मऊ आणि मोकळी साबुदाणा खिचडी

मऊ आणि मोकळी साबुदाणा खिचडी

Sabudana Khichdi Recipe – Soft and Non-Sticky Sabudana Kichadi for Vrat

साबुदाणा खिचडी मराठी, साबुदाणा खिचडी रेसिपी, साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे पदार्थ,
 
उपास म्हटला की सगळ्यात पहिले आठवते ती साबुदाण्याची खिचडी.
उपास आणि साबुदाण्याची खिचडी हे समीकरण ठरलेले आहे. फक्त साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी उपास करणारे अनेकजण असतात.
याच्या बरोबर उलट प्रकारही असतो. काही काही साबुदाणा खिचडीच्या चाहत्यांना खिचडी खाण्यासाठी कोणतेही निमित्त लागत नाही. मी यापैकी
दुसर्‍या कॅटेगरीत येते. कधी कधी नेहमीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा फार कष्ट न घेता काहीतरी, चमचमीत पोटभरीच खायच असेल तर
साबुदाण्याची खिचडी हे बेस्ट आॅप्शन आहे. फक्त 5 – 6 तास आधी
ठवणीने साबुदाणा भिजवला की काम झाले. वर वर बघता साबुदाण्याची खिचडी करायला सोपी वाटली तरी कित्येकदा काहीतरी बिनसतं. मग साबुदाण्याची खिचडी मनासारखी होतं नाही. कमी पाणी घातलं तर साबुदाणा नीट भिजत नाही. कच्चा किंवा कडक राहतो. याउलट कधी कधी खिचडी चिकट आणि गोळा होते.

पण असं काहीही न होता बेस्ट साबुदाणा खिचडी जमण्यासाठी या रेसिपीत दिलेल्या या काही टिप्स किंवा साबुदाणा भिजवण्याची पद्धत फाॅलो करा आणि मोकळी तरीही मऊ, लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी enjoy करा.

साहित्य –
2 वाट्या साबुदाणा
1 वाटी दाण्याचं कूट
3 टेस्पून साजूक तूप
4 – 5 हिरव्या मिरच्या
2 टीस्पून जिरं
1 जरा मोठा बटाटा
2 टीस्पून साखर
चवीनुसार मीठ
1/4 वाटी ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती –
साबुदाण्यामध्ये भरपूर पाणी घालून एक तास साबुदाणा भिजत ठेवा.

साबुदाणा खिचडी मराठी रेसिपी, उपासाचे पदार्थ, sabudana khichadi, vrat recipes

एक तासानंतर भांड वाकडं करून आणि हाताने दाबून जास्तीचं पाणी काढून टाका.

साबुदाणा खिचडी मराठी रेसिपी, साबुदाणा खिचडी, sabudana khichdi recipe, vrat recipe

साबुदाणा चाळणीत ओतण्याची गरज नाही.
भांड्यात तळाशी जेवढं पाणी शिल्लक राहिल ते तसंच राहू द्या.
आता हा साबुदाणा नीट मिक्स करून 5 – 6 तास झाकून ठेवा.
5 – 6 तासानंतर साबुदाणा हवा तसा मऊ, मोकळा भिजलेला दिसेल.

साबुदाणा खिचडी मराठी रेसिपी, साबुदाण्याची खिचडी, sabudana khichdi recipe, vrat recipes

आता या साबुदाण्यात दाण्याचं कूट, मीठ आणि साखर घालून मिक्स करा.

साबुदाणा खिचडी मराठी रेसिपी, उपास रेसिपीज, sabudana khichdi recipe, vrat recipe

कढईत तूप गरम करा.
तूप गरम झाले की त्यात जिरं घाला.
जिरं तडतडलं की चिरलेल्या मिरच्या घाला.

साबुदाणा खिचडी मराठीत, साबुदाणा खिचडी, उपास रेसिपीज, sabudana khichdi recipe, vrat recipes,

मिरच्या तळल्या गेल्या की त्यात बटाट्याच्या पातळ चिरलेल्या काचर्‍या घाला.
झाकण ठेऊन आणि मधून मधून परतत या काचर्‍या चांगल्या शिजवा.

साबुदाणा खिचडी मराठी रेसिपी, उपासाचे पदार्थ, उपवास रेसिपीज, sabudana khichdi, vrat recipe

बटाट्याच्या काचर्‍या नीट शिजून सोनेरी झाल्या की त्यात साबुदाणा घाला.
ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट घालून नीट मिक्स करा.

साबुदाणा खिचडी मराठी रेसिपी, उपासाचे पदार्थ, sabudana khichdi recipe, vrat recipes

5 मिनिटं झाकण न ठेवता मंद आचेवर खिचडी शिजवा.

लगेच झाकण ठेवलं तर साबुदाण्याची खिचडी मोकळी न होता, गोळा होण्याची शक्यता असते.

5 मिनिटांनी खिचडीवर झाकण ठेवा.
एक – दोन सणसणीत वाफा आल्या की मऊ, मोकळी आणि लुसलुशीत गरम गरम साबुदाण्याची खिचडी खायला तयार.

साबुदाण्याची खिचडी मराठी रेसिपी, उपासाचे पदार्थ, sabudana khichdi recipe, vrat recipes

खिचडी खाताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
दही आणि लिंबाच्या गोड लोणच्याबरोबर खिचडीचा आस्वाद घ्या.

नैवेद्यासाठी गोड करताना साजूक तुपातला बटाट्याचा खमंग शिरा नक्की करून बघा.

साबुदाणा भिजवताना तुम्ही वर दिलेल्या या काही टिप्स फाॅलो केल्या तर साबुदाणा कसाही असला तरी नीट भिजेल.
कारण कित्येकदा साबुणा चांगल्या प्रतीचा नसेल तर नीट भिजत नाही.
तसेच साबुदाण्याची खिचडी करताना तूप आणि दाण्याचं कूट सढळ हाताने घाला.
दाण्याचं कूट कमी पडणे हेही खिचडी मोकळी न होण्याचे कारण असते.
खिचडीला लाल रंग यायला हवा असेल किंवा जास्त तिखट आवडत असेल तर आवडीप्रमाणे लाल तिखट घालू शकता.
साबुदाणा फोडणीला टाकल्यावर लगेच झाकण ठेवल्यास खिचडी मोकळी न होता, गोळा होते.
साबुदाण्याची खिचडी उरली तर त्यात बाइंडिंगसाठी उकडलेला बटाटा घालून किंवा बदल म्हणून साबुदाण्याच्या खिचडीऐवजी साबुदाण्याचे वडेही करू शकता.
पण साबुदाण्याचे वडे म्हणजे चांगलाच तेलकट प्रकार असतो.
चवीत तडजोड न करता कमी तेलातले साबुदाणे वडे खाण्यासाठी खालील रेसिपी बघा.
साबुदाणा वडे – आप्पेपात्रात
 

Soft and Non – Sticky Sabudana Khichdi Recipe in English 

Ingredients –
 2 cups sago
 1 cup rosted groundnut powder
 3 tbsp Ghee
 4 – 5 green chillies
 2 tsp cumin seeds
 1 large potato
 2 tsp sugar
 Salt to taste
 1/4 cup grated fresh coconut or desiccated coconut
 Finely chopped cilantro (hara dhaniya)
Directions –
Add a lot of water to the sago and soak the sago for an hour.
After an hour, remove the excess water by bending the pot and pressing it by hand.
Don’t need to remove all the water from the sago.
Leave some water in the sago.
Now mix this sago well and cover it for 5-6 hours.
After 5 – 6 hours, the sago will look as soft and non – sticky.
You will get soft yet each sago pearls seperaed from each other.
Now add roasted groundnut powder, salt and sugar in this sago and mix.
Heat ghee in a pan.
When the ghee is hot, add cumin seeds.
When cumin is cracked, add chopped chillies.
Once the chilies are fried, add thinly sliced ​​potato.
Cover and cook well.
When the potato slices are golden brown, add sago.
Add wet coconut or desiccated coconut and mix well.
Cook over low heat for 5 minutes without lid.
If the lid is put on immediately, Sabudana Khichdi will become sticky.
Cover the khichdi after 5 minutes.
Cook for 5 – 10 minutes on the low heat.
Stir in between and make sure Sabudana Khichdi will not burn from the bottom of the pan.
While eating khichdi, add finely chopped cilantro.
Sabudana khichdi goes well with curd and sweet lemon pickle.

2 thoughts on “मऊ आणि मोकळी साबुदाणा खिचडी

Leave a Reply