झणझणीत आणि चमचमीत रावण पिठलं रेसिपी

झणझणीत आणि चमचमीत रावण पिठलं रेसिपी

Extra Hot and Spicy Ravan Pithla Recipe in Marathi – Spicy Gram Flour(Besan) Curry Made With Extra Oil and Hot Peprika

रावण पिठलं मराठी रेसिपी, पिठलं रेसिपी, बेसन रेसिपी, झुणका रेसिपी,

विशेष सूचना – फक्त प्रौढांसाठी – आपापल्या जबाबदारीवर अनुभव घ्यावा.😁

अजिबात दचकू नका. तुम्ही खादाडीवरच आहात आणि मी रेसिपीच शेअर करणार आहे. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे रावण पिठल्याची. या पिठल्याच नाव रावण पिठलं कोणी ठेवलं माहित नाही. पण नावाप्रमाणेच हे पिठलं अतिजहाल असतं. ही एक पारंपारिक रेसिपी आहे. मूळ रेसिपी तेल, तिखट आणि बेसन पीठ समप्रमाणात घेऊन करतात. म्हणजे उदा. एक वाटी बेसनाला, एक वाटी तेल आणि एक वाटी तिखट. तेलाचं एक वेळ ठिक आहे. पण एक वाटी तिखट ही केवळ अशक्यकोटीतील गोष्ट आहे. कोल्हापूर, विदर्भाकडचे लोक खातात म्हणे एवढं तिखट. मी स्वत: स्वप्नातही एवढ्या तिखटाचा विचार करू शकत नाही. पण करून तर बघायचच होतं. मग अर्धी वाटी तिखटावर प्रयोग केला.😀 तेही प्रकरण अवघडच होतं. पण माझ्या नवर्‍याने खाल्लं ते आरामात. आहे तसं extra तिखट पण ठिके. इती नवरा. कमी तेल आणि तिखट घालून आपण हे पिठलं करू शकतो. पण मग ते रावण पिठलं राहणार नाही. ओके. तर ही रावण पिठल्याची माझी कृती.

बेसनाचा आणखी एक चमचमीत पदार्थ –

रावण पिठलं मराठी रेसिपी, पिठलं रेसिपी, बेसन रेसिपी, झुणका रेसिपी

साहित्य –
1 वाटी बेसन पीठ
1 वाटी तेल
1/2 वाटी लाल तिखट
1/2 वाटी सुके खोबरे किंवा डेसिकेटेड कोकोनट
1 वाटी कोथिंबीर
2 लसूण पाकळ्या
फोडणीसाठी – मोहरी, हिंग, हळद
चवीनुसार मीठ

कृती –
कढईत वाटीभर तेल गरम करा.
तेल तापलं की मोहरी आणि हिंग घालून फोडणी करा.

रावण पिठलं मराठी रेसिपी, पिठलं रेसिपी, बेसन रेसिपी, झुणका रेसिपी

फोडणीत लसूण घालून चांगला सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

आता या फोडणीत डाळीचं पीठ, तिखट आणि सुकं खोबरं घाला.
रावण पिठलं मराठी रेसिपी, पिठलं रेसिपी, बेसन रेसिपी, झुणका रेसिपी

हे सगळं मिक्स करून त्यात हळद घाला.

रावण पिठलं मराठी रेसिपी, पिठलं रेसिपी, बेसन रेसिपी, झुणका रेसिपी
 
तेलात बेसनपीठ 5 मिनिटे व्यवस्थित परतून घ्या.
ता ह्यात 3 – 4 वाट्या पाणी आणि मीठ घाला.
रावण पिठलं मराठी रेसिपी, पिठलं रेसिपी, बेसन रेसिपी, झुणका रेसिपी

हे पिठलं चांगलं रटरटू द्या.

पिठलं शिजल्याची खूण म्हणजे उकळताना पिठलं कढईच्या बाहेर उडायला लागलं की शिजलं असं समजायच.
पिठलं शिजलं की गॅस बंद करा.
वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

रावण पिठलं मराठी रेसिपी, पिठलं रेसिपी, बेसन रेसिपी, झुणका रेसिपी

भाकरी किंवा भाताबरोबर पिठल्याचा आस्वाद घ्या.

हे पिठलं खाताना हाताशी भरपूर दही, ताक, लोणी, तूप असं घेऊन ठेवा.
माझ्याकडे असलेलं तिखट खूप जास्त स्ट्राँग होतं.
कदाचित सौम्य चवीचं किंवा काश्मिरी तिखट वापरलं तर पिठलं जास्त तिखट लागणार नाही.
पिठल्यात खोबरं घातल्याने तिखटपणा थोडा बॅलन्स व्हायला मदत होते.
पण सुक्या खोबर्‍याएवजी ओला नारळ घालू नका.
खोबरं घातलच नाही तरी चालेल.
मी लसूण फोडणीत घालायला विसरले.
त्यामुळे बेसन, तिखट आणि सुकं खोबरं घातल्यानंतर मी त्यात लसूण घातला.
म्हणून तो फोटो नाहीये.

Hot and Spicy Ravan Pithla(Besan) Recipe in English

ravan pithla marathi recipe, pithla recipe, besan recipe, pithla bhakri, marathi recipes, zesty flavours

Ingredients –

1 cup gram flour
1 cup oil
1/2 cup red chili powder
1/2 cup dried coconut or desiccated coconut
1 cup cilantro (coriander)
2 garlic cloves
For Tempering – mustard, asafoetida, turmeric
Salt to taste
Directions –
Heat a cup of oil in a pan.
Heat oil, add mustard seeds and asafoetida.
Add garlic to the pan and fry till golden.
Now add besan, red chilli powder and dried coconut.
Mix all this and add turmeric.
Saute besan in oil for 5 minutes.
Now add 3-4 cups of water and salt.
Mix altogether and let it simmer on low heat.
The sign that the Besan is cooked when you see the Pithla starts boiling vigorously and splits out of the pan in the form of small spots.
When the Ravan Pithla is cooked, turn off the heat.
Add a lot of finely chopped cilantro on top.
Ravan Pithla tastes awesome with Bhakri(Jowar roti/Sorgum Millets Bread) or rice.

Leave a Reply