चमचमीत पावभाजी – सोपी पद्धत – पावभाजी मॅशर शिवाय

चमचमीत पावभाजी, सोप्या पद्धतीने, पावभाजी मॅशरशिवाय

Tasty and Spicy Mumbai Special Pavbhaji – Easy Method – Without Pavbhaji Masher

पावभाजी रेसिपी, मुंबई स्पेशल पावभाजी, चमचमीत पावभाजी, सोपी पावभाजी, झटपट पावभाजी, pavbhaji recipe, mumbai special pabbhaji

मी अकरावीत जाईपर्यंत आम्ही NRC काॅलनीत राहायचो. NRC काॅलनीला सगळ्यात जवळचं मोठं शहर म्हणजे कल्याण. त्यामुळे अगदी भाजी आणण्यापासून ते इतर अनेक कामांसाठी सतत कल्याणला जाणं येणं असायच. बस किंवा लोकलने जेमतेम 15 – 20 मिनिटांचा प्रवास. कल्याण स्टेशनच्या बाहेरच ‘संतोष’ नावाचं एक हाॅटेल होतं. होतं म्हणजे आता आहे की नाही मला माहित नाही. रात्री घरी जायला उशीर होणार असेल तर संतोषची पावभाजी हा ठरलेला प्रोग्रॅम असायचा. एकदम टिपीकल चवीची पण तरीही अप्रतिम असायची ती पावभाजी. ‘संतोष’ हाॅटेलजवळून जाताना पावभाजीचा तो घमघमाट अक्षरश: खेचून घ्यायचा.

माझी आईही घरी बर्‍याचदा पावभाजी करायची. आमच्या लहानपणी 31 डिसेंबरला घरी पावभाजी ठरलेली असायची. संध्याकाळी पावभाजी खायची आणि मग टिव्हीला चिकटून बसायचं. रात्री 12 वाजता कार्यक्रम संपले की देवाजवळ दिवा लावून गुपचूप झोपून जायचं. आता हे लिहितानासुद्धा मला हसू येतंय. ही मी 25 – 30 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतेय. तेव्हाच न्यू इयर सेलिब्रेशन हे असं साधं, सरळ असायचं.🙂 पण कितीही वर्ष झाली किंवा पुढे गेली तरी पावभाजी हा पदार्थ एव्हरग्रीनच राहणार आहे. अगदी नवीन पिढीलाही भले मिसळपावचं तितकं कौतुक नसेल पण पावभाजी खायला केव्हाही, अगदी एका पायावर तयार. महाराष्ट्रात राहणार्‍या त्यातही ‘पुंबईकरांना’ हे मनापासून पटेल.🙂 या पावभाजीची ही झटपट होणारी सोपी कृती. सगळ्यात महत्वाच म्हणजे पावभाजी मॅशर शिवाय तुम्हाला ही पावभाजी करता येईल. तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसला तरी काहीही हरकत नाही. या रेसिपीने तुम्ही परफेक्ट मिळून येणारी पावभाजी करू शकता.
साहित्य –
1 मध्यम आकाराचा फ्लाॅवर (अंदाजे 500 – 600 ग्रॅम किंवा 4 – 5 कप फ्लाॅवरचे तुरे)
2 मोठे किंवा 4 – 5 मध्यम आकाराचे बटाटे
1 मोठी हिरवी सिमला मिरची
11/2 कप मटार ताजे किंवा फ्रोजन
1 लहान किंवा मध्यम आकाराचे बीट
4 – 5 मध्यम कांदे (भाजीसाठी आणि वरून घेण्यासाठी)
पाव
फोडणीसाठी –
3 टेस्पून बटर + 1टेस्पून तेल
1 टीस्पून जिरं
1 कप बारीक चिरलेला कांदा
4 टाॅमॅटो
1 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून हळद
3 टेस्पून पावभाजी मसाला
चवीप्रमाणे मीठ
सजावटीसाठी –
कांदा
कोथिंबीर
लिंबू
बटर
किसलेलं मोझेराॅला चीज (ऐच्छिक, चीज पावभाजी हवी असल्यास)
पावभाजी रेसिपी, चीज पावभाजी, मुंबई पावभाजी, pavbhaji recipe, cheese pavbhaji, mumbai pavbhaji

 

पावभाजी रेसिपी, मुंबई पावभाजी, बटर पावभाजी, pavbhaji recipe, mumbai pavbhaji, butter pavbhaji
पावभाजी रेसिपी, मुंबई पावभाजी, butter pavbhaji, mumbai pavbhaji
बटर पावभाजी, चीज पावभाजी, पावभाजी रेसिपी, butter pavbhaji, cheese pavbhaji, mubai pavbhaji
मुंबई पावभाजी, बटर पावभाजी, चीज पावभाजी, mumbai pavbhaji, butter pavbhaji, cheese pavbhaji
बटर पावभाजी, चमचमीत पावभाजी, मुंबई स्पेशल पावभाजी,
चमचमीत पावभाजी रेसिपी, टाॅमॅटो प्युरी, spicy pavbhaji recipe, tomato puree
मसालेदार पावभाजी, चमचमीत पावभाजी, spicy pavbhaji, easy pavbhaji
मसालेदार पावभाजी, सोपी पावभाजी, मॅशरशिवाय पावभाजी, easy pavbhaji, without masher
चमचमीत पावभाजी, बटर पावभाजी, चीज पावभाजी, मॅशरशिवाय पावभाजी, pavbhaji without masher
कृती –

सुरवात करताना सगळ्या भाज्या बारीक चिरून किंवा चाॅप करून ठेवा.
एकदा भाज्यांची तयारी केली की पुढचं काम सोपं आणि पटकन होतं.
फ्लाॅवर अगदी बारीक चिरून किंवा चाॅपर मधून काढून घ्या.
बटाटे आणि बीट सालं काढून बारीक, पातळ चिरा.
फ्लाॅवर, बटाटे, बीट आणि ताजे असतील तर मटार, साधारण 3 कप पाणी घालून कुकरमध्ये उकडायला ठेवा.
कुकरच्या 4 – 5 शिट्या करा.
कांदे आणि सिमला मिरचीही अगदी बारीक चाॅप करा.
टाॅमॅटो मिक्सरमध्ये वाटून ठेवा.
आलं, लसूण आणि मिरच्या वाटून घ्या.
मटार फ्रोजन असतील तर चाॅपर मधून किंवा मिक्सरमधून अर्धवट बारीक करा.
कढईत बटर आणि तेल गरम करा.

त्यात जिरं घाला.

जिरं तडतडलं की एक कप बारीक चिरलेला कांदा घाला.
मंद आचेवर कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परता.
कांदा नीट परतला गेला की आलं – लसूण पेस्ट घाला.
कच्चा वास जाऊन खमंग वास येईपर्यंत परता.
आता यात बारीक चिरलेली सिमला मिरची घाला.
दोन चार मिनिटे परतून वाटलेला टाॅमॅटो घाला.
मंद आचेवर झाकण ठेऊन तेल सुटेपर्यंत शिजवा.
टाॅमॅटो पेस्टला तेल सुटले की, हळद, तिखट आणि पावभाजी मसाला घाला.
छान वास येईपर्यंत परता.
फ्रोजन मटार घालणार असाल तर ते घाला.
नीट मिक्स करा.
कुकर उघडून उकडलेल्या भाज्या डावाने थोडसं दाबून छान ढवळून घ्या.
व्हिस्कर असेल तर व्हिस्करने फेटून घेतल्या तरी चालतील.
व्यवस्थित शिजल्यामुळे भाज्या लगेच मिळून येतात.
आता या भाज्या आणि मीठ घालून सगळं ढवळून घ्या.
यात साधारण कपभर पाणी घाला.
15 – 20 मिनिटे मंद आचेवर भाजी छान रटरटू द्या.
म्हणजे सगळे फ्लेवर मिक्स होऊन भाजी मस्त मिळून येईल.
भाजी शिजेपर्यंत एकीकडे पाव गरम करा.
पाव मधून कापून बटर लावा आणि तव्यावर गरम करा.

आवडीप्रमाणे मऊ किंवा कुरकुरीत करा.
खाताना भाजीवर बटर आणि हवे असल्यास चीज घाला.
बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू बरोबर द्या.

या प्रमाणात केलेली पावभाजी साधारण 4 – 5 माणसांना दोन वेळा पुरेल इतकी होते.
पावभाजी सगळ्यांच्या आवडीची असल्यामुळे तेवढी लागतेच.
शिवाय एकदाच भरपूर केली की मग पुढच्या एक – दोन वेळेस काही करायच टेन्शन नाही.
पावभाजी करताना बर्‍याच जणांकडे कांदा फोडणीला न घालता फक्त कच्चा, भाजीवर घेतात.
पण मला स्वत:ला कांदा घातल्याशिवाय पावभाजी केल्यासारखीच वाटत नाही.
भाजीत बीट घातल्यामुळे भाजीला छान नैसर्गिक लाल रंग येतो.
भाज्या बारीक करण्यासाठी दोरी ओढायचा जो स्ट्रिंग चाॅपर येतो तो मी भरपूर वापरते.
मला तो वापरायला अतिशय सुटसुटीत वाटतो.
मिक्सर किंवा फूड प्रोसेसरची कटकट रहात नाही.
कधी कधी थोडेसेच कोरडे वाटण मिक्सरमध्ये नीट होत नाही.
अशावेळेस हा चाॅपर खूप उपयोगी पडतो आणि काम झाल्यावर ब्लेडसकट सगळं डिशवाॅशरमध्ये टाकता येतं.
फ्लाॅवर, मटार, सिमला मिरची या भाज्या पावभाजीमध्ये काॅमन असल्या तरी आवडीप्रमाणे तुम्ही गाजर, बीट, कोबी यासारख्या भाज्या घालू शकता.
भाज्यांचे प्रमाणही हवे तसे कमी जास्त करता येईल.

 
बटर पावभाजी, चीज पावभाजी, मुंबई पावभाजी, सोपी पावभाजी, झटपट पावभाजी,
Mumbai Special Spicy Pavbhaji Recipe in English
 
Ingredients –
1 medium sized cauliflower (approximately 500 – 600 g or 4 – 5 cups florets) 
2 large or 4 – 5 medium sized potatoes
1 large green bell pepper(capscicum) 
11/2 cup green peas fresh or frozen
1 small or medium sized beetroot
4 – 5 medium onions (for bhaji and garnishing)
Pav (Dinner Rolls) as needed
For tempering –
3 tbsp butter + 1 tbsp oil
1 tsp cumin seeds
1 cup finely chopped onion
4 tomatoes
1 tsp red chili powder
1/2 tsp turmeric
3 tbsp Pavbhaji Masala
Salt to taste
For Garnishing
Onion
Cilantro (Coriander)
Lemon
Butter
Grated Mozzarella Cheese (optional, for cheese pavbhaji)
 
Directions –
First chop all the vegetables finely and keep handy.
Once the chopped vegetables are ready, the next task is easy and quick.
Finely chop the cauliflower.
Peel the potatoes and beetroot and cut into thin and small slices.
Add cauliflower, potatoes, beetroot along with 3 cups of water and bring to boil in a pressure cooker.
Make 4 – 5 whistles of the pressure cooker.
Finely chop the onions and bell peper.
Grind tomatoes into a blender and make puree.
Grind ginger, garlic and dry red chili and make a paste.
If you are using frozen green peas mash or grind them coarse.
Heat butter and oil in a pan.
Add cumin seeds.
When the cumin is crackled, add a cup of finely chopped onion.
Saute over low heat until onion is well browned.
Once onion is well fried, add ginger-garlic paste.
Saute until raw smell goes away.
Now add finely chopped bell peper.
Saute for a couple of minutes and add the tomato puree.
Cover and cook over low heat till you see the oil seperate from the tomato paste.
When the tomato paste is well cooked add turmeric powder, red chilli powder and Pavbhaji masala.
Saute until it becomes aromatic.
If you are going to add frozen peas, add it at this time.
Mix well.
Open the pressure cooker and stir the boiled vegetables by pressing it a little from the backside of a ladle.
You can also whisk the vegetables by using a whisker.
Now add these vegetables and salt and stir everything together.
Add  a cup of water.
Let the vegetables simmer for 15 – 20 minutes on low heat.
It will make all the flavours blend together and enhance the taste of the Pavbhaji.
Toast the Pav till the vegetables are cooked.
Slit Pav horizontally leaving one edge intact.
Apply some butter on it and toast pav on heated pan or tawa. 
Fry them soft or crispy according to your taste.
Serve Pavbhaji with butter, chopped onion, cilantro(coriander leaves) and lemon wedges.
For Cheese Pavbhaji spread lots of grated cheese on bhaji. 
 

Leave a Reply