजे व्यवस्थित मिळून येतात आणि पराठे लाटायला अजिबात त्रास होत नाही.

 
आणखी काही पराठा रेसिपीज –

Mix Vegetables Paratha Recipe in English

mix veg paratha, paratha recipe, tofu, paneer paratha, cheese paratha
 
Ingredients –

1 cup grated or finely chopped vegetables (I have taken carrots, cabbage, spring onion greens and regular onion)
1/2 cup grated tofu (cheese or paneer will do)
5 – 6 garlic cloves
2 – 3 green chillies
A piece of ginger about 1 inch
1 tsp carom seeds (ajwain)
1/2 tsp turmeric powder
Salt to taste
2 to 21/2 cup wheat flour
Oil

Directions –


Combine vegetables, grated tofu / paneer / cheese, ginger-garlic paste, carom seeds, turmeric powder and salt and cover for 15-20 minutes.
After a while, the mixture will release some water due to vegetables and salt.
Now add about two and a half cups of wheat flour (aata) and mix well.
Add water as required and knead the dough a little tight.
Pour a teaspoon of oil and grease the surface of a dough.
Cover and set aside for another 15 – 20 minutes.
If the dough feels little sticky or loose while making paratha, add  some dry flour and adjust the consistency.
This is because the water in vegetables, salt and paneer or tofu can loosen the dough.
Meanwhile heat the pan.
Take a ball of kneaded dough and roll the paratha about 7 – 8 inches in diameter.
Fry well on both sides.
While frying, put some oil on both the sides of the paratha.
Hot paratha tastes good with curd, any chutney, pickle or tomato ketchup.

2 thoughts on “मिक्स व्हेज पराठा

Leave a Reply